शिरसाळाला महारोजगार मेळाव्याला युवकांचा प्रतिसाद

0
2

साईमत, बोदवड : प्रतिनिधी

अखिल हटकर पाटील समाज बहुउद्देशिय संस्था, जळगाव यांच्यातर्फे बोदवड तालुक्यातील श्री हनुमान मंदिर शिरसाळा येथे नुकताच महारोजगार मेळावा घेण्यात आला. मेळाव्याला महाराष्ट्रातील कंपन्यांचे ४० प्रतिनिधी हजर राहून विविध क्षेत्रातील ५०९ युवकांची मुलाखत घेऊन त्यापैकी २०७ युवकांना जागीच नियुक्तीपत्र देण्यात आले.

जीवनात आल्यानंतर समाजासाठी काहीतरी चांगले काम करण्याची इच्छा आहे. म्हणून आजचा सर्वात ज्वलंत प्रश्‍न आहे सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे. कारण तरुण मुले शिकली आहे पण नोकरी मिळत नाही. नोकरी नाही म्हणून पुढचा प्रश्‍न मार्गी लागत नाही. त्यामुळे मानसिक परिस्थिती अतिशय अवघड होत असल्याने अनेक जण आपल्या आयुष्यात कसे होईल, या विचाराने भरडले जात आहे. त्यासाठी सामाजिक स्थिती लक्षात घेऊन समाजातील युवकांना रोजगानिर्मिती कशी करता येईल, यानिमित्त समितीची बैठक घेऊन महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते.

नामांकित कंपन्यांचे मुख्य प्रतिनिधी बोलाविण्याची जबाबदारी संचालक किरण पाटील यांनी स्वीकारली होती. उर्वरित नियोजनाची जबाबदारी चंदन पाटील, श्रीकृष्णा पाटील, गजानन गव्हारे, गणेश शिंदे, शिरीष पाटील, प्रशांत पाटील, प्रकाश पाटील या तरुण मंडळींनी स्वीकारली. तसेच संजय पाटील, डी.के.पाटील, राजेंद्र नरोटे यांनी मार्गदर्शन केले. विश्‍वनाथ पाटील, त्र्यंबक पाटील, भरत गव्हारे, अमरदीप पाटील, सुभाष जेढर, नेवडे पाटील, पुरुषोत्तम पाटील, डॉ.शरद काळे, पुंजाजी पाटील, प्रभाकर पाटील, वामन पाटील, संतोष पाटील ही वरिष्ठ मंडळी पाठीशी खंबीरपणे उभी राहून महारोजगार मेळावा आयोजित केला.

कार्यक्रमाला संस्थेतील सहकारी उमेश पाटील, योगेश पाटील, अनिल पाटील, प्रवीण पाटील, राजू पाटील मोहन यांनी सहकार्य केले. मेळाव्याला समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाची सर्वात मोठी जबाबदारी भोजनाची व्यवस्था बोदवड पंचायत समितीचे माजी सभापती भारत पाटील हिंगणे, पुंजाजी पाटील सरपंच कोल्हाडी यांनी स्वीकारली. मेळाव्यात अध्यक्षीय भाषण विश्‍वनाथ पाटील यांनी केले. प्रास्ताविक श्रीकृष्ण भाऊसाहेब, सूत्रसंचालन गजानन गव्हारे तर आभार चंदन पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here