साईमत, मलकापूर : प्रतिनिधी
शहरात अनेक ठिकाणी जुलै २०२३ मध्ये अतिवृष्टीमुळे घराघरात पुराचे पाणी शिरले. भिंती पडल्या, छत कोसळले, याबाबत वंंचित बहुजन आघाडीतर्फे वारंवार निवेदन दिली आहे. तसेच चौकशीचे आदेश झाले. परंतु तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी अद्यापही कोणतीही नुकसान भरपाई दिलेली नाही. त्यामुळे शहर उपाध्यक्ष जफर खान तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते व्यथित होऊन परत नुकसान भरपाई नागरिकांना मिळावी म्हणून निवेदन दिले. त्यावर काही निर्णय न झाल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते बाळासाहेब दामोदर, जिल्हा संघटक भाऊराव उबाळे, तालुकाध्यक्ष सुशील मोरे यांच्या नेतृत्वात जेव्हापर्यंत अतिवृष्टी धारकांना नुकसान भरपाई मिळणार नाही, तोपर्यंत उपोषण कायम राहणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते बाळासाहेब दामोदर यांनी सांगितले.