स्त्री शक्तीमुळेच होतेय संस्कृतीचे जतन

0
1

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

स्त्री ही कुटुंबात असेल किंवा नोकरीत मात्र ती आपले संस्काराचे जतन नेहमी करत असते. त्यामुळेच आपली संस्कृती ही अनादी काळापासून आजपर्यंत स्त्री शक्तीमुळेच संस्कृतीचे जतन करत असल्याचे प्रतिपादन काँग्रेस व्ही. जे. एन. टी. सेलचे जळगाव जिल्हाध्यक्ष सुभाष जाधव यांनी केले. काँग्रेसतर्फे आयोजित स्त्री शक्तीचा सन्मान कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नानाभाऊ पटोले, पल्लवी रेणके यांच्या मार्गदर्शनानुसार विमुक्त जाती, भटक्या जमाती विभाग जळगावतर्फे महिलांचे शैक्षणिक योगदान व बचतगटामार्फत महिलांना स्वयंरोजगासाठी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी काँग्रेस व्ही. जे. एन. टी.सेलचे जळगाव जिल्हाध्यक्ष सुभाष जाधव यांनी महिलांना भेट वस्तू, विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here