राष्ट्रीय शुद्ध हवा उपक्रमा अंतर्गत मनपातर्फे वृक्षारोपण करत पथनाट्याद्वारे जनजागृती

0
2

साईमत जळगाव प्रतिनिधी

राष्ट्रीय शुद्ध हवा उपक्रमा अंतर्गत गुरुवार दि.७ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय शुद्ध हवा दिवसाचे अवचित साधून प्रेम नगर येथील ओपन स्पेस मध्ये मियावाकि पद्धतीने वृक्षारोपण आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान शहरात पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली.

वृक्षारोपण प्रसंगी शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे, पर्यावरण विभागाचे शाखा अभियंता योगेश वाणी, नगरसेविका प्रतिभा देशमुख, नगरसेवक मयूर कापसे, शक्ती महाजन व प्रभागातील नागरिक उपस्थित होते. दरम्यान, शहरातील सार्वजनिक स्थळी तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. सदर उपक्रमाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना शुद्ध हवेचे महत्व सांगण्यात आले. दैनंदिन वापरात कशाप्रकारे हवेचे प्रदूषण आटोक्यात आणता येईल याबाबत पथनाट्याद्वारे माहिती देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here