हिंदी मराठी पत्रकार संघटनेच्या विदर्भ अध्यक्षपदी दै.‘साईमत’चे पत्रकार सतीश दांडगे

0
1

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी

येथील हिंदी मराठी पत्रकार संघटनेच्या विदर्भ अध्यक्षपदी दै.‘साईमत’चे प्रतिनिधी सतीश तोताराम दांडगे यांची नुकतीच निवड करण्यात आली. पत्रकारिता क्षेत्रात कमी वयात नावलौकिक करणारे व गोरगरीब अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत झटणारे पत्रकार म्हणून त्यांच्या कार्याची दखल घेत संपूर्ण भारतात कार्यरत हिंदी मराठी पत्रकार संघटनेच्या विदर्भ अध्यक्षपदी त्यांची नियुक्तीपत्राद्वारे निवड केली आहे.

त्यांनी हिंदी मराठी पत्रकार संघटनेच्या माध्यमातून गोरगरीब अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून द्यावा, भ्रष्टाचाराचा बीमोड करावा, असेही नियुक्ती पत्रात नमूद केले आहे. यावेळी नियुक्तीपत्र देताना हिंदी मराठी पत्रकार संघटनेच्या राज्याध्यक्ष धनश्री काटीकर, पत्रकार प्रा. प्रकाश थाटे, करणसिंग शिरस्वाल, सय्यद ताहेर, शेख निसार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here