अयोध्येतील श्रीराम मंदिर भारतीयांचे ऊर्जा केंद्र : नरेंद्र नारखेडे

0
4

साईमत, फैजपूर : प्रतिनिधी

अयोध्येतील श्रीराम मंदिर समस्त भारतीयांचे ऊर्जा केंद्र बनले आहे. ही ऊर्जा देशाला विश्‍वात महासत्ता बनवेल, असे प्रतिपादन फैजपूर येथे श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सव समारोपप्रसंगी राममंदिराचे अध्यक्ष तथा सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे यांनी केले. अयोध्येतील श्रीराम प्रभू मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सवानिमित्त फैजपूर गावातील श्रीराम मंदिरात भव्य रामायण कथा महोत्सव झाला. प्राण प्रतिष्ठा मुहूर्तावर सामूहिक ५१ भाविक महिला व पुरुषांनी शंखनाद केला. त्यामुळे सर्व परिसर दणाणले. तसेच घंटानाद करण्यात आला.

महोत्सवात हजारो भाविकांनी उपस्थिती लावून श्रीरामाचे दर्शन घेतले. भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. महोत्सवात खासदार रक्षा खडसे, अमोल जावळे यांनी उपस्थिती दिली. कथा मुरलीधर महाराज कथरेकर यांनी केली. साथ संगीत अभिनव गायन गंधर्व निवृत्ती महाराज साळुंखे यांनी दिली. यावेळी साधू संतांचा सत्कार पांडुरंग सराफ, भास्कर चौधरी, नितीन राणे, हेमराज चौधरी यांच्या हस्ते झाला. यावेळी मिलिंद पाठक, दीपक पाठक यांनी मंत्र पठण केले. याप्रसंगी भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले.

यशस्वीतेसाठी काशिनाथ वारके, विकास नेमाडे, पराग चौधरी, किशोर कोल्हे, पंकज पाटील, डॉ.प्रभाकर बारी, अनिल नारखेडे, सुनील नारखेडे, राजाराम महाजन, चंद्रशेखर चौधरी, भूषण नारखेडे, डॉ. गणेश भारंबे, राजेश महाजन यांनी परिश्रम घेतले. राममंदिर उभारणीसाठी बलिदान केलेले कारसेवक रामभक्त संत यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अध्यक्ष नरेंद्र नारखेडे आणि सीमा नारखेडे यांच्या हस्ते महाआरती होऊन महोत्सवाची सांगता करण्यात आली. सुत्रसंचालन किरण चौधरी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here