शहाद्यात जैन समाजात घडला आदर्श विवाह ; विवाहाचे सर्वत्र कौतुक
साईमत/शहादा/प्रतिनिधी :
विवाहात रुढी परंपरेच्या नावाखाली होणारा अनाठायी खर्च… अशा सर्वच गोष्टी बाजूला सारुन शहादा येथील तिलोकचंद प्रकाशचंद जैन यांनी आपली सुकन्या नेतल जैन हिचा समाजातील ज्येष्ठ मंडळी, नातेवाईक तसेच वर पक्षाकडील मंडळीकडून संमती मिळवून साध्या पध्दतीने साखरपुड्याच्या कार्यक्रमातच ‘शुभमंगल’ लावून दिला आहे. अशा निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राहाता येथील पारस जलचे संचालक तिलोकचंद प्रकाशचंद जैन यांची कन्या आणि पत्रकार भवरलाल प्रकाशचंद जैन यांची पुतणी नेतल जैन हिचा सोनगीर येथील सोन्या-चांदीचे व्यापारी सुभाषचंद उनमचंद उतमचंद बाफना यांचे सुपुत्र चि. गौरव सुभाषचंद बाफना यांच्याशी विवाह निश्चित झाला होता. त्यानुसार अगोदर शहादा येथील सुपोषा घंट मंदिर (गावावाडी डोम) येथे साखरपुडा आयोजित केला होता. मात्र, साखरपुडाच्या कार्यक्रमात सर्वच सुविधा उपलब्ध असल्याने वर व वधू पक्षांकडील नातेवाईकांनी व साखरपुडासाठी आलेल्या ज्येष्ठ समाज बांधवांनी एकत्र येत साखरपुड्यातच लग्न लावून देण्यासाठी काय हरकत आहे? असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी वर-वधू दोन्ही पक्ष एकत्र बसून सल्लामसलत करत साखरपुड्यातच लग्न लावून देण्याचे ठरविण्यात आले. अशा स्तुत्य निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले. त्यामुळे दोन्ही परिवाराचा वेळ, श्रम वाचले आणि लग्न लावण्यास सहमती दिली.
यांची होती उपस्थिती
यावेळी ज्येष्ठ नेते तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. कांतिलाल टाटीया, वर पिता सुभाषचंद उत्तमचंद बाफना (रा. सोनगीर), वधू पिता तिलोकचंद प्रकाशचंद जैन, वराचे मोठे काका अशोकचंद, विजयकुमार, सतीशकुमार, सुरेशकुमार बाफना, महेन्द्र, अनिल, जितेंद्र बाफना, भाऊ अक्षयकुमार बाफना, दबाशी येथील वराची बहीण पायल, मेहुणे निखिलकुमार बरटीया, वधूचे पणजोबा मंगलचंद कोचर, आजोबा इंदरचंद, जितेंद्र कोचर, पत्रकार भवरलाल जैन, देवेंद्र कोचर, पारस कोचर, राकेश कोचर, डॉ.बी.डी.जैन, पारस पापडचे संचालक पारस कुचेरिया, महावीर पतपेढीचे अध्यक्ष रमेशचंद्र चोरडिया, उद्योगपती विनय गांधी, रमनलाल छाजेड, राजेंद्र छाजेड, ॲड. जसराज संचेती, डॉ. नेमीचंद लोढा, प्रा. संपत कोठारी, फुलचंद लोढा, खेतियाचे उद्योजक प्रकाशचंद बोरा, नरेंद्र बीनायक्या, मोतीलाल बाफना, भूषण बेद, जितेंद्र जगदाळे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.