जळगावच्या विकासाकरिता सकारात्मक भूमिका महत्त्वाची : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

0
2

साईमत जळगाव प्रतिनिधी

जळगावच्या विकासाकरिता सकारात्मक भूमिका महत्त्वाची असून त्यातून जिल्ह्याच्या नावलौकिकात भर पडेल जेणे करून त्याचा फायदा जिल्ह्याच्या विकासाकरिता करता येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. ते रोटरी मिन्स बिझिनेस, लघु उद्योग बँक व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या सैयुक्त विद्यमाने आयजित उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या व हॉटेल प्रेसिडेंट येथे आयोजित आर. एम. बी. बिझिनेस समिट प्रसंगी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पुढे म्हणाले की, सरकारचे व्यवसाय स्थापनेबाबत सर्व कागद पत्र आज ऑनलाईन उपलब्ध आहे. त्याचा उपयोग करून नव युवकांनी उद्योग क्षेत्रात यावे. जेणे करून जळगावच्या नावलौकिकात भर पडेल. शासन तुम्हाला सर्व सुविधा द्यायला तयार आहे. फक्त तुम्ही उद्योगासाठी समोर या असेही ते म्हणाले, त्यांनी जळगाव विकास आराखडा मांडताना उपलब्ध सुविधा व त्यावर आधारित व्यवसाय उद्योगास पूरक अशा महत्त्वपूर्ण बाबींवर चर्चा केली व यावर सर्वांनी लक्ष केंद्रित केल्यास जिल्ह्यातील विकासाला चांगले वळण मिळेल असे नमूद केले. आर. एम. बी. व महाराष्ट्र चेंबर ऑफ कमर्सच्या अशा समिट मधून ते साध्य होईल अशी आशा व्यक्त केली.

यावेळी व्यासपीठावर रो. आशा वेणुगोपाल, रोटरी प्रांतपाल, ललित गांधी, अध्यक्ष महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीज, गौरव सामनेरकर, डिस्ट्रिक्ट चेअर, जळगाव चॅपटरचे संस्थापक अध्यक्ष दीपककुमार पाटील, मानद सचिव डॉ. राहुल भन्साळी उपस्थित होते.
बिझिनेस समिट च्या निमित्ताने आयोजित एक्सपोचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विविध विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आले. यावेळी रोटरी प्रांतपाल आशा वेणुगोपाल यांनी रोटरी व आर एम बी बाबत आपली भूमिका विषद केली. अशा बिझिनेस समिट मधून व्यवसाय उद्योग विकास होऊन रोटरीच्या सामाजिक कार्यास मदतच होईल याबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी लघुउद्योग बँकेचे सहा. महा व्यवस्थापक मनोजकुमार सहयोगी यांनी उद्योगा करीता लागणाऱ्या विविध प्रकारच्या योजना आर्थिक योजनांबाबत विशेष मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इण्डस्ट्रीज चे अध्यक्ष ललित गांधी यांनी उद्योकांसाठी ते करीत असलेल्या कार्याची माहिती देऊन उद्योग वाढीस पूरक अशा विशेष बाबींवर प्रकाश झोत टाकला. युवा उद्योजक यांना देखील त्यांनी यावेळी काही अतिशय माहिती पूर्ण अशा टिप्स दिल्यात. यावेळी चेंबरचे पदाधिकारी महेंद्र रायसोनी, श्री इंगळे, किरण बच्छाव, ,सुयोग जैन, जिल्हा उद्योग केंद्राचे श्री डोंगरे यांच्यासह संगीता पाटील, अध्यक्षा महिला उद्योजकता, महाराष्ट्र ह्या देखील उपस्थित होत्या.
बिझिनेस समिटला खा. उन्मेष पाटील यांनी अचानक भेट दिली. त्यांनी देखील जळगाव विकास बाबत त्यांचे विचार मांडलेत. उपस्थित नवं उद्योजकांना प्रोत्साहन दिले. व्यावसायिक, शैक्षणिक, कृषी क्षेत्रात काय करता येईल याबाबत भूमिका स्पष्ट केली.
या बिझिनेस समिटला दीपक बिल्डर्स अँड डेव्हलोपर्स यांचे मुख्य प्रायोजक म्हणून तर सातपुडा ऑटोमोबाईल व फोकस ह्यांदाई यांचे सह प्रायोजक म्हणून विशेष सहकार्य लाभले.
प्रास्ताविक अध्यक्ष दीपककुमार पाटील यांनी केले तर आभार सचिव डॉ राहुल भन्साळी यांनी मानले. सूत्रसंचालन समिट चेअरमन मनीष पात्रीकर यांनी केले. यशस्वीतेसाठी स्वप्नील जाखेटे, डॉ. जगमोहन छाबडा, डॉ राजेश पाटील, डॉ. मोनिका जाधव, प्रवेश मुंदडा, प्रसन्न जैन, भद्रेष शाह, मितेश पलोड, डॉ. नीरज अग्रवाल, मितेश शाह, विनोद भोईटे – पाटील आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here