भुसावळला अभाविपतर्फे भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन

0
4

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी

येथील नाहटा चौफुली येथील शहिद स्मारक येथे २६ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ता म्हणून माजी सैनिक विष्णु बुगले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. बोधराज चौधरी, शिवछत्रपती गोरक्षा अभियानाचे जिल्हा संयोजक रोहीत महाले उपस्थित होते. यावेळी अभाविपचे शहर सहमंत्री वैष्णवी कोळी यांनी मनोगत व्यक्त करुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अभाविपचे भुसावळ जिल्हा संयोजक अजय सपकाळ, छात्रशक्ती प्रमुख अथर्व जंगले यांच्यासह अभाविपचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here