साईमत, बोदवड : प्रतिनिधी
येथील विधीसेवा प्राधिकरण आणि पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बोदवड पो.स्टे.मध्ये मानवी तस्करी जागृती दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी न्या. क्यु.यु.एन शरवरी होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, सह.पोलीस निरीक्षक अंकुश जाधव, विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष योगेश पाटील, जिया शेख, पोलीस कर्मचारी वर्ग, नागरिक उपस्थित होते.
यावेळी मानवी तस्करी गुन्ह्याबद्दल बोदवड तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अर्जुन पाटील, सचिव ॲड. धनराज प्रजापती, ॲड.के.एस.इंगळे, ॲड. किशोर महाजन यांनी मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी केस वॉच राजेंद्र महाजन, पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन तथा आभार शैलेश पडसे यांनी मानले.