एस.एम.एम. महाविद्यालयाच्या रासेयोचे खडकदेवळा खु.ला शिबिर

0
1

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

तालुक्यातील खडकदेवळा खु. येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना एककाच्यावतीने विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेविकांनी शिबिराचा लाभ घेतला.

शिबिराच्या पाचव्या दिवशी महाविद्यालयाच्या कार्यालयाकडून मंगळवारी, ६ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९ वाजता विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज भरणे, गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरण, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती वितरण, द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना बारावी गुणपत्रक वितरण, बोनाफाईड प्रमाणपत्र वितरण, बस पासेस अर्ज वितरण, ओळखपत्र वितरण व मतदान नोंदणी कार्यक्रम अशा विविध सेवांसाठी शिबिराचे आयोजन केले आहे.

शिबिराचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी प्रा. राजेश वळवी, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. क्रांती सोनवणे, सह कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील भोसले, वरिष्ठ लिपिक ऋषिकेश ठाकूर, अभिषेक जाधव, संतोष महाजन, रवींद्र चौधरी, नाना पाटील, सुधाकर पाटील, यश सूर्यवंशी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here