नेरीला कृषी मंडळ अधिकारीपदी सुभाष अहिरे यांची पदोन्नती

0
11

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील शेंदुर्णी येथील रहिवासी सुभाष ओंकार अहिरे यांना त्यांच्या कृषी खात्यातील २७ वर्षाच्या सेवेत दुसऱ्यांदा पदोन्नती मिळाली. जळगाव जिल्ह्यातील चार तालुक्यातील १०७ गावात त्यांनी सेवा बजावली आहे. नेरी येथे कृषी मंडळ अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. अतिशय गरीबीतून शिक्षण घेत त्यांनी हे यश संपादन केले आहे.

‘शेतकऱ्यांच्या सेवार्थ’ हे ब्रीदवाक्य मनाशी बाळगून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ते कामे करतात. शिस्तप्रिय असे कर्तव्यदक्ष कर्मचारी लोकांमध्ये जाऊन काम करण्यासाठी सुभाष अहिरे यांची ओळख आहे. जामनेर येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे सुभाष अहिरे यांच्या पदोन्नतीबद्दल उपविभागीय कृषी अधिकारी रमेश जाधव, तालुका कृषी अधिकारी डॉ. अभिमन्यू चोपडे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी राजू ढेपले, कृषी अधिकारी एन.आर.पाटील यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी धनश्री चासकर, मंडळ कृषी अधिकारी निता घार्गे, सर्व कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, कार्यालयीन कर्मचारी, कृषी क्षेत्रातील उद्योजक, युवा उद्योजक उपस्थित होते. अहिरे यांच्या पदोन्नतीबद्दल त्यांचे सर्व स्तरावरातून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here