शहाद्यात जैन समाजात घडला आदर्श विवाह ; विवाहाचे सर्वत्र कौतुक साईमत/शहादा/प्रतिनिधी : विवाहात रुढी परंपरेच्या नावाखाली होणारा अनाठायी खर्च… अशा सर्वच गोष्टी बाजूला सारुन शहादा येथील तिलोकचंद प्रकाशचंद जैन यांनी आपली सुकन्या नेतल जैन हिचा समाजातील ज्येष्ठ मंडळी, नातेवाईक तसेच वर पक्षाकडील मंडळीकडून संमती मिळवून साध्या पध्दतीने साखरपुड्याच्या कार्यक्रमातच ‘शुभमंगल’ लावून दिला आहे. अशा निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. राहाता येथील पारस जलचे संचालक तिलोकचंद प्रकाशचंद जैन यांची कन्या आणि पत्रकार भवरलाल प्रकाशचंद जैन यांची पुतणी नेतल जैन हिचा सोनगीर येथील सोन्या-चांदीचे व्यापारी सुभाषचंद उनमचंद उतमचंद बाफना यांचे सुपुत्र चि. गौरव सुभाषचंद बाफना यांच्याशी विवाह निश्चित झाला होता. त्यानुसार अगोदर…
Author: Sharad Bhalerao
दोघा चोरट्यांना राजस्थानातून अटक ; जळगाव एलसीबीची कामगिरी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : गेल्या ९ एप्रिल रोजी जळगाव शहरातून चोरीला गेलेल्या तीन महागड्या चारचाकी वाहनांचा तब्बल महिन्याभरानंतर जळगाव पोलिसांनी छडा लावला आहे. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने राजस्थानमधील वाळवंटी प्रदेशातून या वाहनांचा शोध घेत दोन संशयितांना बुधवारी, ७ मे रोजी दुपारी १२ वाजता अटक केली आहे. तसेच दोन चोरीच्या गाड्याही हस्तगत केल्या असल्याचे सांगण्यात आले. वाहनांच्या चोरी प्रकरणी शहरातील जिल्हापेठ, रामानंदनगर आणि जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले होते. दरम्यान, एलसीबीच्या यशस्वी कामगिरीमुळे वाहनचोरीच्या गुन्ह्याला यश मिळाले आहे. वाहनांची चोरी प्रकरणी गुन्हे झाल्यानंतर, स्थानिक पोलिसांच्या मदतीने तपास सुरू होता. त्याचवेळी एलसीबीचे…
रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील पिंप्राळा हुडको शिवारात सुरू असणाऱ्या बांधकामाच्या ठिकाणाहून बांधकाम व्यावसायिकाचे लोखंडी पत्रे व साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ७ मे रोजी सकाळी घडली होती. त्यानंतर याप्रकरणी गुरूवारी, ८ मे रोजी अज्ञात चोरट्यांविरुध्द रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. प्रवीण अशोक महाजन (वय ३५, रा. गणेश कॉलनी) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. ते बांधकामाचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. गेल्या ६ ते ७ मे रोजीच्या कालावधीत त्यांच्या पिंप्राळा येथील बांधकामाच्या ठिकाणाहून अज्ञात चोरट्यांनी लोखंडी पत्रे व इतर साहित्य चोरून नेले आहे. हा प्रकार ७ मे रोजी सकाळी समोर…
समुपदेशनाने २१ आरोग्य सेवकांना पदोन्नती ; जि.प.च्या प्रशासनाचे कौतुक साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जळगाव जिल्हा परिषदेअंतर्गत विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असणाऱ्या आरोग्य सेवकांच्या पदोन्नतीचा अनेक दिवसांपासून रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी स्वतः समुपदेशन घेऊन शुक्रवारी, ९ मे रोजी सकाळी ११ वाजता झालेल्या बैठकीत २१ आरोग्य सेवकांना आरोग्य सहाय्यकपदी पदोन्नती दिली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्यासह आरोग्य विभागातील इतर अधिकारीही उपस्थित होते. सीईओ मिनल करनवाल यांच्या सक्रिय भूमिकेमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. ‘ही दिवाळी नवीन घरी’ अशा महत्त्वाकांक्षी योजनेनंतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्नही…
मनसेतर्फे पोलीस अधीक्षकांना मागणीचे निवेदन सादर साईमत/जळगाव/प्रतिनिधी : राज्य महामार्ग क्रमांक ६ वरील कालिका माता परिसरात होणारे अपघात तसेच घातपात, अवैध धंदे सुरू असल्याने त्याठिकाणी लवकर पोलीस प्रशासन पोहचत नाही. त्यासाठी कालिका माता परिसरात एक पोलीस चौकी उभारण्यात यावी. त्यामुळे होणारे अपघात कमी होऊन बेशिस्त ट्रॅफिकला आळा बसण्यास मदत होईल. त्यामुळे लवकरात लवकर याठिकाणी पोलीस चौकी उभी राहील, अशी अपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देतेवेळी मनसेचे जळगाव जिल्हाध्यक्ष ॲड.जमील देशपांडे, शहर उपाध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, जिल्हा संघटक राजेंद्र निकम, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, चेतन पवार, खुशाल ठाकूर, प्रकाश जोशी,…
उच्च शिक्षितांसह बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी साईमत/जळगाव/प्रतिनिधी । शहरातील गोदावरी फाउंडेशनच्या गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे शनिवारी, १० मे रोजी सकाळी १० वाजता भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्यात यूकेबी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही कंपनी विविध पदांसाठी भरती करणार आहे. मेळाव्यात बीई/बी.टेक (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स), डिप्लोमा (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स), कोणतेही पदवीधर, आयटीआय (सर्व ट्रेड्स) आणि बारावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध आहे. कंपनीद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन दिले जाणार आहे. बीई/बी.टेक उमेदवारांसाठी २० हजार रुपये, डिप्लोमा उमेदवारांसाठी १८ हजार रुपये, आयटीआय उमेदवारांसाठी १६ हजार रुपये आणि बारावी पास उमेदवारांसाठी १५ हजार रुपये प्रति महिना वेतन निश्चित…
तहसीलदार महेंद्र माळी यांची माहिती साईमत/धुळे/प्रतिनिधी : तालुक्यात मंगळवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपीटमुळे अनेक गावात झालेल्या नुकसानाची प्राथमिक पाहणी करून पंचनामे करण्याचे काम तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यामार्फत सुरू केल्याची माहिती शिरपुरचे तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिली. जिल्ह्यात मंगळवारी अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतपिके, घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री जयकुमार रावल यांनी जिल्हा प्रशासनास दिले होते. त्याचबरोबर आ.अमरिशभाई पटेल, आ.काशिराम पावरा यांनीही पंचनामे करण्याबाबत सूचित केले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील तहसिलदारांना नुकसानीचे पंचनामे त्वरित करुन अहवाल सादर करण्याबाबत कळविले होते. त्यानुसार शिरपूर तालुक्यातील करवंद,…
अधिकाऱ्यासह ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे घडला अपघात साईमत/नवापूर/प्रतिनिधी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील वाकीपाडा पुलावर महामार्ग प्राधिकरण विभागाच्या हलगर्जीपणामुळे भीषण अपघात घडल्याची घडून युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. त्याच्या सोबत असणारा युवक गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, अधिकाऱ्यासह ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे एक निर्दोष वाहन चालकाचा मृत्यू झाला असून ह्याला सर्वस्वी जबाबदार ठेकेदार आणि महामार्ग प्रशासन अधिकारी आहे. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे. सविस्तर असे की, गुजरात राज्यातील बडोदा येथील रहिवासी आशिष अशोक वसावा (वय अंदाजे ४०) हा दुचाकीने (क्र.जी. जे.०६ जेएन ३८०१) धुळेकडून सुरतकडे जात असताना वाकीपाडा येथील वाहतूक बंद असलेल्या पुलांच्या अलीकडे मातीच्या ढिगाऱ्याचा अंदाज न…
रोहयोच्या कामांसह घनकचरा डेपोचीही केली पाहणी साईमत/नवापूर/प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मित्ताली सेठी ह्या बुधवारी नवापूर दौऱ्यावर असताना नगर परिषदेच्या कार्यालयीन कामकाजाची आढावा बैठक घेतली. गेल्या महिन्याभरापासून घनकचरा व्यवस्थापन ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची प्रसार माध्यमातून माहिती मिळाल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी नवापूर नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेऊन घनकचरा व्यवस्थापन डेपोचीही पाहणी केली. यावेळी नवापुरचे तहसीलदार दत्तात्रय जाधव, मुख्याधिकारी मयूर पाटील उपस्थित होते. नवापूर येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश येवले यांनी घनकचरा व्यवस्थापन ठेकेदाराच्या पुराव्यासह जिल्हाधिकारी कार्यालय तसेच लोकशाही दिनात तक्रारी दाखल केल्या होत्या. त्याचीच दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी घनकचरा डेपोची पाहणी करत आढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांची कान उघाडणी केली. ठेकेदाराला…
कृषी विभागाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन साईमत/जामनेर/प्रतिनिधी : येथील पंचायत समितीच्या सभागृहात कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामपूर्व कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली. अध्यक्षस्थानी नाशिक विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर होते. कार्यशाळेत कृषी विभागाचे सुनील गायकवाड, अकिल तडवी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया आणि बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिके करून दाखवली. सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा आत्मा आहे. तो टिकविण्यासाठी नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन द्यावे. तसेच बीज प्रक्रियेचे महत्व नमूद करताना बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करू नका, असे आवाहन संभाजी ठाकूर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले. पंचायत समितीचे कृषी अधिकारी ढेपले यांनी बियाणे खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी. तसेच प्रतिबंधित एचटीबीटी वाण वापरु नका,…