राष्ट्रीय लोक अदालतीत तळजोडी साठी पॅनल कोर्ट पोहचले न्यायालयातील वाहनतळात

0
3

साईमत जळगाव प्रतिनिधी

जिल्हा व सत्र न्यायालय येथे दि ९ सप्टेंबर रोजी जळगाव जिल्हा विधी सेवा प्रधिकरण तर्फे राष्ट्रीय लोक अदालत पार पडली. याप्रसंगी एका मोटर अपघात नुकसान भरपाई प्रकरणांमध्ये तळजोडी साठी लोक अदालत चे नेमलेले पॅनल कोर्ट हॉल मधून थेट न्यायालयातील वाहनतळात आले होते. सदर प्रकरणांमध्ये चर्चेअंती इन्शुरन्स कंपनीने अर्जदार सोपान बहडू रोटे यांना तीन लाख पंधरा हजार रुपयांचे नुकसान भरपाईदेण्याचे कबूल केले. त्यानुसार सदरचे प्रकरण हे लोक न्यायालयाच्या माध्यमातून निकाली काढण्यात आले.

जळगाव येथील मोटर अपघात दावा प्रदीकरणाकडे सोपान भादू रोटे यांनी त्यांचा दिनांक १४/०६/२०२२ रोजी जळगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत रस्ता अपघातात झालेल्या गंभीर दुखापती साठी व त्यामुळे त्यांना आलेल्या अपंगत्वपोटी नुकसान भरपाईचा दावा मेहरबान प्रधिकरणासमोर दाखल केला होता. या प्रकरणांमध्ये आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी यांच्यावर रुपये पाच लाख मिळण्याकरिता मोटार अपघात नुकसान भरपाईचा दावा ॲड महिंद्र सोमा चौधरी मार्फत दाखल केला गेला होता. अर्जदार हे वयोवृद्ध होते व अपघातामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात अपंगत्व आल्यामुळे त्यांना न्यायालयाच्या पायऱ्या देखील चढता येत नव्हत्या. अर्जदाराची परिस्थिती पाहता थेट लोकन्यायालयाचे संपूर्ण पॅनल हे न्यायालयातील आवारात असलेले वाहनतळ येथे आले व सदर प्रकरणी तडजोड नामा बनवत निवाडा घोषित केला.
याप्रसंगी अर्जदार यांनी त्यांच्या करिता थेट जिल्हा न्यायाधीश जे. जे. मोहिते, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव स. पी सय्यद यांचे आभार मानले. अर्जदारांतर्फे ॲड महेंद्र सोमा चौधरी, ॲड हेमंत जाधव, ॲड श्रेयस महेंद्र चौधरी उपस्थित होते. आयसीआयसीआय लोम्बार्ड तर्फे सहदेव जगताप , ॲड अनुप देशमुख यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here