साईमत जळगाव प्रतिनिधी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे आदेशाप्रमाणे जिल्हा व सत्र न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ६३७७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. लोक अदालतीत ५०९२ दाखलपूर्व व न्यायालयातील प्रलंबीत १२८५ प्रकरणे निकाली काढण्यात आली व त्यामाध्यमातुन एकुण रक्कम रुपये २८,८४,३९,६०२.०२/- वसुल करण्यात आले. दिनांक ०४ ते दि. ०८ सप्टेंबर २०२३ पर्यत राबविण्यात आलेल्या स्पेशल ड्राईव्ह मध्ये एकुण ७७० प्रकरण निकाली काढण्यात आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.क्यु.एस.एम. शेख यांचे विषेश मार्गदर्शन लाभले. उदघाटन प्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अतिरीक्त जिल्हाधिकारी प्रविण…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी भारतातातील नामांकित मॅरेथॉनपैकी एक अशी ओळख असलेल्या ब्रह्मगिरी नाशिक मॅरेथॉन स्पर्धेत जळगाव रनर्स ग्रुपच्या २५ सदस्यांनी सहभाग नोंदविला. मॅरेथॉनमध्ये यावर्षी दोन हजार स्पर्धक सहभागी झाले होते. त्यात जळगाव रनर्स ग्रुपचे ५ पुरुष व 20 महिलांनी आपला सहभाग नोंदविला. ब्रह्मगिरी नाशिक मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी किमान ३ ते ४ महिन्यापूर्वी नोंदणी आवश्यक असते त्यासाठी जळगाव रनर्स ग्रुपच्या सदस्यांनी जळगाव शहर, बहिणाबाई विद्यापीठ, मेहरूण तलाव ट्रॅक याठिकाणी दररोज रनिंगचा सराव केला. डॉ.सीमा पाटील, डॉ.जयश्री राणे, डॉ.सोनाली जैन, प्रणिता चोरडिया, वैशाली बडगुजर, जयश्री पाटील, दीपमाळा काळे, पिंटू काळे, रसिका भोळे, सुचिता हाडा, अतुलसींग हाडा, गजानन सपकाळ आदींनी २२ किलोमीटर वेळेच्या आत…
साईमत जळगाव प्रतिनिधी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पोटदुखीचा त्रास घेऊन आलेल्या रुग्णाच्या पोटातून चार किलोचा गोळा काढून त्याला जीवदान देण्यात वैद्यकीय पथकाला यश आले. आहे. याबद्दल अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर यांनी पथकाचे कौतुक केले आहे. जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील रहिवासी ६० वर्षीय भास्कर बारी यांना गेल्या वीस वर्षांपासून पोटदुखीचा प्रचंड त्रास होत होता. त्यांना हर्निया असल्याबाबत संशय होता. म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव या ठिकाणी उपचारासाठी ते दाखल झाले. त्या ठिकाणी शल्याचिकित्सा विभागाने निदान केल्यानंतर त्यांच्या पोटात गोळा असल्याचे समजले. त्यामुळे रुग्णाच्या जीवाला धोका होता. गोळा काढणे गरजेचे होते. त्यामुळे वैद्यकीय पथकाने रुग्णावर शस्त्रक्रिया करून त्याच्या…
साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव जिल्हा क्रीडा संघटना महासंघाची सभा महासंघाचे अध्यक्ष माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचे अध्यक्षतेखाली शामभाऊ कोगटा यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या निवासस्थानी उत्साहात पार पडली. यावेळी जिल्ह्यातील क्रीडाक्षेत्रातील विविध समस्या व त्यावर करावयाच्या उपाययोजना यावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. सभेस जिल्ह्यातील एकविध जिल्हा क्रीडा असोसिएशनचे सचिव शिवछत्रपती पुरस्कार्थी डॉ प्रदिप तळवलकर, हाजी फारूख शेख, नगरसेवक नितीन बरडे, राजेश जाधव, दिलीप गवळी, जयांशु पोळ, डॉ रणजित पाटील, रविंद्र धर्माधिकारी, प्रशांत कोल्हे, डॉ अनिता पाटील, निलेश बाविस्कर, योगेश सोनवणे, नरेंद्र भोई, अजित घारगे, अनिल माकडे व पाटील पहेलवान यांची उपस्थिती होती.
साईमत जळगाव प्रतिनिधी जिल्हा व सत्र न्यायालय येथे दि ९ सप्टेंबर रोजी जळगाव जिल्हा विधी सेवा प्रधिकरण तर्फे राष्ट्रीय लोक अदालत पार पडली. याप्रसंगी एका मोटर अपघात नुकसान भरपाई प्रकरणांमध्ये तळजोडी साठी लोक अदालत चे नेमलेले पॅनल कोर्ट हॉल मधून थेट न्यायालयातील वाहनतळात आले होते. सदर प्रकरणांमध्ये चर्चेअंती इन्शुरन्स कंपनीने अर्जदार सोपान बहडू रोटे यांना तीन लाख पंधरा हजार रुपयांचे नुकसान भरपाईदेण्याचे कबूल केले. त्यानुसार सदरचे प्रकरण हे लोक न्यायालयाच्या माध्यमातून निकाली काढण्यात आले. जळगाव येथील मोटर अपघात दावा प्रदीकरणाकडे सोपान भादू रोटे यांनी त्यांचा दिनांक १४/०६/२०२२ रोजी जळगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत रस्ता अपघातात झालेल्या गंभीर दुखापती साठी व…
साईमत जळगाव प्रतिनिधी येथील खुबचंद सागरमल विद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रविण पाटील यांना शैक्षणिक क्रीडा व पर्यावरण क्षेत्रातील कार्याबद्ल त्यांना रोटरी क्लब ऑफ जळगांव तर्फे मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. प्रविण पाटील यांनी मागील १० वर्षात 354 शाळाबाह्य विदयार्थांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले असुन गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले बेटी बचाव बेटी पठाव या उपक्रमात हि सहभागी होऊन अनेक उपक्रम यशस्वी केले आहेत. बालगुन्हेगार तयार होऊ नये म्हणुन ते अनेक ठिकाणी जाऊन मुलांना प्रबोधन करतात पर्यावरण क्षेत्रात त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. क्रीडा क्षेत्रात हि अनेक राज्य राष्ट्रीय खेळाडु त्यांनी घडविले आहे व अनेक क्रीडा स्पर्धाचे आयोजन हि त्यांनी यशस्वीरित्या केले आहे. त्यांच्या या…
साईमत मुंबई प्रतिनिधी महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा मी वेगवेगळ्या भागात गाडीने फिरत असतो आणि आजूबाजूची बहरलेली शेती बघतो तेव्हा मला त्या हिरव्यागार बहरलेल्या शेताकडे बघताना भवरलाल जैन व ना. धों. महानोर या माझ्या दोन मित्रांची आठवण येते असे वक्तव्य महानोर यांच्या श्रद्धांजलीपर आयोजित कार्यक्रमात निवेदक शंभू पाटील यांनी विचारलेल्या, तुमचे प्रिय मित्र भवरलाल जैन व ना. धों. महानोर नसताना आपण याकडे कसे पाहतात, प्रश्नावर बोलताना शरद पवार यांनी सांगीतले. यशवंतराव चव्हाण सेंटर , भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन आणि परिवर्तन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमान मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये महानोर यांना गीते आणि कवितांतून श्रद्धांजली अर्पण करणाऱ्या “हा कंठ दाटूनी आला” या…
साईमत जळगाव प्रतिनिधी तालुक्यातील वावडदा येथील एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये “आजी आजोबा दिवस” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष एल. एच. पाटील, जितेंद्र पाटील, उपाध्यक्ष वीरेंद्र पाटील, संचालिका वैशाली पाटील, दगडूसिंग परदेशी, शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री पाटील, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सुजिता साळुंखे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. प्रसंगी स्वर्गीय विजयाताई लालसिंग पाटील यांच्या तृतीय पुण्यस्मरणास स्मरण करीत त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर शाळेच्या शिक्षिका समूहाने “आई” ला संबोधून एक गीत सादर केले तसेच शाळेचे कलाशिक्षक कुशराजे पवार यांच्या समूहाने स्वागत गीत सादर केले. आजी…
साईमत, जालना: प्रतिनिधी मराठवाड्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी आमची मागणी होती. आम्ही राज्य सरकारने ७ सप्टेंबरला काढलेल्या अधिसूचनेत (जीआर) बदल सुचवला होता. ‘वंशावळीत कुणबी नोंद असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल’ याऐवजी ‘सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल’, असा बदल आम्ही सुचवला होता. मात्र, राज्य सरकारने त्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. संबंधित जीआरमध्ये कोणतीही दुरुस्ती केली नाही. त्यामुळे आम्ही आमचा पुढील निर्णय मराठा बांधवांशी चर्चा करुन घेऊ. तोपर्यंत आमरण उपोषण सुरुच राहील, असा मनोदय मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. ते शनिवारी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांनी…
साईमत, नवी दिल्ली : वृत्तसंस्था जी २० शिखर परिषदेला शनिवारी (९ सप्टेंबर) देशाच्या राजधानीत सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या दोन दिवसीय परिषदेसाठी जोरदार तयारी करण्यात येत होती. जगभरातील अनेक नेते, या परिषदेसाठी भारतात आल्याने त्यांच्या योग्य पाहुणचारासाठी भारताने खबरदारी घेतली आहे. दरम्यान, शिखर परिषदेला सुरुवात होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. कारण, या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरील नामफलकावर भारत असा उल्लेख आहे. गेल्या काही दिवसांपासून सरकारच्या अनेक दस्ताऐवजातून इंडिया नाव वगळून त्यात भारत असे नाव जाणीवपूर्वक लिहिले जात आहे. जी २० परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेत ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख झाल्यानंतर हे प्रकरण…