साईमत जळगाव प्रतिनिधी
शहरातील दहावी, बारावी व पदवी परीक्षेत उत्कृष्ट मार्कस घेऊन गुणवंत झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन शहर महानगरपालिका महिला व बालकल्याण विभाग तर्फे बुधवार दि. ६ सप्टेबर रोजी छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात करण्यात आले होते.
कार्यक्रमास महापौर जयश्री सुनील महाजन , माजी महापौर सीमा भोळे, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड , उपायुक्त निर्मला गायकवाड, सहा आयुक्त अभिजीत बाविस्कर, सहा.आयुक्त अश्विनी गायकवाड , प्रशासन अधिकारी दिपाली पाटील, प्र.नगरसचिव सुनील गोराणे, सर्व अधिकारी, महिला बाकल्याण अधिक्षक उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थीनसाठी दीपस्तंभ चे यजुर्वेद महाजन यांचे करिअर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रसंगी प्लास्टिक मुक्त अभियानात उकृष्ट काम केलेल्या १७ शाळे चा सत्कार करण्यात आला. त्यात महानगरपालिकेच्या उत्कृष्ट ५ शाळेचा सत्कार करण्यात आला. दहावी, बारावी, पदवी च्या ३५० विद्यार्थीना शिष्यवृत्ती, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
त्यात बारावी व दहावीच्या परीक्षेत उत्कृष्ट गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रथम एकवीस हजार रुपये, द्वितीय अकरा हजार रुपये, तृतीय पाच हजार रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. पदवी परीक्षेत उत्कृष्ट मार्क्स घेऊन गुणवंत झालेल्या विद्यार्थ्यांना प्रथम एकतीस हजार रुपये, द्वितीय एकवीस हजार रुपये, तृतीय पाच हजार रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सदर शिष्यवृत्ती करिता जळगाव महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण विभागाकडून एकूण रुपये १५ लक्ष खर्च शिष्यवृत्ती वाटप साठी करण्यात आले.
सूत्रसंचालन गायत्री पाटील, शहर अभियान व्यवस्थापक यांनी केले. प्रास्ताविक उपायुक्त निर्मला गायकवाड यांनी केले, तर आभार सहा. आयुक्त अश्विनी गायकवाड यांनी केले.