Author: Saimat

साईमत, जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ४ जून २०२३ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ मधील राज्य सेवा गट-अ व गट-ब परीक्षेचा निकाल ६ सप्टेंबरला आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. या पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेकरिता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावांची यादी व गुणांच्या सीमारेषा (कट ऑफ) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या वेळचा कटऑफ पहाता सर्वसाधारण आणि राखीव गटात फारसा फरक उरलेला नाही. या निकालानंतर जाहीर झालेली गुणांची सीमारेषा ही सर्वसाधारण संवर्गासाठी १०८ इतकी आहे. तर इतर मागासवर्ग, भटक्या जमाती-क, भटक्या जमाती-ड, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि निरधिसुचित जमाती या संवर्गासाठीदेखील…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर राज्यात पावसाचे कमबॅक झाले आहे. हवामान खात्याने राज्यात पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार गेल्या दोन दिवसापासून राज्यभरात पाऊस सुरू झाला आहे. खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात देखील पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवनदान मिळणार आहे. देशात मान्सूनवर यंदा अल निनोचा प्रभाव दिसून आला. यामुळे यावर्षी जून आणि ऑगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडला. सप्टेंबर महिन्यात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. कृष्ण जन्माष्टमीला राज्यात पाऊस सुरु झाला आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा…

Read More

साईमत, धुळे : प्रतिनिधी फेसबुकवर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर टाकून बदनामी केल्याप्रकरणी डॉ. संजय िंपगळे यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे, स्वतःला भाजप कार्यकर्ते म्हणवून घेत काहींनी रात्री डॉ. िंपगळे यांना शिवीगाळ करीत त्यांच्या कारची तोडफोड केली. याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. भाजपचे माजी मंडळ अध्यक्ष प्रवीण अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सहा सप्टेंबर रोजी दुपारी चार ते साडेचार या व्ोळेत धुळे शहरातील डॉ. संजय पिंगळे यांच्या फेसबुक खात्यावर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर टाकलेला दिसला. त्यामुळे महाजन यांची बदनामी झाली. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी िंपगळेविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान,…

Read More

साईमत, मुंबई ः प्रतिनिधी राज्यभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सवाचा मोठा उत्साह दिसून आला. मुंबई, ठाणे आणि पुण्यात दहीहंडीचा मोठा जल्लोष असतो. राजकीय नेते आणि सेलिब्रिटींची वर्दळ येथील दहीहंडी सोहळ्यात दिसून येते. राज्याचे मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे ठाण्याचे रहिवाशी असल्याने दहीहंडी उत्सावाला त्यांनी ठाण्यासह, मुंबई आणि विविध ठिकाणी उपस्थिती लावत गोविंदा आणि कार्यकर्त्यांसोबत दहीहंडी उत्सवात उत्साह भरला. दहीहंडी उत्सवात ४० गोविंदा जखमी मुंबईत विविध भागात ४० वर गोविंदा जखमी झाले आहेत. ठाणे शहरात गुरुवारी १३ गोविंदा जखमी झाले आहेत. यामध्ये ९ गोंविदांना कळवा रुग्णालयात तर चार गोविंदांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते.. यामध्ये एका महिला गोंविदाचा समावेश असून त्या…

Read More

साईमत, जालना : प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांची गुरूवारी पुन्हा एकदा अर्जुन खोतकर यांनी सरकारच्या वतीने भेट घेतली. सोबतच सरकारने काढलेल्या जीआरची प्रत देखील जरांगेंना देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र जोपर्यंत सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार नाही, तोपर्यंत आपण उपोषण मागे घेणार नसल्याचे जरांगे यांनी सांगितले. त्यामुळे सरकारने काढलेल्या जीआरमध्ये बदल करून पुन्हा नवीन जीआर काढा, मी उपोषण मागे घेतो असे जरांगे म्हणाले. त्यामुळे उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यासाठी आलेल्या खोतकरांना पुन्हा एकदा खाली हात परतावे लागले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत एक निर्णय घेतला.…

Read More

साईमत, जळगाव- प्रतिनिधी ।   जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून मिळालेल्या निधीचा विनियोग कालमर्यादेत करण्यासाठी शासकीय विभागांनी जादा तास काम करून कामांची गती वाढवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गुरुवारी,  ७ सप्टेंबर रोजी अधिकाऱ्यांना दिले. जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत असलेल्या विविध योजनांचा खर्च व कामकाजाचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, महानगरपालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड, जळगाव उप वनसंरक्षक प्रवीण ए, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरूण पवार आदी उपस्थित होते. बैठकीला विविध शासकीय विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. यावेळी जिल्हा वार्षिक…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांच्या पत्नी स्व. सौ. कांताबाई जैन यांच्या १८ व्या स्मृतिदिनानिमित्त यावर्षी ५१६ सहकाऱ्यांनी रक्तदान केले. शहरातील सेवाभावी संस्थांसह स्नेहाच्या शिदोरी या उपक्रमांतर्गत सुमारे ७०० जणांनी मिष्टान्नाचा लाभ घेतला. कंपनीच्या भारतभरातील प्रमुख आस्थापनांमध्ये करण्यात आले होते. यात टि.सी.पार्क व जैन प्लास्टिक पार्क येथे ३३१, फूड पार्क डिव्हाईन पार्क १४३, अलवर ०४ चित्तूर १६, बडोदा ०८, हैदराबाद १२ आणि कांताई नेत्रालय येथे ०२ सहकाऱ्यांनी रक्तदान केले. जळगावमध्ये जैन प्लास्टिक पार्क-बांभोरी, जैन फूडपार्क, कांताई मंगल कार्यालय येथे आणि भारतातील चित्तुर, बडोदा, हैद्राबाद, उदमलपेठ या ठिकाणी देखील जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी रक्तदान केले. प्लास्टिक पार्क, टाकरखेडा…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी ढोल ताशांचा गजर…शिवतांडवातुन शिवशक्ती जागर…अन् रोप व पोल मल्लखांबांची चित्तथरार प्रात्यक्षिके…त्याला मधुरभक्ती गितांची मैफलीची साथ.. आणि गोविंदा रे गोविंदा…जय घोष करत, महिलांचे एकावर एक मानवी मनोरे…व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी ने महिलांचे धाडस, साहस, आत्मविश्वासाची प्रचिती जळगावकरांनी अनुभवली.. भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन तर्फे आयोजित तरूणींसाठी दहीहंडी उत्सवात एनसीसी, नुतन मराठा महाविद्यालय, विद्या इंग्लीश स्कूल यांना दहीहंडी फोडण्याचा मान मिळाला. यात एनसीसी, नुतन मराठा महाविद्यालय यांनी दहिहंडी फोडली. विशेष पालखीने कृष्ण भगवान साकारलेला चिमुकला अथांग अजय डोहळे सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. काव्यरत्नावली चौकातील तरूणींची दहीहंडी प्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी मधुबन मे कन्हैया…, वो किसना है…, गोविंद बोलो हरी गोपाळ बोलो…, मोरी बन्सी बजे.इया… अशा विविध हिंदी मराठी रिमिक्स गीतांवर कृष्ण, राधा, गोपिका यांनी नृत्य केले.. निमित्त होते श्री कृष्ण जन्माष्टमी सोहळ्याचे.. गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे गुरुवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी दही हंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी व्यासपीठावर गोदावरी फाऊंडेशन चे अध्यक्ष डॉ उल्हास पाटील, वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ आर्विकर, गोदावरी नर्सिंग प्राचार्य विशाखा वाघ, डॉ केतकी पाटील नर्सिंग कॉलेज चे प्राचार्य शिवानंद बिरादार उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन व दहीहंडी पूजन करण्यात आले. यावेळी राधा कृष्णाच्या पेहरावात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. या…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी राष्ट्रीय शुद्ध हवा उपक्रमा अंतर्गत गुरुवार दि.७ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय शुद्ध हवा दिवसाचे अवचित साधून प्रेम नगर येथील ओपन स्पेस मध्ये मियावाकि पद्धतीने वृक्षारोपण आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान शहरात पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. वृक्षारोपण प्रसंगी शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे, पर्यावरण विभागाचे शाखा अभियंता योगेश वाणी, नगरसेविका प्रतिभा देशमुख, नगरसेवक मयूर कापसे, शक्ती महाजन व प्रभागातील नागरिक उपस्थित होते. दरम्यान, शहरातील सार्वजनिक स्थळी तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. सदर उपक्रमाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना शुद्ध हवेचे महत्व सांगण्यात आले. दैनंदिन वापरात कशाप्रकारे हवेचे प्रदूषण आटोक्यात आणता येईल याबाबत पथनाट्याद्वारे माहिती देण्यात आली.

Read More