मुख्यमंत्र्यांच्या लिफाफ्यात फक्त आश्वासन, जरांगेंनी प्रस्ताव धुडकावला, उपोषणावर ठाम

0
2

साईमत, जालना: प्रतिनिधी

मराठवाड्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी आमची मागणी होती. आम्ही राज्य सरकारने ७ सप्टेंबरला काढलेल्या अधिसूचनेत (जीआर) बदल सुचवला होता. ‘वंशावळीत कुणबी नोंद असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल’ याऐवजी ‘सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल’, असा बदल आम्ही सुचवला होता. मात्र, राज्य सरकारने त्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. संबंधित जीआरमध्ये कोणतीही दुरुस्ती केली नाही. त्यामुळे आम्ही आमचा पुढील निर्णय मराठा बांधवांशी चर्चा करुन घेऊ. तोपर्यंत आमरण उपोषण सुरुच राहील, असा मनोदय मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. ते शनिवारी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांनी पाठवलेल्या शिष्टमंडळाची शुक्रवारी मुंबईत चर्चा झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका सीलबंद लिफाफ्यात मनोज जरांगे यांना संदेश पाठवला होता. हा लिफाफा घेऊन अर्जुन खोतकर शनिवारी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांना भेटले. लिफाफा मनोज जरांगे यांच्यासमोरच उघडण्यात आला. मात्र, त्यात त्यांची सपशेल निराशा झाली. त्यामुळे उपोषण मागे घेण्यास जरांगे पाटील यांनी नकार दिला. अर्जुन खोतकर यांची शिष्टाई पुन्हा एकदा अयशस्वी ठरली. दरम्यान, जरांगे म्हणाले की, माझ आमरण उपोषण सुरु आहे. आता अन्न, पाणी आणि सरकारकडून सुरु असलेल्या उपचाराचे देखील त्याग करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here