शरद पवार : राजकारणातले महेद्रसिंग धोनी

0
9

शरद पवार यांची राजकिय कारकीर्द, अनुभव, मुत्सद्दीपणा, संयम, संघटन कौशल्य आणि निवडणूक जिंकण्याचे तंत्र हे भाजपासाठी मोठे आव्हान असणार आहे. दरम्यान, अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळे शिंदे गट आणि भाजपात खूप आनंदाचे वातावरण आहे, असेही चित्रं दिसत नाही. त्याचाही फायदा येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शरद पवार आणि त्यांच्या मित्र पक्षांनी जर निवडणूक जिंकली तर शरद पवार आणखी एक इतिहास घडवतील आणि ज्यांनी त्यांची साथ सोडली त्यांच्या दृष्टीने त्यांनी घेतलेला निर्णय ही एक राजकिय आत्महत्या ठरेल. अर्थात, याचे उत्तर येणारा काळ ठरव्ोल, हे मात्र तेवढेच खरे आहे.

राजकारण आणि क्रिकेट यात बऱ्याच गोष्टींचं साम्य असतं. क्रिकेट या खेळात िंजकायचं असेल तर प्रतिस्पर्धी संघावर तुम्हाला विजय मिळवावा लागतो. आणि विजय मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत, सराव आवश्यक असतो. आपली लढत कोणत्या संघाशी आहे, हे ओळखून डावपेच आखाव्ो लागतात. क्रिकेट हा सांघिक खेळ असला तरी प्रत्यक्ष मैदानावर टीमचे नेतृत्त्व करणाऱ्या लिडरचे म्हणजे कर्णधाराचे कसब पणाला लागते. संघात कितीही प्रतिभावंत खेळाडू असले तरी त्यांना कुठे आणि कसे खेळवायचे हे सर्वस्वी कर्णधाराच्या हातात असते. त्यामुळे ज्या संघाचा कर्णधार हा सर्व बाबतीत सक्षम आणि अष्टपैलू असेल तर त्यांना विजय मिळविणे सोपे असते. किंबहुना हातातून गेलेली मॅच ते िंजकून आणू शकतात. एखादा खेळाडू खूप उत्तम खेळ करतो, पण तो यशस्वी कर्णधार होऊ शकत नाही,हे क्रिकेट समजणाऱ्या जगातील सर्वच लोकांना ठाऊक झाले आहे. कर्णधार हा शांत, संयमी, परिस्थिती आणि प्रतिस्पर्ध्याचे डावपेच ओळखून निर्णय घेणारा असावा लागतो. कोणत्याही परिस्थितीत न डगमगता, सहकाऱ्यांवर न चिडता, शेवटपर्यंत लढण्याची ऊर्जा निर्माण करण्याचं कसब हे कर्णधारात असावं लागतं. आणि हे सर्व गुण ज्या कर्णधारात असतील तर तो कोणत्याही कमी अनुभव असलेल्या खेळाडूंना घेऊन देखील लढती जिंकू शकतो. हे महेंद्रिंसग धोनीने दाखवून दिले आहे. महेंद्रिंसह धोनीकडे क्रिकेट खेळण्याचा फारसा अनुभव नव्हता. पण त्याने ज्या परिस्थितीत पाकिस्तान विरुद्ध मोठी खेळी केली तेव्हाच त्याच्यातील गुणवत्ता लक्षात आली. विशेष म्हणजे त्याला मिळत असलेल्या यशाने तो अजिबात हुरळून गेला नाही. तेवढ्याच शांत डोक्याने, जमिनीवर राहून त्याने त्याची गुणवत्ता वाढवत नेली. भारताचे यशस्वी खेळाडू जेव्हा कर्णधार म्हणुन अपयशी ठरले, तेव्हा महेंद्रिंसग धोनी याच्याकडे नेतृत्व आले. त्याच्या टीम मध्ये त्याच्या पेक्षा दिग्गज आणि अनुभवी खेळाडू होते. ही परिस्थिती सांभाळून धोनीने भारताला अनेक चषक आणि मोठे विजय मिळवून दिले. त्याचे आता वय झाले आहे, त्याने रिटायर्ड व्हाव्ो असा सल्ला अनेकांनी दिला, पण तो स्वत शिवाय कुणाचेच ऐकत नाही. त्याने भले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून रिटायरमेंट घेतली, पण आयपीएलच्या चेन्नई सुपर िंकग्ज या संघाचे नेतृत्व त्याने वय झाल्यानंतरही सोडले नाही, आणि विशेष म्हणजे वय झाले असे म्हणणाऱ्यांना त्यांनी चपराक दिली. आयपीएलमध्ये खेळताना त्याच्या संघात अत्यंत कमी अनुभव असलेल्या युवा खेळाडूंचा भरणा होता, तरीही त्याने पाचव्यांदा आपल्या संघाला अजिंक्यपद मिळवून दिले. त्यानंतरही त्याची विजयाची भूख संपलेली नाही, हे त्याचे रिटायरमेंट जाहीर न करण्याचं कारण असावं.

यापेक्षा व्ोगळी स्थिती शरद पवार यांची नाही. तसा शरद पवार यांचाही क्रिकेटशी जवळचा संबंध राहिला आहे. शरद पवार यांची मंगळवारी जळगावात सभा झाली. त्या सभेतील त्यांचा उत्साह आणि जिंकण्याची ऊर्मी बघता महेंद्रसिंग धोनीशी तुलना स्वाभाविक आहे. वास्तविक, शरद पवार यांच्या यापुर्वी जळगावात अनेक सभा झाल्या. त्यांच्या सभांना कमी, अधिक लोकांची गर्दी राहिली आहे. पण परवा झालेली त्यांची ही सभा अभूतपूर्व होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर जळगावात झालेली त्यांची ही पाहिलीच सभा. येवला, बीड, कोल्हापुर या सभांमध्ये त्यांनी अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांचा चांगलाच समाचार घेतला होता. त्यामुळे ते जळगावात काय बोलतात याची लोकांना खूप उत्सुकता होती. त्यातून त्यांच्या सभेला प्रचंड मोठा जनसागर उसळला होता. आयोजक असलेल्या एकनाथराव खडसे यांच्या अंदाजापेक्षा जास्त संख्येने लोकांनी हजेरी लावली होती. अक्षरशः बसायला जागा कमी पडली. विशेष म्हणजे या सभेत शरद पवार यांच्या चेहऱ्यावर, वागण्यात, बोलण्यात कोणताही ताणतणाव दिसला नाही. सख्खा पुतण्या आणि पंचवीस, तीस आमदारांनी साथ सोडली तरी त्यांनी नवखे, सेकंड फळी, तसेच जे काही जुने सहकारी सोबत राहिले त्यांना घेऊन येणाऱ्या निवडणुका जिंकायच्या आणि पक्ष वाढवण्याची हिम्मत दाखवली आहे. त्यांनी या सभेत केलेले भाषण आणि दिलेला हुंकार पहाता त्यांचे वय काहीही असले तरी त्यांनी पुढील लढाई जिंकण्याचे रणशिंग फुंकल्याचे पहायला मिळाले.

तसं पाहिले तर शरद पवार यांचा राजकिय इतिहास हा महेंद्र िंसग धोनी सारखाच आहे. अनेक दिग्गज, अनुभवी राजकारण्यांना सोबत घेऊन वयाच्या ३८ व्या वर्षी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. त्यांचा रेकॉर्ड अजून कोणी मोडू शकले नाही. तेव्हापासुन ते अनेक निवडणुका जिंकत आले आहेत. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी हरलेली बाजी भर पावसात सभा घेऊन उलटवली होती, हे महाराष्ट्र अजून विसरलेला नाही. आताही त्यांची राजकिय स्थिती व्ोगळी नाही. पक्ष फुटला, जुने सहकारी सोडून गेले, पण त्यांनी हार मानली नाही. शरद पवार हे तेल लावलेला राजकिय पाहिलवान आहे, असे म्हटले जाते, आता ८१ वयातही त्यांच्यात तोच जोश दिसून येत आहे. पक्ष फुटल्यानंतर पक्षाचे नाव आणि चिन्ह यावर अजित पवार गटाने दावा केला आहे, पण, त्याचेही त्यांना फार गांभिर्य दिसत नाही. नवीन पक्ष, नवीन चिन्ह घेऊन देखील ते इतिहास घडवतील असा विश्वास, त्यांना आणि त्यांच्या सोबत असणाऱ्यांनी बोलून दाखवला आहे.

राज्यात आणि देशात सत्ताधारी असलेल्या भाजप पक्षाला देखील पवारांची पॉवर आणि माईंड गेम चांगलाच माहिती आहे. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी पक्ष फोडून निवडणुकीपुर्वीच त्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न चालविला आहे. पण शरद पवार हे नामोहरम होणाऱ्यांपैकी नाही, हे जळगावच्या सभेतून त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. भाजपाने शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली याचा फायदा आम्हा दोन्ही पक्षांना होईल, तसेच या पक्षात राहणाऱ्या नेत्यांना, पुढच्या पिढीला आणि नवीन जुडणाऱ्या राजकारण्यांना होईल, असा त्यांना ठाम विश्वास आहे. भाजपाने जे केले त्यात आमचं भलच होईल, असा त्यांना ठाम विश्वास आहे. त्यामुळे ते अधिक जोमाने कामाला लागले आहे. जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव विधानसभेचे आमदार होते, ते सोडून सर्वच लोक त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्य़ातून आगामी निवडणुकीत त्यांना अधिक जागा मिळण्याचा विश्वास प्राप्त झाला आहे. जळगावात भाजपाचे माजी आमदार बी.एस. पाटील यांच्यासह काही उमेदवारी करू शकतील अशा लोकांचा आमदार खडसे यांनी पक्ष प्रवेश करून घेतला आहे. ऐन निवडणुकीत देखील आणखी दिग्गरज राष्ट्रवादीत प्रव्ोश करणार असल्याची चर्चा आहे.

एकंदरीत शरद पवार यांनी महेंद्र िंसग धोनी यांच्यासारखी रिटायरमेंट घ्यायला नकार दिला आहे. धोनीने ज्या पद्धतीने नवीन खेळाडू घेऊन चेन्नई सुपर किंग्ज टीमला आयपीएलचे पाचव्यांदा अिंजक्यपद मिळवून दिले, अगदी त्याच पद्धतीने शरद पवार हे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची रणनीती आखत असल्याचं त्यांच्या कार्यशैलीतून दिसत आहे. जळगावची सभा त्यांनी त्याच हेतूने भव्यदिव्य घेतली. ज्यातून संपूर्ण महाराष्ट्रात मेसेज गेला पाहिजे आणि जळगावच्या सभेबाबत तेच घडल्याचे बोलले जात आहे. शरद पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत घेतलेली भूमिका आणि सरकारचा घेतलेला खरपूस समाचार याची आता चर्चा होऊ लागली आहे. दुसरीकडे विरोधक, म्हणजे सत्ताधाऱ्यांची भूमिका आणि राज्यात घडत असलेल्या घटना पहाता भाजप जास्तीतजास्त अडचणीत येत असल्याचे दिसत आहे. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे मराठा आरक्षणाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचे देता येईल. त्यातच शरद पवारांना शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचीही तेवढीच भक्कम साथ मिळत आहे. पवारांचा राज्यभरात सुरू असलेला झंझावात भाजप आणि मित्र पक्षांना धडकी भरवणारा आहे. शरद पवार यांची राजकिय कारकीर्द, अनुभव, मुत्सद्दीपणा, संयम, संघटन कौशल्य आणि निवडणूक जिंकण्याचे तंत्र हे भाजपासाठी मोठे आव्हान असणार आहे. दरम्यान, अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळे शिंदे गट आणि भाजपात खूप आनंदाचे वातावरण आहे, असेही चित्रं दिसत नाही. त्याचाही फायदा येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शरद पवार आणि त्यांच्या मित्र पक्षांनी जर निवडणूक जिंकली तर शरद पवार आणखी एक इतिहास घडवतील आणि ज्यांनी त्यांची साथ सोडली त्यांच्या दृष्टीने त्यांनी घेतलेला निर्णय ही एक राजकिय आत्महत्या ठरेल. अर्थात, याचे उत्तर येणारा काळ ठरव्ोल, हे मात्र तेवढेच खरे आहे.

जळगाव जिल्हा आणि राष्ट्रवादीचे गणित
जळगाव जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर नवीन, जुन्या लोकांचे संघटन हे राष्ट्रवादीच्या दृष्टीने आज तरी मजबूत दिसत आहे. एकनाथराव खडसे, गुलाबराव देवकर, सतिष अण्णा पाटील, अरूणभाई गुजराथी, रोहिणी खडसे या सर्वांची राजकीय ताकद पहाता राष्ट्रवादी काँग्रेस किंवा महाविकास आघाडी जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात आव्हान उभे करेल, हे आजच स्पष्ट झाले आहे. अशीच स्थिती जर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उभी करण्यात त्यांना यश आले तर महेंद्रसिंग धोनीने आयपीएलच्या २०२२ च्या हंगामात जे केले, तेच २०२४ मध्ये शरद पवार घडवू शकतात,अशी चर्चाही आता रंगू लागली आहे.

राजकारण ः त्र्यंबक कापडे, कार्यकारी संपादक 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here