रामलल्लाचे दर्शन घेऊन जनार्दन हरीजी महाराज परतले

0
4

साईमत, फैजपूर : प्रतिनिधी

श्री क्षेत्र अयोध्या येथे ‘याची देही याची डोळा स्वर्गाहुनी सुंदर’ अशा अलौकिक प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे साक्षीदार झालेले सतपंथ मंदिराचे गादीपती महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांचे फैजपूर नगरीत दुपारी आगमन झाले. त्यांची फैजपूरमध्ये आठवडे बाजारातील श्रीराम मंदिरात प्रथम आरती करून भव्य मिरवणूक काढण्यात आली. सर्वात पुढे महाकाल पथक त्यानंतर सतपंथ मंदिर भजनी मंडळ, वारकरी भजनी मंडळ, आणि असंख्य भक्त गण अशा अलौकिक भव्य मिरवणूक निघाली. याप्रसंगी सर्व फैजपूर नगरी सडा, रांगोळी, पताका लावून सजविण्यात आली. यावेळी महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी रस्त्याच्या दुतर्फा असलेले असंख्य भाविक भक्तांना हसतमुख आशीर्वाद दिले. दोन तासांच्या मिरवणुकीत सर्व फैजपूर नगरी आनंदमय व भक्तीमय वातावरणात न्हावून निघाली.

मिरवणूक मार्गावर असलेल्या राममंदिर, विठ्ठल मंदिर, मोठा हनुमान मंदिर या सर्व मंदिरांमध्ये महाराजांनी हार अर्पण करून दर्शन घेतले. सतपंथ मंदिरासमोर मिरवणुकीचे एका आगळ्या सत्कार समारंभात झाला. यावेळी महाराजांचे दर्शन व सत्कार सतपंथ मंदिर ट्रस्टी तथा सर्व उपस्थितांनी घेतले. फैजपूर सावदा परिसरातील जे कार सेवक अयोध्या मंदिरासाठी घरदार सोडून राम मंदिर आंदोलनात भाग घेतला. त्यांचा सत्कार परमपूज्य महामंडलेश्‍वर यांच्या हस्ते करण्यात आला. गेल्या ५२८ वर्षापासून सर्वांच्या तनमनात असलेल्या राम लल्लाच्या मंदिराच्या उभारणीसाठीची प्रतीक्षा संपली. जगभरात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार सेवकांनी आपला चित्तथरारक अनुभव सांगितला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here