खरे बौद्ध धम्माकडून लांब जातांना दिसताहेत

0
1

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी

सध्या देशात धर्माधर्मात तेढ निर्माण करून जातीय द्वेष भावनेतून मनुष्याचा छळ करून त्यांना जीवनीशी मारले जात आहे. हिंदू असूनही त्यांना मंदिरात प्रवेश बंदी आहे. “आम्ही हिंदू असूनही त्यांना जातीयवाद्यांकडून दुय्यम वागणूक दिली जात आहे. जेव्हा हे हिंदूंच्या लक्षात आले तेव्हा हजारो हिंदूंनी बांधवांनी हिंदू धर्माचा त्याग करून, संपूर्ण देशात पसरलेला पवित्र असा बौद्ध धर्म स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. मात्र, खरे बौद्ध हे धर्मापासून लांब जात असल्याचे चित्र डोळ्यासमोर दिसत असल्याचे प्रतिपादन पू.भदंत सुगतवंश महाथेरो यांनी पू.भदंत सुमनतीस्स यांच्या १८व्या वर्षावास समापन प्रसंगी भगवान बुद्ध टेकडी, आंबेडकर नगर, तापी नदी किनारी आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रवचन देतांना केले.

तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवात पहाटे ६ वाजता बुद्ध पूजा वंदना, परित्राण पाठ, भंते गणांची उपस्थितीत धम्म ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर ज्या भिकूंनी चिवर घेऊन २ ते १० वर्ष झाली, अश्‍या भिकूंचा उपसंपदा समारोह कार्यक्रम दीपनगर पिंप्रीसेकम शिवार तापी नदीच्या मध्यभागी होळीमध्ये बसून ज्येष्ठ धम्म गुरु पु.भदंत सुगतवंश महाथेरो (श्रीलंका) यांच्या उपस्थितीत पु.भदंत करुणा बोधी महाथेरो, पु.भदंत समुद्र महाथेरो, पु.भदंत संघरत्न महाथेरो, पु.भदंत सुमंगल महाथेरो, पु.भदंत सुमनतीस्स थेरो, भिक्खु सुचितानंद, भिक्खु श्रद्धा तिलक, भिक्खु रेवत बोधी, भिक्खु बोधि धम्मानंद, भिक्खु शील बोधि, भिक्खु राजरत्न, भिक्खु संघरत्न यांनी विधिवत बौद्ध धम्माची पूजा करून, श्रामनेर भंते नामानंद श्रामनेर भंते नागार्जुन, श्रामनेर भंते पटीसेन, श्रामनेर भंते धम्मदूत, श्रामनेर भंते धम्मपाल, श्रामनेर भंते प्रज्ञा ज्योती, या श्रामनेर भंतेना उपसंपदा देण्यात आली. “उपसंपदा म्हणजे कायमस्वरूपी चिवर देण्यात आले“

भंते सुगतवंश आपल्या प्रवचनातून पुढे बोलताना म्हणाले की, दूरदृष्टी असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला आदर्श असा विज्ञानवादी धम्म देऊन सुद्धा, समाजातील सुशिक्षित वर्ग जसे की डॉक्टर, अधिकारी, वकील, इंजिनिअर, प्राध्यापक, शिक्षक वर्ग यांनी दोन पुस्तके वाचली काय तर ते स्वतःला बुद्धिमान आणि विद्वान समजू लागले, ज्या धर्मासाठी भंतेगणांनी आपल्या आई, वडिल, भाऊ बहीण, पत्नी, मुला बाळांचा त्याग केला. देश विदेशातून धम्म सांगण्यासाठी ते बौद्ध धम्माचा प्रचार हा पूर्ण देशात करीत आहे अशा भंतेंकडून त्यांचे प्रवचन ऐकण्यासाठी, त्यांचे विचार घेण्यासाठी, अशा मान्यवरांची त्यांच्या परिवाराची कार्यक्रमात ठिकाणी उपस्थिती दिसून येत नाही ही फार निंदनीय गोष्ट आहे.

कार्यक्रमासाठी दान देऊन त्यात ते आपली महानता समजतात, काही महानुभाव सोशल मीडियावर भगवान गौतम बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची पोस्ट टाकून आम्ही किती कट्टर बुद्धिस्ट-आंबेडकरवादी आहोत हे दाखविण्याचे काम ते सध्या करताना दिसत आहे. भगवान गौतम बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आपले दैवत आहे. त्यांच्या विचारांना संपूर्ण विश्‍वनथ मस्तक होत आहे. त्याचे भान ठेवून सगळ्या बौद्ध उपासक, उपासिकांनी आपली पावले बुद्ध विहाराकडे वळवीली पाहिजे, असा संदेश त्यांनी आपल्या प्रवचनातून दिला.

यांनी घेतले परिश्रम

यशस्वीतेसाठी भिक्कुनी उप्पला थेरी, पत्रकार राजेश तायडे, संदीप सुरवाडे, पत्रकार सतीश कांबळे, हिराबाई सुरवाडे, रजनी तायडे, मंडळ अधिकारी रमाबाई भालेराव, महेंद्र तायडे, ईश्‍वर गरुड, हिराबाई बाविस्कर, कलाबाई बोलके, कविता वाघ, रेखाबाई सोळंके, अनुसयाबाई कांबळे, रमेश पाटील, शिवलाल जगदेव, वासुदेव मोरे, प्रकाश मनोरे, महेंद्र तायडे यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here