साईमत, नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाची राजधानी नवी दिल्लीत ९ आणि १० सप्टेंबरला जी-२० परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. भारत मंडपम येथे ही परिषद पार पडत आहे. परदेशी पाहुण्याच्या स्वागतासाठी नवी दिल्ली सज्ज झाली आहे. सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. परदेशी पाहुण्याच्या राहण्या आणि खाण्यासाठी खास तयारी करण्यात आली आहे. विदेशी पाहुण्यांना सोने आणि चांदीच्या भांड्यांमध्ये जेवण दिले जाणार आहे. त्यांच्या जेवणासाठी खास मेन्यूही तयार करण्यात आला आहे. या परिषदेमध्ये सामील होण्यासाठी अनेक देशांचे वरिष्ठ नेते भारतात दाखल झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे दिल्लीमध्ये पोहचले आहेत. विमानतळावर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचं स्वागत केंद्रीय मंत्री जनरल व्ही के…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी एमआयडीसी परिसरातील ट्रान्सपोर्ट नगरातील ट्रकचालका सोबत रात्री वाद झाला होता. त्यानंतर शुक्रवारी सकाळी त्या तरुण ट्रकचालकाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात रात्री उशिरा पर्यन्त खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर रमेश पालवे (वय-२५) रा. मालदभाडी ता. जामनेर असे मृत तरूणाचे नाव आहे. याबाबत अधिक असे की, सागर रमेश पालवे हा आई, वडील यांच्यासोबत जामनेर तालुक्यातील मालदाभाडी येथे वास्तव्याला आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून तो जळगाव येथील विदर्भ ट्रान्सपोर्ट कंपनीत ट्रकचालक म्हणून कामाला होता.याबाबत एमआयडीसी पोलीस स्थानकात मयत सागर ची आई निलम रमेश पालवे यांच्या फिर्यादि वरून खुनाचा गुन्हा…
जळगावकरांच्या नशिबी काय वाढून ठेवलंय् ‘राम जाने’. जळगाव महानगरपालिकेची पाच वर्षाची मुदत येत्या १७ सप्टेबर रोजी संपत आहे.त्यानंतर मनपावर प्रशासक राजवट सुरु होईल.ती निवडणुका होऊन नव्या महापौरांची निवड होईपर्यंत राहील.गेल्या २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत जळगावकरांनी भाजपाच्या पारड्यात मतदानाचे भरघोस दान टाकले.७५ पैकी ५७ जागा दिल्या व एकहाती सत्ता प्रदान केली. त्यामागचे एक मुख्य कारण होते ते म्हणजे मंत्री गिरीषभाऊ महाजन यांनी शहरवासियांना दिलेला शब्द.ते म्हणाले होते की,भाजपाला सत्ता दिल्यास जळगावचा चेहरामोहरा एक वर्षात बदलून टाकू.भाबड्या मतदारांनी त्यांच्या शब्दावर विश्वास टाकला.काही नाहीतर कमीत कमी शहरातील रस्ते,गटारी व आरोग्याच्या समस्या तरी मार्गी लागतील एवढीच माफक अपेक्षा लोकांनी केली मात्र झाले उलटेच. तत्कालीन…
शरद पवार यांची राजकिय कारकीर्द, अनुभव, मुत्सद्दीपणा, संयम, संघटन कौशल्य आणि निवडणूक जिंकण्याचे तंत्र हे भाजपासाठी मोठे आव्हान असणार आहे. दरम्यान, अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळे शिंदे गट आणि भाजपात खूप आनंदाचे वातावरण आहे, असेही चित्रं दिसत नाही. त्याचाही फायदा येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शरद पवार आणि त्यांच्या मित्र पक्षांनी जर निवडणूक जिंकली तर शरद पवार आणखी एक इतिहास घडवतील आणि ज्यांनी त्यांची साथ सोडली त्यांच्या दृष्टीने त्यांनी घेतलेला निर्णय ही एक राजकिय आत्महत्या ठरेल. अर्थात, याचे उत्तर येणारा काळ ठरव्ोल, हे मात्र तेवढेच खरे आहे. राजकारण आणि क्रिकेट यात बऱ्याच गोष्टींचं…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ४ जून २०२३ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ मधील राज्य सेवा गट-अ व गट-ब परीक्षेचा निकाल ६ सप्टेंबरला आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. या पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेकरिता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावांची यादी व गुणांच्या सीमारेषा (कट ऑफ) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या वेळचा कटऑफ पहाता सर्वसाधारण आणि राखीव गटात फारसा फरक उरलेला नाही. या निकालानंतर जाहीर झालेली गुणांची सीमारेषा ही सर्वसाधारण संवर्गासाठी १०८ इतकी आहे. तर इतर मागासवर्ग, भटक्या जमाती-क, भटक्या जमाती-ड, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि निरधिसुचित जमाती या संवर्गासाठीदेखील…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर राज्यात पावसाचे कमबॅक झाले आहे. हवामान खात्याने राज्यात पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार गेल्या दोन दिवसापासून राज्यभरात पाऊस सुरू झाला आहे. खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात देखील पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवनदान मिळणार आहे. देशात मान्सूनवर यंदा अल निनोचा प्रभाव दिसून आला. यामुळे यावर्षी जून आणि ऑगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडला. सप्टेंबर महिन्यात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. कृष्ण जन्माष्टमीला राज्यात पाऊस सुरु झाला आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा…
साईमत, धुळे : प्रतिनिधी फेसबुकवर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर टाकून बदनामी केल्याप्रकरणी डॉ. संजय िंपगळे यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे, स्वतःला भाजप कार्यकर्ते म्हणवून घेत काहींनी रात्री डॉ. िंपगळे यांना शिवीगाळ करीत त्यांच्या कारची तोडफोड केली. याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. भाजपचे माजी मंडळ अध्यक्ष प्रवीण अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सहा सप्टेंबर रोजी दुपारी चार ते साडेचार या व्ोळेत धुळे शहरातील डॉ. संजय पिंगळे यांच्या फेसबुक खात्यावर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर टाकलेला दिसला. त्यामुळे महाजन यांची बदनामी झाली. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी िंपगळेविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान,…
साईमत, मुंबई ः प्रतिनिधी राज्यभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सवाचा मोठा उत्साह दिसून आला. मुंबई, ठाणे आणि पुण्यात दहीहंडीचा मोठा जल्लोष असतो. राजकीय नेते आणि सेलिब्रिटींची वर्दळ येथील दहीहंडी सोहळ्यात दिसून येते. राज्याचे मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे ठाण्याचे रहिवाशी असल्याने दहीहंडी उत्सावाला त्यांनी ठाण्यासह, मुंबई आणि विविध ठिकाणी उपस्थिती लावत गोविंदा आणि कार्यकर्त्यांसोबत दहीहंडी उत्सवात उत्साह भरला. दहीहंडी उत्सवात ४० गोविंदा जखमी मुंबईत विविध भागात ४० वर गोविंदा जखमी झाले आहेत. ठाणे शहरात गुरुवारी १३ गोविंदा जखमी झाले आहेत. यामध्ये ९ गोंविदांना कळवा रुग्णालयात तर चार गोविंदांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते.. यामध्ये एका महिला गोंविदाचा समावेश असून त्या…
साईमत, जालना : प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांची गुरूवारी पुन्हा एकदा अर्जुन खोतकर यांनी सरकारच्या वतीने भेट घेतली. सोबतच सरकारने काढलेल्या जीआरची प्रत देखील जरांगेंना देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र जोपर्यंत सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार नाही, तोपर्यंत आपण उपोषण मागे घेणार नसल्याचे जरांगे यांनी सांगितले. त्यामुळे सरकारने काढलेल्या जीआरमध्ये बदल करून पुन्हा नवीन जीआर काढा, मी उपोषण मागे घेतो असे जरांगे म्हणाले. त्यामुळे उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यासाठी आलेल्या खोतकरांना पुन्हा एकदा खाली हात परतावे लागले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत एक निर्णय घेतला.…
साईमत, जळगाव- प्रतिनिधी । जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून मिळालेल्या निधीचा विनियोग कालमर्यादेत करण्यासाठी शासकीय विभागांनी जादा तास काम करून कामांची गती वाढवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गुरुवारी, ७ सप्टेंबर रोजी अधिकाऱ्यांना दिले. जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत असलेल्या विविध योजनांचा खर्च व कामकाजाचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, महानगरपालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड, जळगाव उप वनसंरक्षक प्रवीण ए, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरूण पवार आदी उपस्थित होते. बैठकीला विविध शासकीय विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. यावेळी जिल्हा वार्षिक…