जामनेरला भाजपा शहर कार्यकारिणीच्या सदस्यपदी अजय पाटील

0
2

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

येथील भाजपा शहर कार्यकारिणीच्या सदस्यपदी ग्रामविकास मंत्री ना.गिरीष महाजन यांच्या आदेशावरुन अजय जयराम पाटील यांची नियुक्ती केली आहे. त्यांना माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर यांच्या हस्ते जामनेर येथील एका कार्यक्रमात नुकतेच नियुक्तीपत्र देण्यात आले. जामनेर शहरातील वार्डनिहाय पक्ष वाढीसाठी ते प्रयत्न करणार असल्याची ग्वाही अजय पाटील यांनी दिली.

यावेळी माजी नगराध्यक्षा साधना महाजन, जामनेर तालुका एज्युकेशन संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, माजी शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक आतिष झाल्टे, शहराध्यक्ष रवींद्र झाल्टे, ना.महाजन यांचे स्वीय सहाय्यक दीपक तायडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. अजय पाटील यांची नियुक्ती झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here