साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील जामदा येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर नुकतेच घेण्यात आले. शिबिराचा समारोप राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लिमिटेड संस्थेचे चेअरमन डॉ. विनायक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. यावेळी संस्थेचे संचालक महारू पाटील, सुनील देशमुख, महेश चव्हाण, सोनूसिंग राजपूत, संचालिका अलका बोरसे, कर्मचारी सदस्य हरीश महाले, निमंत्रित सदस्य अनिल कोतकर, डॉ. पायल पवार, प्राचार्य डॉ.एस. आर.जाधव, उपप्राचार्य डॉ. जी.डी.देशमुख, कार्यक्रम अधिकारी डॉ.आर.पी. निकम, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ.व्ही.आर.लकवाल, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. उज्ज्वला नन्नवरे, गटप्रमुख…
Author: Sharad Bhalerao
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्यानंतर अजित पवार यांच्या गटातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी चाळीसगावमध्ये जल्लोष साजरा केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानंतर अजित पवार गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल झाले. निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे जल्लोष करत स्वागत करण्यात आले. फटाके फोडून आणि एकमेकांना पेढे वाटून आनंद साजरा केला. सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णकृती पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. यावेळी ‘एकच पर्व, अजित पर्व’, ‘अजितदादा तुम आगे बढो’ अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या.…
साईमत, धानोरा, ता. चोपडा : वार्ताहर येथुन जवळील चोपडा तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या अडावदला कार्यान्वित ३३ के.व्ही. वीज उपकेंद्राच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या चार-पाच महिन्यांपासून पंचक्रोशीतील वटार आणि खर्डी येथील ए.जी.आर. म्हणजेच कृषी पंपाना पुरविण्यात येणारा वीज पुरवठा कमी दाबाचा व बेभरवशाचा झाला आहे. गेल्या आठवड्याभरापासून तर दोन्ही फिडरवरील शेतीचा वीज पुरवठा खंडीत स्वरूपाचा असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी, ७ फेब्रुवारी रोजी अडावद वीज उपकेंद्राला टाळे ठोकले. आठवड्याभरापासून वटार-खर्डी शिवारातील रात्रीचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. तसेच अधिकाऱ्यांविना अडावद सबस्टेशनचा कारभार ‘रामभरोसे’ झाल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे. बुधवारी रोजी सकाळी ८ वाजेपासून कमळगाव रस्त्यावरील अडावद…
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील खडकदेवळा खु. येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना एककाच्यावतीने विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेविकांनी शिबिराचा लाभ घेतला. शिबिराच्या पाचव्या दिवशी महाविद्यालयाच्या कार्यालयाकडून मंगळवारी, ६ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९ वाजता विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज भरणे, गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरण, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती वितरण, द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना बारावी गुणपत्रक वितरण, बोनाफाईड प्रमाणपत्र वितरण, बस पासेस अर्ज…
साईमत, बोदवड : प्रतिनिधी अखिल हटकर पाटील समाज बहुउद्देशिय संस्था, जळगाव यांच्यातर्फे बोदवड तालुक्यातील श्री हनुमान मंदिर शिरसाळा येथे नुकताच महारोजगार मेळावा घेण्यात आला. मेळाव्याला महाराष्ट्रातील कंपन्यांचे ४० प्रतिनिधी हजर राहून विविध क्षेत्रातील ५०९ युवकांची मुलाखत घेऊन त्यापैकी २०७ युवकांना जागीच नियुक्तीपत्र देण्यात आले. जीवनात आल्यानंतर समाजासाठी काहीतरी चांगले काम करण्याची इच्छा आहे. म्हणून आजचा सर्वात ज्वलंत प्रश्न आहे सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे. कारण तरुण मुले शिकली आहे पण नोकरी मिळत नाही. नोकरी नाही म्हणून पुढचा प्रश्न मार्गी लागत नाही. त्यामुळे मानसिक परिस्थिती अतिशय अवघड होत असल्याने अनेक जण आपल्या आयुष्यात कसे होईल, या विचाराने भरडले जात…
साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर विमुक्त जाती-अ प्रवर्गातील मागील अनेक वर्षापासून बिगर मागास असलेल्या लोकांनी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या घुसखोरी केलेली असल्यामुळे विमुक्त जाती-अ प्रवर्गात असलेल्या मूळ लाभार्थ्यांवर सातत्याने अन्याय होत आहे. शैक्षणिक तसेच नोकरीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. साधारणतः दरवर्षी नोकर भरतीत वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रवेश प्रक्रिया पाच हजारापेक्षा जास्त बोगस लोकांनी, अवैधरित्या जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र मिळवून मोठ्या प्रमाणात विमुक्त जाती-अ प्रवर्गात घुसखोरी केलेली आहे. त्यामुळे मूळ जातीतील लाभार्थी विद्यार्थी व बेरोजगार युवकांवर अन्याय होत आहे. यासाठी मंगळवारी, ६ फेब्रुवारी २०२४ रोजी पहूर येथे गोरसेना व विमुक्त जाती-अ प्रवर्गातील सकल संघटनेच्यावतीने हजारोच्या संख्येने जन आक्रोश…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी अमळनेरातील नुकत्याच झालेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आर. डी. कोळी यांनी संपादित केलेला महाराष्ट्राचा प्रातिनिधीक काव्यसंग्रह ‘सलाम’ पुस्तकाचे ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या काव्यसंग्रहात महाराष्ट्रातून प्राप्त झालेल्या कवितांमधून २७ जिल्ह्यातील १०१ नवोदित ते नामवंत कवींच्या कवितांचा समावेश आहे. हा काव्यसंग्रह राष्ट्रप्रेम, सामाजिक भान व सामाजिक प्रश्न मांडणारा आहे, अशा भावना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुस्तकाला दिलेल्या शुभेच्छा पत्रात व्यक्त केल्या आहेत.तसेच संपादक आर. डी. कोळी यांचे कौतुकही त्यांनी केले आहे. अथर्व पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या पुस्तकाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी अमळनेर येथे नुकत्याच झालेल्या अठराव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात ‘खान्देशातील आंबेडकरी चळवळ खंड २’ चे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा.चंद्रकांत वानखेडे (माजी संमेलनाध्यक्ष १७ वे विद्रोही साहित्य संमेलन, वर्धा), प्रा.डॉ. वासुदेव मुलाटे (संमेलनाध्यक्ष १८ वे विद्रोही साहित्य संमेलन, अमळनेर), प्रतिमा परदेशी, प्रा.गौतम निकम, प्रा.लीलाधर पाटील, मुकुंद सपकाळे, सतीश निकम आदी मान्यवर उपस्थित होते. हा ग्रंथ चळवळीला, कार्यकर्त्यांला, वाचकाला, संशोधकाला, तरूणांना निश्चितच दिशा देईल, अशी आशा प्रा.गौतम निकम यांनी व्यक्त केली. ‘खान्देशातील आंबेडकरी चळवळ खंड २’चे संपादक प्रा.गौतम निकम, डॉ.प्रा.सतीश मस्के, वैशाली निकम आहेत. हा ग्रंथ खान्देशातील आंबेडकरी चळवळीचा इतिहास उलगडून दाखविणारा आहे. त्यात…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी जीवन हे अनेक समस्यांच्या काट्याकुट्यांनी भरलेले आहे. त्यावर पुढे पुढे चालत राहणे हा एकच पर्याय आहे. त्यात गरिबीचे ओझे आडवे येऊ देऊ नका, ते बाजूला सारून शैक्षणिक प्रगती साधल्यास तुम्ही एक दिवस सुखाची फळे नक्की चाखणार. त्यामुळे खचून न जाता जीवनात शैक्षणिक संघर्ष करा, असे मार्गदर्शन डॉ.सतिष बेहडे यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना केले. ते कमला नेहरू मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. त्रिशा फाउंडेशनच्या माध्यमातून अध्यक्ष डॉ.सतिष बेहडे यांनी गरजू आदिवासी विद्यार्थिनींची भेट घेत प्रत्येकास ब्लॅकेटसह खाऊचे वाटप करून माणुसकीचे दर्शन घडविले. याप्रसंगी डॉ.प्रियंका बेहडे, उद्योगपती राजेंद्र मणियार, राधिका मणियार, जयेश बेहडे, संस्थेचे अध्यक्ष महेश शिरसाठ,…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी सायंकाळी ७ वाजता सादर झालेल्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारीत ‘जाऊ देवाचिया गावा’ महानाट्याने रसिकगण भावविभोर झाले होते. खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी व्यासपीठावर झालेले महानाट्य पाहण्यासाठी रसिकांनी गर्दीचा उच्चांक मोडला. सभागृह रसिकांच्या उपस्थितीने हाऊसफुल्ल झाले होते. सायंकाळी साडे सात वाजेला सुरू झालेले महानाट्य रात्री सव्वा बारा वाजेपर्यंत चालले. नाटकाचा समारोप होईपर्यंत सभागृह हाऊसफुल्ल होते. जवळपास चार हजार प्रेक्षकांनी हे नाटक प्रत्यक्ष पाहिले. नाटकाचे थेट प्रसारण ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अमळनेर या यूट्यूब चॅनलवरून दाखविण्यात येत होते. त्यामुळे बहुतांश नागरिकांनी घरी बसून महानाट्याचा लाभ घेतला.…