कोलते इंजिनिअरिंग महाविद्यालयात खो-खो स्पर्धा उत्साहात

0
3

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी

येथील कोलते इंजिनिअरिंग महाविद्यालयात आयईडीएसएसए अंतर्गत नुकत्याच खो-खो स्पर्धा उत्साहात पार पडल्या. त्यात वेगवेगळ्या महाविद्यालयाच्या १५ संघांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेत स्वतः आयोजक महाविद्यालय डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक महाविद्यालय, मलकापूर संघ विजयी ठरला. तसेच जि. पी. पॉलिटेक्निक महाविद्यालय, वाशीमचा संघ उपविजेता ठरला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ए. एल. इंगळे, डॉ. कैलास पवार होते.

यावेळी संस्थेचे सचिव डॉ. अरविंद कोलते, प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी मनोगत व्यक्त करुन विद्यार्थ्यांना खेळाविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी विजेत्या संघाला महाविद्यालयाचे खजिनदार सुधीर पाचपांडे यांच्या हस्ते बक्षिसाचे वितरण करण्यात आले. पंच म्हणून मयूर गवात्रे तसेच त्यांच्या टीमने धुरा सांभाळली.

यशस्वीतेसाठी प्रा. संदीप खाचणे, प्रा. साकेत पाटील, प्रा. संदीप मुंडाले, प्रा. मनोज वानखेडे, प्रा. पांडुरंग चोपडे, प्रा. किशोर वाडेकर, प्रा. दीपक जोशी, प्रा. प्रवीण होगे, प्रा. पवन ठाकरे, यश अहिर यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. माधुरी तोष्णीवाल यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here