Author: Saimat

साईमत जळगाव प्रतिनिधी जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांच्या पत्नी स्व. सौ. कांताबाई जैन यांच्या १८ व्या स्मृतिदिनानिमित्त यावर्षी ५१६ सहकाऱ्यांनी रक्तदान केले. शहरातील सेवाभावी संस्थांसह स्नेहाच्या शिदोरी या उपक्रमांतर्गत सुमारे ७०० जणांनी मिष्टान्नाचा लाभ घेतला. कंपनीच्या भारतभरातील प्रमुख आस्थापनांमध्ये करण्यात आले होते. यात टि.सी.पार्क व जैन प्लास्टिक पार्क येथे ३३१, फूड पार्क डिव्हाईन पार्क १४३, अलवर ०४ चित्तूर १६, बडोदा ०८, हैदराबाद १२ आणि कांताई नेत्रालय येथे ०२ सहकाऱ्यांनी रक्तदान केले. जळगावमध्ये जैन प्लास्टिक पार्क-बांभोरी, जैन फूडपार्क, कांताई मंगल कार्यालय येथे आणि भारतातील चित्तुर, बडोदा, हैद्राबाद, उदमलपेठ या ठिकाणी देखील जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी रक्तदान केले. प्लास्टिक पार्क, टाकरखेडा…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी ढोल ताशांचा गजर…शिवतांडवातुन शिवशक्ती जागर…अन् रोप व पोल मल्लखांबांची चित्तथरार प्रात्यक्षिके…त्याला मधुरभक्ती गितांची मैफलीची साथ.. आणि गोविंदा रे गोविंदा…जय घोष करत, महिलांचे एकावर एक मानवी मनोरे…व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी ने महिलांचे धाडस, साहस, आत्मविश्वासाची प्रचिती जळगावकरांनी अनुभवली.. भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन तर्फे आयोजित तरूणींसाठी दहीहंडी उत्सवात एनसीसी, नुतन मराठा महाविद्यालय, विद्या इंग्लीश स्कूल यांना दहीहंडी फोडण्याचा मान मिळाला. यात एनसीसी, नुतन मराठा महाविद्यालय यांनी दहिहंडी फोडली. विशेष पालखीने कृष्ण भगवान साकारलेला चिमुकला अथांग अजय डोहळे सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. काव्यरत्नावली चौकातील तरूणींची दहीहंडी प्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी मधुबन मे कन्हैया…, वो किसना है…, गोविंद बोलो हरी गोपाळ बोलो…, मोरी बन्सी बजे.इया… अशा विविध हिंदी मराठी रिमिक्स गीतांवर कृष्ण, राधा, गोपिका यांनी नृत्य केले.. निमित्त होते श्री कृष्ण जन्माष्टमी सोहळ्याचे.. गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे गुरुवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी दही हंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी व्यासपीठावर गोदावरी फाऊंडेशन चे अध्यक्ष डॉ उल्हास पाटील, वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ आर्विकर, गोदावरी नर्सिंग प्राचार्य विशाखा वाघ, डॉ केतकी पाटील नर्सिंग कॉलेज चे प्राचार्य शिवानंद बिरादार उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन व दहीहंडी पूजन करण्यात आले. यावेळी राधा कृष्णाच्या पेहरावात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. या…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी राष्ट्रीय शुद्ध हवा उपक्रमा अंतर्गत गुरुवार दि.७ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय शुद्ध हवा दिवसाचे अवचित साधून प्रेम नगर येथील ओपन स्पेस मध्ये मियावाकि पद्धतीने वृक्षारोपण आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान शहरात पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. वृक्षारोपण प्रसंगी शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे, पर्यावरण विभागाचे शाखा अभियंता योगेश वाणी, नगरसेविका प्रतिभा देशमुख, नगरसेवक मयूर कापसे, शक्ती महाजन व प्रभागातील नागरिक उपस्थित होते. दरम्यान, शहरातील सार्वजनिक स्थळी तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. सदर उपक्रमाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना शुद्ध हवेचे महत्व सांगण्यात आले. दैनंदिन वापरात कशाप्रकारे हवेचे प्रदूषण आटोक्यात आणता येईल याबाबत पथनाट्याद्वारे माहिती देण्यात आली.

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील दहावी, बारावी व पदवी परीक्षेत उत्कृष्ट मार्कस घेऊन गुणवंत झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन शहर महानगरपालिका महिला व बालकल्याण विभाग तर्फे बुधवार दि. ६ सप्टेबर रोजी छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात करण्यात आले होते. कार्यक्रमास महापौर जयश्री सुनील महाजन , माजी महापौर सीमा भोळे, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड , उपायुक्त निर्मला गायकवाड, सहा आयुक्त अभिजीत बाविस्कर, सहा.आयुक्त अश्विनी गायकवाड , प्रशासन अधिकारी दिपाली पाटील, प्र.नगरसचिव सुनील गोराणे, सर्व अधिकारी, महिला बाकल्याण अधिक्षक उपस्थित होते. यावेळी विद्यार्थीनसाठी दीपस्तंभ चे यजुर्वेद महाजन यांचे करिअर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रसंगी प्लास्टिक मुक्त…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल वावडदा, येथे जन्माष्टमी व दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जितेंद्र पाटील, वैशाली पाटील तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री पाटील, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सुजीता साळुंखे यांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रमात विद्यार्थी व विद्यार्थिनींनी कृष्ण राधे ची वेशभूषा करून कार्यक्रमात सहभाग नोंदविला होता. सर्वप्रथम आलेल्या मान्यवरांच्या हस्ते श्रीकृष्ण पाळणा पूजन व श्रीकृष्ण राधेच्या प्रतिमेस माल्यार्पण करून पूजा करण्यात आली. तदनंतर शाळेचे कलाशिक्षक कुशराजे पवार यांनी त्यांच्या समूहासमवेत “मिठे रस से भरियोडी राधाराणी लागे” गाणे सादर केले. त्यानंतर पूर्व प्राथमिक विभाग तसेच प्राथमिक, माध्यमिक विभागाचे एकूण आठ समूहनृत्ये सादर केलीं.…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगाव येथे भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला निमित्त दहीहंडीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.सर्वप्रथम शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका कल्पना तायडे , दिपाली चौधरी यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे पारंपारिक पोशाख परिधान करून दांडिया तसेच गरबा रास खेळली. मच गया शोर सारी नगरी रे….., गोविंदा रे गोपाला….. विविध गीतांच्या तालावर ठेका धरत विद्यार्थ्यांनी सुंदर असे नृत्य केले. गोविंदाचे एकावर एक थर लावून विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात दहीहंडी फोडली. त्यानंतर विद्यार्थ्यांना लाडू व प्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन उपशिक्षिका कायनात सय्यद तसेच मंगल गोठवाल यांनी केले…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी केसीई इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट एंड रिसर्चच्या एमसीए शाखेच्या १० विद्यार्थ्यांची आज पुणे स्थित ग्राव्हीटी सोफ्टवेअर तर्फे निवड करण्यात आली. त्यांची निवड ही इंडस्ट्री लाइव्ह प्रोजेक्टसाठी झाली असून त्यांना कंपनीतर्फे अडीच महिन्यांची विनामुल्य ट्रेनिंग सुद्धा दिली जाणार आहे, ज्यात प्रामुख्याने कोर जावा, जेडीबीसी, हयबरनेट, स्प्रिंग आणि मायएसक्यूएल असणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये केतन माळी, साक्षी चौधरी, कोमल कोपडे, शीतल बारी, नवीन नारखेडे, मोहित जाधव, अजय पवार, भरत सुरवसे, भैरवी पाटील आणि रीना माळी आदींचा समावेश आहे. त्यापूर्वी एमसीए शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी ग्राव्हीटी सोफ्टवेअरचे संचालक निखील चौधरी ह्यांनी चार तासांचा सेमिनार घेतला, ज्यात त्यांनी आयटी कंपनीत नोकरीसाठी प्रयत्न कसे करावे,…

Read More

साईमत, मुंबई : प्रतिनिधी भूसंपादन प्रकरणात नगरविकास विभागाचे प्रधान सचिव आणि मदत व पुनर्वसन विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी मुंबई हायकोर्टात हजर राहून बिनशर्त माफी मागितली आहे. राज्याचे महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ यांनीही कोर्टाला कळकळीची विनंती केली आणि यापुढे सरकारी अधिकाऱ्यांकडून कोर्टाच्या आदेशाचा भंग होणार नाही, अशी हमी दिली. त्यानंतर हायकोर्टाने गुप्ता आणि अन्य चार अधिकाऱ्यांना एक महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा देणारा ३१ ऑगस्टचा आदेश मागे घेतला. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी व न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने ३१ ऑगस्ट रोजीच्या आदेशात असीम गुप्ता आणि अन्य अधिकाऱ्यांवर प्रचंड ताशेरे ओढले होते.

Read More

साईमत, नवी दिल्ली : वृत्तसंस्था १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिव्ोशनाचा पहिला दिवस जुन्या संसद भवनातील कामकाजाचा शेवटचा दिवस असेल. गणेश चतुर्थीच्या दिवशी १९ सप्टेंबर रोजी संसद नवीन इमारतीत हलवण्यात येणार आहे. २८ मे रोजी पंतप्रधान मोदींनी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले. संसदेच्या नव्या इमारतीचे काम सुरू झाल्यानंतर जुन्या इमारतीचे ‘लोकशाही संग्रहालय’मध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत बांधलेली नवीन संसद भवन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‌‘ड्रीम प्रोजेक्ट‌’ आहे. ९७३ कोटी रुपये खर्चून बांधलेली ही इमारत २९ महिन्यांत पूर्ण झाली आहे. ६४ हजार ५०० चौरस मीटरवर बांधलेली नवी संसद भवन ४ मजली आहे. त्याला ३…

Read More