चाळीसगाव महाविद्यालयात एकदिवसीय शोधनिबंध लेखनासह प्रकाशनावर कार्यशाळा

0
2

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

येथील चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी संचलित बी.पी. आर्टस्‌ एस. एम. ए. सायन्स आणि के.के.सी. कॉमर्स कॉलेज, चाळीसगाव येथील रिसर्च अकादमीतर्फे आयोजित एक दिवशीय शोधनिबंध लेखनासह प्रकाशनावर सोमवारी, ४ मार्च रोजी कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेला ७५ प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही. बिल्दिकर, उपप्राचार्य डॉ. ए. व्ही. काटे, उपप्राचार्य डी. एल. वसईकर, प्रा. डॉ. ए.टी. कळसे, माजी विभाग प्रमुख, प्राणीशास्त्र विभाग, य. ना. चव्हाण महाविद्यालय, चाळीसगाव प्रा. डॉ. जितेंद्रसिंग जमादार, जी.एच.रायसोनी इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जळगाव व रिसर्च अकादमीचे प्रमुख प्रा. डॉ. अरुण सावरकर, तसेच रिसर्च अकादमीचे सदस्य प्रा. डॉ. राहुल कुलकर्णी, प्रा. डॉ. सुनीता कावळे उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी प्राध्यापकांमध्ये संशोधनाची रुची वाढावी आणि आपले संशोधन पेपर उत्कृष्ट जर्नलमध्ये प्रकाशित व्हावे, यासाठी प्राध्यापकांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. पहिल्या सत्रात प्रा. डॉ. ए.टी. कळसे ह्यांनी संशोधन व त्यातील बारकावे, शोधनिबंध लेखन आणि प्रकाशन यावर उपयुक्त असे मार्गदर्शन केले. पुढील सत्रात डॉ. जितेंद्रसिंग जमादार ह्यांनी युजीसी केअरमध्ये शोधनिबंध कसे प्रकाशित करावे. तसेच शोधनिबंधातील उद्धरण आणि एच इंडेक्स कसा वाढवायचा, याबाबत मार्गदर्शन केले.

यशस्वीतेसाठी पृथ्वीराज पाटील, संजय जाधव यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक रिसर्च अकादमीचे प्रमुख प्रा. डॉ. अरुण सावरकर, सूत्रसंचालन प्रा. डॉ. राहुल कुलकर्णी तर प्रा. डॉ. सुनीता कावळे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here