साईमत, नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशाची राजधानी नवी दिल्लीत ९ आणि १० सप्टेंबरला जी-२० परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. भारत मंडपम येथे ही परिषद पार पडत आहे. परदेशी पाहुण्याच्या स्वागतासाठी नवी दिल्ली सज्ज झाली आहे. सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. परदेशी पाहुण्याच्या राहण्या आणि खाण्यासाठी खास तयारी करण्यात आली आहे. विदेशी पाहुण्यांना सोने आणि चांदीच्या भांड्यांमध्ये जेवण दिले जाणार आहे. त्यांच्या जेवणासाठी खास मेन्यूही तयार करण्यात आला आहे. या परिषदेमध्ये सामील होण्यासाठी अनेक देशांचे वरिष्ठ नेते भारतात दाखल झाले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे दिल्लीमध्ये पोहचले आहेत. विमानतळावर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचं स्वागत केंद्रीय मंत्री जनरल व्ही के िंसह यांनी केले. जी-२० परिषदेसाठी अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया प्रजासत्ताक, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, ब्रिटन, अमेरिका आणि युरोपियन युनियन यांचा समाव्ोश करण्यात आला आहे. या निमित्ताने भारताची राजधानी नवी दिल्ली सजली आहे. ठिकठिकाणी रोषणाई करण्यात आली आहे. भारतीय कला आणि संस्कृती दाखवणारे देखाव्ो दिल्लीत जागोजागी लावण्यात आले आहेत.
सोने आणि चांदीच्या भांड्यांमध्ये जेवण
जी-२० परिषदेत सहभागी होणाऱ्या पाहुण्यांच्या पाहुणचारासाठी खास तयारी करण्यात आली आहे. भारतीय संस्कृतीची झलक दाखवण्यासाठी पाहुण्यांना सोने आणि चांदी कोटेड भांड्यामध्ये जेवण वाढलं जाईल. या सर्व भांड्यांना सोने आणि चांदीचा मुलामा देण्यात आला आहे. जानेवारी २०२३ पासूनच जी-२० परिषदेसाठी तयारी सुरु करण्यात आली. राजे-महाराजे ज्या प्रकारच्या ताटात जेवायचे त्या थीमच्या आधारे ही ताटं आणि इतर भांडी डिझाइन करण्यात आली आहेत.
विमानतळासह रस्त्यांवर तिरंगी रोषणाई
जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सजवण्यात आली आहे. विमानतळासह रस्त्यांवर रंगीबेरंगी लाईटींग करण्यात आली आहे. विमानतळासह राजधानीचे रस्ते जी-२० लोगो आणि रोषणाईने सजवण्यात आले आहेत. रात्रीच्या व्ोळी हे दृश्य अप्रतिम दिसत आहे. रस्तेच नाही तर इमारतींनाही तिरंगी सजावट करण्यात आली आहे. परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी नवी दिल्ली विमानतळ पूर्णपणे सज्ज आहे. संपूर्ण दिल्ली जणू तिरंही रंगात न्हाऊन निघाली आहे. याशिवाय दिल्लीत अनेक ठिकाणी झेंडे फडकवण्यात आले आहेत. जगातील टॉप २० राष्ट्रांचे फडकवणारे ध्वज एकत्र ठेवण्यात आले आहेत. जी-२० परिषद ज्या ठिकाणी होणार आहे, त्या ठिकाणी रंगीबेरंगी दिव्यांची सजावटकरण्यात आली आहे. तिथे विविध रंगांचा ‘लाईट शो’ देखील आहे.
प्रगती मैदान येथील ‘भारत मंडपम’ येथे होणार आहे. आयटीपीओ कन्व्हेन्शन सेंटरला खास सजावट करण्यात आली आहे. भारत मंडपममध्ये नटराजाची मूर्ती बसवण्यात आली असून त्यावरही लाईटींग करण्यात आली आहे. चांद्रयान-३ च्या यशानंतर भारताने जगात स्वतःची व्ोगळी ओळख निर्माण केली आहे. जी-२० च्या पार्श्वभूमीवर चांद्रयान-३ चे चित्रं देखील िंभतींवर रेखाटण्यात आले आहे. आयटीओमधील एक इमारत तिरंगी रंगांनी सजवण्यात आली होती. परदेशी पाहुण्यांचे आगमन आणि त्यांची सुरक्षा पाहता सर्व यंत्रणा सतर्क असून दिल्लीत अतिशय चोख सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. रस्त्यालगतची सर्व उद्याने सुशोभित करण्यात आली आहेत. या उद्यानांमध्ये भारताची ओळख दाखवणारे पुतळेही बसवण्यात आले आहेत.