Author: Sharad Bhalerao

साईमत, चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील जि.प.च्या मजरे हिंगोणा उच्च प्राथमिक शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वर्षभरात झालेल्या विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देवून गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा दीपाली बाविस्कर होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नंदकिशोर सांगोरे, माजी सभापती तुकाराम बाविस्कर, सरपंच कल्पना पाटील, लासुरचे केंद्रप्रमुख उत्तम चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते वसंत पाटील, रवींद्र पाटील, प्रदीप पाटील, साहेबराव पाटील, मुरलीधर माडे, ग्रामसेवक कांतीलाल कोळी, प्रमोद सुर्यवंशी, विवेकानंद धनगर, सुरेश बाविस्कर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्या रिना भील, विजय धनगर, जयसिंग सोनवणे, शितल पाटील, माया पाटील, ज्योती वानखेडे, प्रियंका…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी संचलित बी.पी. आर्टस्‌ एस. एम. ए. सायन्स आणि के.के.सी. कॉमर्स कॉलेज, चाळीसगाव येथील रिसर्च अकादमीतर्फे आयोजित एक दिवशीय शोधनिबंध लेखनासह प्रकाशनावर सोमवारी, ४ मार्च रोजी कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेला ७५ प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही. बिल्दिकर, उपप्राचार्य डॉ. ए. व्ही. काटे, उपप्राचार्य डी. एल. वसईकर, प्रा. डॉ. ए.टी. कळसे, माजी विभाग प्रमुख, प्राणीशास्त्र विभाग, य. ना. चव्हाण महाविद्यालय, चाळीसगाव प्रा. डॉ. जितेंद्रसिंग जमादार, जी.एच.रायसोनी इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जळगाव व रिसर्च अकादमीचे प्रमुख प्रा. डॉ. अरुण सावरकर, तसेच रिसर्च अकादमीचे सदस्य प्रा. डॉ. राहुल कुलकर्णी, प्रा.…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील ‘संस्कार भारती’तर्फे भरतमुनी जयंतीनिमित्त नुकताच भरतमुनी स्मरण दिन साजरा करण्यात आला. सुरुवातीला दीप प्रज्ज्वलन, नटराज पूजन आणि भरतमुनी प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी देवगिरी प्रांत नाट्यविधाप्रमुख श्रीमती सुनिता घाटे, जळगाव विभाग प्रमुख रवींद्र देशपांडे, चाळीसगाव समितीचे नाट्यविधाप्रमुख डॉ.निलेश देशपांडे, अध्यक्ष गितेश कोटस्थाने, उपाध्यक्ष शंकर पाठक सचिव विवेक घाटे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संस्कार भारती गीताने झाली. यानंतर डॉ.निलेश देशपांडे यांनी नाट्यशास्त्राचा इतिहास मराठी नाटक आणि रंगभूमीचा उगम व इतिहास याविषयी उपस्थितांना माहिती दिली. यावेळी शुभांगी संन्यासी यांनी ‘संवेदनशीलता’ स्वलिखित लेखाचे अभिवाचन केले. उपाध्यक्ष आणि संगीत विभाग प्रमुख शंकर पाठक यांनी ‘गुंतता हृदय’ हे नाट्यगीत सादर…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग बंद या केंद्र शासनाच्या येऊ घातलेल्या कायद्यासाठी जो मसुदा तयार करण्यात आला. त्याच्या विरोधात पीटीए कोचिंग क्लासेस असोसिएशनने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर ४ मार्च रोजी एकाच दिवशी एकाचवेळी तहसीलदार, जिल्हाधिकारी, मंत्री, आमदार आणि खासदार यांना निवेदने दिली. केंद्र सरकार एक नवीन कायदा आणू इच्छित आहे. त्या कायद्याच्या आधारे १६ वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग नाही असा हेतू मांडण्यात आला आहे. ‘कोचिंग मुक्त भारत’ असा हेतू डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकार हा कायदा आणू पाहत आहे. कायद्यामुळे अगदी गाव खेड्यापासून ते राजधानीच्या शहरापर्यंत या कायद्याच्या विरोधात प्रत्येक जण आश्‍चर्य व्यक्त करीत आहेत. एवढेच नव्हे तर…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील शेंदुर्णी येथील रहिवासी सुभाष ओंकार अहिरे यांना त्यांच्या कृषी खात्यातील २७ वर्षाच्या सेवेत दुसऱ्यांदा पदोन्नती मिळाली. जळगाव जिल्ह्यातील चार तालुक्यातील १०७ गावात त्यांनी सेवा बजावली आहे. नेरी येथे कृषी मंडळ अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. अतिशय गरीबीतून शिक्षण घेत त्यांनी हे यश संपादन केले आहे. ‘शेतकऱ्यांच्या सेवार्थ’ हे ब्रीदवाक्य मनाशी बाळगून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ते कामे करतात. शिस्तप्रिय असे कर्तव्यदक्ष कर्मचारी लोकांमध्ये जाऊन काम करण्यासाठी सुभाष अहिरे यांची ओळख आहे. जामनेर येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे सुभाष अहिरे यांच्या पदोन्नतीबद्दल उपविभागीय कृषी अधिकारी रमेश जाधव, तालुका कृषी अधिकारी डॉ. अभिमन्यू चोपडे, पंचायत समितीचे…

Read More

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी अंतर्नाद प्रतिष्ठानच्या महावक्तृत्व स्पर्धेतून भविष्यात बालवक्ते तयार होतील. अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे आयोजित महावक्तृत्व स्पर्धा बालवक्त्यांचे हक्काचे व्यासपीठ ठरले आहे, असा मान्यवरांचा सूर अंतर्नाद प्रतिष्ठान आयोजित जिल्ह्यास्तरीय महावक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात उमटला. तसेच शिवाजी महाराजांचे प्रथम गुरु जिजाबाई होत्या. त्यांनीच शिवरायांना घडविले. आपल्या मुलांशी रोज संवाद साधा. संस्कार हे करायचे नसतात तर आपल्या कृतीतूनच होत असतात. पालकांनी आपल्या मुलांचे मित्र झाले पाहिजे, अशा भावना तहसीलदार नीता लबडे यांनी व्यक्त केल्या. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी होते. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार नीता लबडे, ताप्ती एजुकेशन सोसायटीचे चेअरमन मोहन फालक, श्रीकांत जोशी, दिनकर जावळे, सुरेश अहिरे उपस्थित होते. अंतर्नाद…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी ‘महोत्सव चित्रपटाचा सन्मान कलाकारांचा’ कार्यक्रमाची सुरुवात १ मार्च २०२४ रोजी करण्यात आली. जळगाव शहरातील रंगकर्मीच्या कार्याची फोटोंची प्रदर्शनी नयनतारा मॉल येथे उभारण्यात आली आहे. याठिकाणी पाचव्या मजल्यावर स्टार सिनेमामध्ये रोज राष्ट्रीय पातळीचे पुरस्कार मिळविलेले काही दिग्गजही मार्गदर्शक म्हणून लाभले. अनेक शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल होतात. मात्र, महोत्सवात १ मार्च २०२४ रोजी ‘में अटल हूं’, ‘दिल, दोस्ती, दिवानगी’ नंतर भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष समीर दीक्षित, शिरीष राणे उपाध्यक्ष यांनी चर्चासत्र घेतले. २ मार्च २०२४ रोजी ‘पिल्लू बॅचलर्स’, ‘सात सोबती’ ह्या चित्रपटानंतर लेखक-दिग्दर्शक तानाजी घाडगे, दिग्दर्शक, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त रमेश मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. ३ मार्च २०२४ रोजी…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी उत्तर महाराष्ट्र विभागीय तंत्र (प्रोजेक्ट) प्रदर्शन अंतर्गत ‘इनोव्हेशन २०२४’ आर.ओ. निकम खासगी आयटीआय, गोंदूर बायपास रोड धुळे येथे आयोजित केले होते. प्रदर्शनात व्ही. एन. पाटील खासगी आयटीआय, नवलनगर संस्थेच्या प्रशिक्षणार्थीनी ‘सोलर ट्रेकर’ उपकरण सादर केले होते. त्या उपकरणाला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष विजय नवल पाटील यांनी सर्व सहभागी प्रशिक्षणार्थ्यांसह स्टाफचे कौतुक केले. यात उत्तर महाराष्ट्र विभागातील अनेक संस्थांनी सहभाग घेतला होता. सोलर ट्रेकरबद्दल माहिती देताना संस्थेचे निदेशक सिद्दीक खान म्हणाले की, उपकरणामुळे सोलर वीज निर्मिती २५ टक्क्यांनी वाढते. उपकरणासाठी कुठल्याही इलेक्ट्रॉनिक कॅम्पोनंटची आवश्‍यकता नसते. भविष्यात अशा उपकरणाची सोलर वीज निर्मितीसाठी आवश्‍यकता आहे. सोलर वीज निर्मितीसाठी…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी येथील भाजपा शहर कार्यकारिणीच्या सदस्यपदी ग्रामविकास मंत्री ना.गिरीष महाजन यांच्या आदेशावरुन अजय जयराम पाटील यांची नियुक्ती केली आहे. त्यांना माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर यांच्या हस्ते जामनेर येथील एका कार्यक्रमात नुकतेच नियुक्तीपत्र देण्यात आले. जामनेर शहरातील वार्डनिहाय पक्ष वाढीसाठी ते प्रयत्न करणार असल्याची ग्वाही अजय पाटील यांनी दिली. यावेळी माजी नगराध्यक्षा साधना महाजन, जामनेर तालुका एज्युकेशन संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, माजी शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक आतिष झाल्टे, शहराध्यक्ष रवींद्र झाल्टे, ना.महाजन यांचे स्वीय सहाय्यक दीपक तायडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. अजय पाटील यांची नियुक्ती झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Read More

साईमत, चोपडा : प्रतिनिधी येथील दि चोपडा पीपल्स को.ऑप बँक लि. चोपडा, सार्वजनिक सेवा ट्रस्ट चोपडा आणि घोडगाव येथील एस.एन.आर.जी.इंग्लिश मीडियम स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने घोडगाव ते कुसुंबे मॅरेथॉन स्पर्धेचे अनेर परिसरातील इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी सोमवारी, ४ मार्च रोजी आयोजन केले होते. स्पर्धेत अनेर परिसरातील चिमुकले विद्यार्थी स्वतःच्या आरोग्यासाठी धावले. स्पर्धेत परिसरातील जिल्हा परिषद शाळा गलंगी, वेळोदे, घोडगाव, वाळकी, अनवर्दे, विटनेर येथील विद्यार्थ्यांनी तर घोडगाव हायस्कुल, एस.एन.आर.जी. इंग्लिश मेडीयम स्कुल, गलंगी इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा शुभारंभ घोडगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांचे प्रतिमापूजन व परिसरातील लहान बालकांना पोलिओ डोस दिल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी…

Read More