साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील दहावी, बारावी व पदवी परीक्षेत उत्कृष्ट मार्कस घेऊन गुणवंत झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन शहर महानगरपालिका महिला व बालकल्याण विभाग तर्फे बुधवार दि. ६ सप्टेबर रोजी छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात करण्यात आले होते. कार्यक्रमास महापौर जयश्री सुनील महाजन , माजी महापौर सीमा भोळे, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड , उपायुक्त निर्मला गायकवाड, सहा आयुक्त अभिजीत बाविस्कर, सहा.आयुक्त अश्विनी गायकवाड , प्रशासन अधिकारी दिपाली पाटील, प्र.नगरसचिव सुनील गोराणे, सर्व अधिकारी, महिला बाकल्याण अधिक्षक उपस्थित होते. यावेळी विद्यार्थीनसाठी दीपस्तंभ चे यजुर्वेद महाजन यांचे करिअर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रसंगी प्लास्टिक मुक्त…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल वावडदा, येथे जन्माष्टमी व दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जितेंद्र पाटील, वैशाली पाटील तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री पाटील, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सुजीता साळुंखे यांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रमात विद्यार्थी व विद्यार्थिनींनी कृष्ण राधे ची वेशभूषा करून कार्यक्रमात सहभाग नोंदविला होता. सर्वप्रथम आलेल्या मान्यवरांच्या हस्ते श्रीकृष्ण पाळणा पूजन व श्रीकृष्ण राधेच्या प्रतिमेस माल्यार्पण करून पूजा करण्यात आली. तदनंतर शाळेचे कलाशिक्षक कुशराजे पवार यांनी त्यांच्या समूहासमवेत “मिठे रस से भरियोडी राधाराणी लागे” गाणे सादर केले. त्यानंतर पूर्व प्राथमिक विभाग तसेच प्राथमिक, माध्यमिक विभागाचे एकूण आठ समूहनृत्ये सादर केलीं.…
साईमत जळगाव प्रतिनिधी केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगाव येथे भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला निमित्त दहीहंडीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.सर्वप्रथम शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका कल्पना तायडे , दिपाली चौधरी यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे पारंपारिक पोशाख परिधान करून दांडिया तसेच गरबा रास खेळली. मच गया शोर सारी नगरी रे….., गोविंदा रे गोपाला….. विविध गीतांच्या तालावर ठेका धरत विद्यार्थ्यांनी सुंदर असे नृत्य केले. गोविंदाचे एकावर एक थर लावून विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात दहीहंडी फोडली. त्यानंतर विद्यार्थ्यांना लाडू व प्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन उपशिक्षिका कायनात सय्यद तसेच मंगल गोठवाल यांनी केले…
साईमत जळगाव प्रतिनिधी केसीई इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट एंड रिसर्चच्या एमसीए शाखेच्या १० विद्यार्थ्यांची आज पुणे स्थित ग्राव्हीटी सोफ्टवेअर तर्फे निवड करण्यात आली. त्यांची निवड ही इंडस्ट्री लाइव्ह प्रोजेक्टसाठी झाली असून त्यांना कंपनीतर्फे अडीच महिन्यांची विनामुल्य ट्रेनिंग सुद्धा दिली जाणार आहे, ज्यात प्रामुख्याने कोर जावा, जेडीबीसी, हयबरनेट, स्प्रिंग आणि मायएसक्यूएल असणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये केतन माळी, साक्षी चौधरी, कोमल कोपडे, शीतल बारी, नवीन नारखेडे, मोहित जाधव, अजय पवार, भरत सुरवसे, भैरवी पाटील आणि रीना माळी आदींचा समावेश आहे. त्यापूर्वी एमसीए शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी ग्राव्हीटी सोफ्टवेअरचे संचालक निखील चौधरी ह्यांनी चार तासांचा सेमिनार घेतला, ज्यात त्यांनी आयटी कंपनीत नोकरीसाठी प्रयत्न कसे करावे,…
साईमत, मुंबई : प्रतिनिधी भूसंपादन प्रकरणात नगरविकास विभागाचे प्रधान सचिव आणि मदत व पुनर्वसन विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी मुंबई हायकोर्टात हजर राहून बिनशर्त माफी मागितली आहे. राज्याचे महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ यांनीही कोर्टाला कळकळीची विनंती केली आणि यापुढे सरकारी अधिकाऱ्यांकडून कोर्टाच्या आदेशाचा भंग होणार नाही, अशी हमी दिली. त्यानंतर हायकोर्टाने गुप्ता आणि अन्य चार अधिकाऱ्यांना एक महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा देणारा ३१ ऑगस्टचा आदेश मागे घेतला. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी व न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने ३१ ऑगस्ट रोजीच्या आदेशात असीम गुप्ता आणि अन्य अधिकाऱ्यांवर प्रचंड ताशेरे ओढले होते.
साईमत, नवी दिल्ली : वृत्तसंस्था १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिव्ोशनाचा पहिला दिवस जुन्या संसद भवनातील कामकाजाचा शेवटचा दिवस असेल. गणेश चतुर्थीच्या दिवशी १९ सप्टेंबर रोजी संसद नवीन इमारतीत हलवण्यात येणार आहे. २८ मे रोजी पंतप्रधान मोदींनी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले. संसदेच्या नव्या इमारतीचे काम सुरू झाल्यानंतर जुन्या इमारतीचे ‘लोकशाही संग्रहालय’मध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत बांधलेली नवीन संसद भवन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. ९७३ कोटी रुपये खर्चून बांधलेली ही इमारत २९ महिन्यांत पूर्ण झाली आहे. ६४ हजार ५०० चौरस मीटरवर बांधलेली नवी संसद भवन ४ मजली आहे. त्याला ३…
साईमत, मुंबई : प्रतिनिधी ऑगस्टमधील मोठ्या मान्सून खंडानंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, पुढील तीन ते चार दिवसांमध्ये राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील अंदाजे १० दिवस पाऊसदिलासा मिळण्याची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांमध्ये गुरुवारी आणि शुक्रवारी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र वायव्येकडे सरकत असल्याने राज्याला त्याचा फायदा होईल, असे निवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले. या प्रणाली अंतर्गत १५ सप्टेंबरपर्यंत राज्यात चांगला पाऊस पडेल असा अंदाज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम ते मुसळधार तर मुंबईसह कोकण आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार…
साईमत, मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत विक्री केलेल्या कांद्यासाठी ३५० रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. या अनुदान वितरणाच्या पहिल्या टप्याचा शुभारंभ आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आला. पहिल्या टप्प्यात तीन लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३०० कोटी रुपये एवढा निधी ऑनलाईन वितरित होणार आहे. उर्वरित अनुदान वितरणासाठी दुसरा टप्पा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. कांदा अनुदानासाठी १० कोटी पेक्षा कमी अनुदानाची मागणी असलेल्या…
साईमत, मुंबई : प्रतिनिधी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारकडून ‘इंडिया’ नावाचा वापर टाळला जात आहे. त्यावर सडकून टीका केली. देशातील विरोधी पक्षांनी इंडिया नावाची आघाडी स्थापन केली, म्हणून इंडियाचे नाव पुसून टाकण्यासारखा दुसरा घाबरटपणा, कद्रुपणा, विकृतपणा नाही, असे म्हणत संजय राऊतांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. ते बुधवारी (६ सप्टेंबर) मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते. संजय राऊत म्हणाले, आम्ही ‘इंडिया’ आघाडी स्थापन केल्यापासून त्यांना इंडिया या शब्दाचंच भय वाटायला लागलं. एखाद्या पक्षाला, एखाद्या सरकारला देशाच्या घटनेतील नावाविषयी भय वाटू लागतं हा विचित्र प्रकार आहे. घटनेत इंडिया नाव आहे. घटनेत भारत हेही नाव आहे. मात्र,…
साईमत, मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षणासाठी उपोषण, आंदोलन सुरु आहे. त्याची दखल आम्ही घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांची मागणी होती की निजामकालीन नोंदी ज्यांच्याकडे असतील त्यांना कुणबी जात प्रमाणपत्राचा दाखला दिला पाहिजे. त्याप्रमाणे बुधवारी कॅबिनेटच्या बैठकीत आम्ही निर्णय घेतला आहे. ज्यांच्या महसुली, शैक्षणिक आणि निजामकालीन नोंदी असतील त्यांना कुणबी दाखले देणार. त्याची पडताळणी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांची समिती गठीत केली आहे. त्यात पाच सदस्यांचा समावेश करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ िंशदे यांनी केली आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ज्यांच्या पूर्वीच्या महसुली, शैक्षणिक निजामकालीन नोंदी आहेत, त्याच्या पडताळणीचं काम ही समिती करणार आहे. महसूल सचिव समिती या निवृत्त न्यायाधीशांच्या समितीला मदतही…