साईमत, बोदवड : प्रतिनिधी विद्यार्थ्यांचे योग्य ते निदान करूनच रिमेडीयल, ब्रीज टिचिंग ही पद्धत वापरल्यास विद्यार्थ्यांना अवघड वाटणाऱ्या संकल्पना समजून त्यांना चांगले यश संपादन करणे सहज शक्य होते. त्यांना वेगवेगळ्या विषयातील संकल्पना समजल्यामुळे मूलभूत पाया कच्चा असल्यास तो पक्का होण्यास मदत होते. परीक्षेत चांगले यश मिळवून आत्मविश्वास वाढण्यास मदत होते, असे प्रतिपादन प्रा.अरविंद चौधरी यांनी केले. बोदवड येथील महाविद्यालयातील रेमेडियल टीचिंग आणि ब्रिज कोर्स समितीमार्फत विद्यार्थ्यांसाठी ‘रिमेडीयल टिचिंगचे महत्त्व’ विषयावर प्राचार्य प्रा.अरविंद चौधरी यांचे व्याख्यानाचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी काही टिप्स दिल्या. यशस्वीतेसाठी कांचन दमाडे, विशाल जोशी, रूपाली चौधरी, अतुल पाटील यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक समितीप्रमुख डॉ.…
Author: Sharad Bhalerao
साईमत, भुसावळ : प्रतिनिधी येथील नाहटा चौफुली येथील शहिद स्मारक येथे २६ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ता म्हणून माजी सैनिक विष्णु बुगले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. बोधराज चौधरी, शिवछत्रपती गोरक्षा अभियानाचे जिल्हा संयोजक रोहीत महाले उपस्थित होते. यावेळी अभाविपचे शहर सहमंत्री वैष्णवी कोळी यांनी मनोगत व्यक्त करुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अभाविपचे भुसावळ जिल्हा संयोजक अजय सपकाळ, छात्रशक्ती प्रमुख अथर्व जंगले यांच्यासह अभाविपचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
साईमत, सावदा, ता.रावेर : वार्ताहर सावदा नगर पालिकेच्या १०० वर्षाच्या इतिहासात १९८४ मध्ये प्रथम वेळी लागलेल्या प्रशासकीय राजवटमध्ये मुख्याधिकारी भोंगळे यांना ध्वजारोहण करण्याचा बहुमान प्राप्त झाला होता. २०२१-२२ मध्ये दुसऱ्यांदा लागलेल्या प्रशासकीय राजवटमध्ये २६ जानेवारी २०२४ रोजी मुख्याधिकारी हर्षल सोनवणे यांना ध्वजारोहण करण्याचा बहुमान मिळाला आहे. शहरातील बसस्थानक परिसरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याजवळ प्रजाकसत्ताक दिनाचे औचित्य साधुन आ. चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून मंजुर ११० फुटी राष्ट्रध्वज लोकार्पण सोहळ्यात आ.चंद्रकांत पाटील यांची कन्या संजना पाटील यांना ध्वजारोहणाचा प्रथम बहुमान मिळाला. याप्रसंगी रावेर लोकसभा निवडणूक प्रमुख नंदकिशोर महाजन, संजना पाटील, डॉ. अतुल सरोदे, मुख्याधिकारी हर्षल सोनवणे, एपीआय जलींदर पळे, शिवसेना…
साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी येथील खडसे महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्षातर्फे शिवाजी विद्यालय, कुऱ्हा येथे बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते.अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस.बी.पाटील होते. प्रमुख पाहुणे तथा मार्गदर्शक डॉ. जी. एस.चव्हाण, रवींद्र पाटील, काकडे उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक डॉ.जी. एस. चव्हाण यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विषयावर सविस्तर माहिती दिली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हे केंद्र सरकारने स्विकारले आहे. ते येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी म्हणजेच २०२४-२५ पासून महाविद्यालयांना लागू करण्यात येणार आहे. त्यासाठीचा अभ्यासक्रम तयार झालेला आहे. यापूर्वी दहावी, बारावी व तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम होता. आताच्या शैक्षणिक धोरणात अगदी के.जी.पासून तर पी.जी.पर्यंतचा विचार…
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी शहरात अनेक ठिकाणी जुलै २०२३ मध्ये अतिवृष्टीमुळे घराघरात पुराचे पाणी शिरले. भिंती पडल्या, छत कोसळले, याबाबत वंंचित बहुजन आघाडीतर्फे वारंवार निवेदन दिली आहे. तसेच चौकशीचे आदेश झाले. परंतु तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी अद्यापही कोणतीही नुकसान भरपाई दिलेली नाही. त्यामुळे शहर उपाध्यक्ष जफर खान तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहे. वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते व्यथित होऊन परत नुकसान भरपाई नागरिकांना मिळावी म्हणून निवेदन दिले. त्यावर काही निर्णय न झाल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते बाळासाहेब दामोदर, जिल्हा संघटक भाऊराव उबाळे, तालुकाध्यक्ष सुशील मोरे यांच्या नेतृत्वात जेव्हापर्यंत अतिवृष्टी धारकांना नुकसान भरपाई मिळणार नाही, तोपर्यंत उपोषण कायम राहणार असल्याचे…
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी येथील हिंदी मराठी पत्रकार संघटनेच्या विदर्भ अध्यक्षपदी दै.‘साईमत’चे प्रतिनिधी सतीश तोताराम दांडगे यांची नुकतीच निवड करण्यात आली. पत्रकारिता क्षेत्रात कमी वयात नावलौकिक करणारे व गोरगरीब अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत झटणारे पत्रकार म्हणून त्यांच्या कार्याची दखल घेत संपूर्ण भारतात कार्यरत हिंदी मराठी पत्रकार संघटनेच्या विदर्भ अध्यक्षपदी त्यांची नियुक्तीपत्राद्वारे निवड केली आहे. त्यांनी हिंदी मराठी पत्रकार संघटनेच्या माध्यमातून गोरगरीब अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून द्यावा, भ्रष्टाचाराचा बीमोड करावा, असेही नियुक्ती पत्रात नमूद केले आहे. यावेळी नियुक्तीपत्र देताना हिंदी मराठी पत्रकार संघटनेच्या राज्याध्यक्ष धनश्री काटीकर, पत्रकार प्रा. प्रकाश थाटे, करणसिंग शिरस्वाल, सय्यद ताहेर, शेख निसार आदी उपस्थित होते.
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी येथील कोलते इंजिनिअरिंग महाविद्यालयात आयईडीएसएसए अंतर्गत नुकत्याच खो-खो स्पर्धा उत्साहात पार पडल्या. त्यात वेगवेगळ्या महाविद्यालयाच्या १५ संघांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेत स्वतः आयोजक महाविद्यालय डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक महाविद्यालय, मलकापूर संघ विजयी ठरला. तसेच जि. पी. पॉलिटेक्निक महाविद्यालय, वाशीमचा संघ उपविजेता ठरला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ए. एल. इंगळे, डॉ. कैलास पवार होते. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. अरविंद कोलते, प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी मनोगत व्यक्त करुन विद्यार्थ्यांना खेळाविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी विजेत्या संघाला महाविद्यालयाचे खजिनदार सुधीर पाचपांडे यांच्या हस्ते बक्षिसाचे वितरण करण्यात आले. पंच म्हणून…
साईमत, बोदवड : प्रतिनिधी येथील विधीसेवा प्राधिकरण आणि पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बोदवड पो.स्टे.मध्ये मानवी तस्करी जागृती दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी न्या. क्यु.यु.एन शरवरी होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, सह.पोलीस निरीक्षक अंकुश जाधव, विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष योगेश पाटील, जिया शेख, पोलीस कर्मचारी वर्ग, नागरिक उपस्थित होते. यावेळी मानवी तस्करी गुन्ह्याबद्दल बोदवड तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अर्जुन पाटील, सचिव ॲड. धनराज प्रजापती, ॲड.के.एस.इंगळे, ॲड. किशोर महाजन यांनी मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी केस वॉच राजेंद्र महाजन, पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन तथा आभार शैलेश पडसे यांनी मानले.
साईमत, फैजपूर : प्रतिनिधी श्री क्षेत्र अयोध्या येथे ‘याची देही याची डोळा स्वर्गाहुनी सुंदर’ अशा अलौकिक प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे साक्षीदार झालेले सतपंथ मंदिराचे गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांचे फैजपूर नगरीत दुपारी आगमन झाले. त्यांची फैजपूरमध्ये आठवडे बाजारातील श्रीराम मंदिरात प्रथम आरती करून भव्य मिरवणूक काढण्यात आली. सर्वात पुढे महाकाल पथक त्यानंतर सतपंथ मंदिर भजनी मंडळ, वारकरी भजनी मंडळ, आणि असंख्य भक्त गण अशा अलौकिक भव्य मिरवणूक निघाली. याप्रसंगी सर्व फैजपूर नगरी सडा, रांगोळी, पताका लावून सजविण्यात आली. यावेळी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी रस्त्याच्या दुतर्फा असलेले असंख्य भाविक भक्तांना हसतमुख आशीर्वाद दिले. दोन तासांच्या मिरवणुकीत सर्व फैजपूर नगरी आनंदमय व…
साईमत, फैजपूर : प्रतिनिधी अयोध्येतील श्रीराम मंदिर समस्त भारतीयांचे ऊर्जा केंद्र बनले आहे. ही ऊर्जा देशाला विश्वात महासत्ता बनवेल, असे प्रतिपादन फैजपूर येथे श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सव समारोपप्रसंगी राममंदिराचे अध्यक्ष तथा सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे यांनी केले. अयोध्येतील श्रीराम प्रभू मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सवानिमित्त फैजपूर गावातील श्रीराम मंदिरात भव्य रामायण कथा महोत्सव झाला. प्राण प्रतिष्ठा मुहूर्तावर सामूहिक ५१ भाविक महिला व पुरुषांनी शंखनाद केला. त्यामुळे सर्व परिसर दणाणले. तसेच घंटानाद करण्यात आला. महोत्सवात हजारो भाविकांनी उपस्थिती लावून श्रीरामाचे दर्शन घेतले. भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. महोत्सवात खासदार रक्षा खडसे, अमोल जावळे यांनी उपस्थिती दिली. कथा मुरलीधर महाराज कथरेकर यांनी केली. साथ…