साईमत, चोपडा : प्रतिनिधी
तालुक्यातील जि.प.च्या मजरे हिंगोणा उच्च प्राथमिक शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वर्षभरात झालेल्या विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देवून गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा दीपाली बाविस्कर होत्या.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नंदकिशोर सांगोरे, माजी सभापती तुकाराम बाविस्कर, सरपंच कल्पना पाटील, लासुरचे केंद्रप्रमुख उत्तम चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते वसंत पाटील, रवींद्र पाटील, प्रदीप पाटील, साहेबराव पाटील, मुरलीधर माडे, ग्रामसेवक कांतीलाल कोळी, प्रमोद सुर्यवंशी, विवेकानंद धनगर, सुरेश बाविस्कर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्या रिना भील, विजय धनगर, जयसिंग सोनवणे, शितल पाटील, माया पाटील, ज्योती वानखेडे, प्रियंका पावरा, निता अहिरे यांच्यासह गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम बघून प्रेषक मंत्रमुग्ध झाले होते. लासुरचे केंद्रप्रमुख उत्तम चव्हाण यांनी शाळेच्या वर्षभरातील विविध उपक्रमांबाबत शिक्षक व विद्यार्थ्यांचे बक्षीसासह कौतुक केले. यशस्वीतेसाठी मोनेश बाविस्कर, धनराज बोरसे, प्रमोद पाटील, मनोहर बाविस्कर, भूषण पाटील, सोनाली साळुंखे, दिप्ती सनेर यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक पदवीधर शिक्षक तथा ग.स. चे संचालक योगेश सनेर, सुत्रसंचालन मुख्याध्यापिका वैशाली पवार तर आभार मोनेश बाविस्कर यांनी मानले.