साईमत जळगाव प्रतिनिधी पाणी वापर हा काटकसरीने करून गिरणा प्रकल्पावरील कालवा प्रणालीवरीलअनुषंगिक बांधकामे, माती भराव यासह तात्काळ दुरुस्तीच्ची कामे हाती घेण्यात यावी, गिरणा कालवा प्रणालीची कामे ६० वर्षांपूर्वी झाली असल्याने “कालवा प्रणालीचा नुतनीकरणाचा प्रस्ताव“ शासनास सादर करावा तसेच जिल्ह्यात भविष्यात पाणी टंचाई उपाययोजना बाबत सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. जिल्हास्तरीय पाणी आरक्षण समिती आणि कालवा सल्लागार समितीची बैठक ना. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या सभागृहात घेण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. गिरणा धरण यावर्षी गेल्या वर्षाच्या तुलनेत केवळ ५७ टक्के भरल्याने सिंचनाचे आवर्तन सोडण्यास अडचण निर्माण होणार आहे. मात्र…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव तर्फे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार जळगाव शहरामध्ये राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण चाचणी घेण्यात आली. या चाचणीमध्ये इयत्ता तिसरी सहावी तसेच नववीच्या विद्यार्थ्यांची भाषा व गणित या विषयाची चाचणी घेण्यात आली. पायाभूत स्तर तपासण्यासाठी इयत्ता ३ री ,प्राथमिक स्तर तपासण्यासाठी इयत्ता सहावी तर मध्यस्थर तपासण्यासाठी इयत्ता ९ वी च्या वर्गाची ही परीक्षा घेण्यात आली. सदर परीक्षेत प्रत्येक वर्गासाठी एकूण ३० विद्यार्थी प्रमाणे मनपा क्षेत्रासाठी ९० केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. सदर चाचणी साठी समाजकार्य विभाग चे विद्यार्थी उ.म.वि.जळगावचे क्षेत्रीय अन्वेषक यांचे अनमोल…
साईमत जळगाव प्रतिनिधी दि जळगाव पीपल्स को.ऑप. बँक आयोजित व नाबार्ड प्रायोजितमहिला बचत गट उत्पादन विक्रीचा पाच दिवसीय ‘दिवाळी महोत्सव 2023’ दिनांक २ ते ६ नोव्हेंबर दरम्यान यशोदया हॉल, रिंग रोड, जळगाव येथे राबविण्यात येत आहे. दिवाळी महोत्सवाचा आरंभ गुरुवार दि. २ नोव्हेंबर रोजी आय.एम.आर. कॉलेजच्या संचालिका शिल्पा बेंडाळे, महानगरपालिका बचत गट विभागाच्या गायत्री पाटील यांच्या हस्ते तसेच बँकेचे चेअरमन अनिकेत पाटील, चेअरमन-बीओएम भालचंद्र पाटील, संचालक डॉ. सी.बी.चौधरी, प्रविण खडके, बचत गट विभाग प्रमुख शुभश्री दप्तरी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. प्रास्ताविक बचत गट विभाग प्रमुख शुभश्री दप्तरी यांनी केले. यावेळी आय.एम.आर. कॉलेजच्या संचालिका शिल्पा बेंडाळे, महानगरपालिका बचत गट विभागाच्या गायत्री…
साईमत जळगाव प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, विभागस्तर शालेय स्क्वॅश क्रीडा स्पर्धा २०२३-२४ चे आयोजन नुकतेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात नाशिक येथे आयोजित करण्यात आले होते. त्यात एकलव्य क्रीडा संकुलातील स्क्वॅश अॅकॅडमीच्या १७ खेळाडूंची शालेय राज्यस्तर स्पर्धेत निवड करण्यात आली. स्पर्धेत १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील नाशिक, धुळे व जळगांव येथील खेळाडूंनी सहभाग नोंदविला. राज्य स्तर स्क्वॅश स्पर्धेकरिता एकलव्य स्क्वॅश अॅकॅडमीतील निवड झालेल्या खेळाडूमध्ये १४ वर्षे वयोगट मुलींमध्ये आर्या देशपांडे, इशा देशपांडे , पल्लवी मांडे, मुले- अथर्व खांडरे, यश हेमनानी, तन्मय पाटील, आरुष चौधरी ,…
साईमत जळगाव प्रतिनिधी कृषी विस्ताराच्या कार्यात गेल्या आठ वर्षांपासून प्रभावीपणे कार्य करणार्या अॅग्रोवर्ल्डतर्फे शहरातील एकलव्य क्रीडा संकुल, एम. जे. कॉलेज येथे 3 ते 6 नोव्हेंबर दरम्यान भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते शुक्रवारी (3 नोव्हेंबर) रोजी दुपारी 12 वाजता होईल. निर्मल सीड्सचे डॉ. सुरेश पाटील, प्लॅन्टो कृषीतंत्रचे स्वप्नील चौधरी, ओम गायत्री नर्सरीचे मधुकर गवळी, मेट्रोजेन बायोटेकचे प्रियंक शहा यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. प्रदर्शनात प्रवेश मोफत असून तंत्रज्ञानावर आधारीत या कृषी प्रदर्शनाचा शेतकर्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अॅग्रोवर्ल्डचे संचालक शैलेंद्र चव्हाण यांनी केले आहे. तब्बल चार एकर परिसरात 210…
साईमत एरंडोल प्रतिनिधी आपण वनस्पतीचे गार्डन पाहतो, फुलांचा बगीचा पाहिला असेल. मात्र एरंडोल नगरपरिषदेने तब्बल ३३ गुठ्यांत पुस्तकाचा बगीचा साकारला आहे. वाचन संस्कृती वाढविण्याच्या दृष्टीने राज्यासाठी हा प्रयोग आदर्श ठरू शकणार आहे. राज्यातला अशा प्रकारचा पुस्तकांचा एकमेव बगीचा आहे हे विशेष ! आपण विविध प्रकारचे गार्डन पाहता, मात्र एरंडोल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या संकल्पनेतून वाचन संस्कृती टिकून राहावी, त्यात वाढ व्हावी या उद्देशाने शहरात पुस्तकांच्या बगीच्याची निर्मिती केली आहे. हा बगीचा एरंडोल शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. ३३ गुठ्यांत साकारणार पुस्तक बगीचा शहरातील आनंद नगर भागात 33 गुंठे म्हणजेच बीघा भर जागेत पुस्तकांचा बगीचा साकारला जातो आहे. या नाविन्यपूर्ण…
साईमत न्यूज एन दिवाळीच्या तोंडावर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्याच्या खिशाला महागाईचा चांगलाच फाटक बसला असून व्यासायिक LPG गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्तिर ठेवत व्यासायिक LPG सिलिंडरच्या किमतीत तब्बल १०१.५० रुपयांनी वाढ केली आहे. १०१.५० रुपयांच्या विक्रमी वाढीनंतर आता आपल्या राजधानी दिल्लीत व्यवसायिक LPG सिलिंडरची नूतन किंमत १८३३ रुपये इतकी आहे. मात्र १४.२ किलोच्या घरगुती LPG सिलिंडरच्या किमतीत अद्याप कोणताही बदल झालेला नाही. म्हणजेच LPG सिलिंडर जुन्या किमतीतच मिळणार आहे. मुंबईमध्ये घरगुती गॅस सिलेंडरची किंमत सध्या 902.50 रुपये एवढी आहे. गेल्या महिन्यात देखील भाव वाढले होते तेल कंपन्यांनी गेल्या महिन्याच्या पहिल्या तारखेला म्हणजेच…
साईमत जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्र ऑर्थोपेडिक्स असोसिएशन तर्फे ३९व्या राज्य वार्षिक परिषदेचे २७ ते २९ ऑक्टोबर दरम्यान तीन दिवस गांधीतीर्थ येथे आयोजन करण्यात आल्याची माहिती परिषदेचे आयोजन चेअरमन डॉ. सुनील नाहाटा, सेक्रेटरी डॉ. हर्षवर्धन जावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. आयएमएच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत संचालक डॉ. अनिल खडके, जळगाव जिल्हा ऑर्थोपेडिक्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र सरोदे, सचिव डॉ. भूषण झवर, को- चेअरमन डॉ. जितेंद्र कोल्हे, सायंटिफिक चेअरमन डॉ. विनोद जैन, ज्येष्ठ सर्जन डॉ.प्रकाश कोचर, डॉ.मिलिंद कोल्हे आदिंची उपस्थिती होती. सुमारे ३२ वर्षानंतर जळगाव जिल्हा ऑर्थोपेडिक्स असोसिएशनला राज्य वार्षिक परिषदेच्या यजमानपदाची संधी मिळाली आहे. परिषदेत राज्याबाहेरील नऊ तज्ञ मार्गदर्शकांसह राज्यातील ५००अस्थिरोग तज्ञांचा…
साईमत जळगाव प्रतिनिधी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बाळंत महिलेला ट्युमर असल्याचे निदान झाले. त्यानंतर शल्यचिकित्सा विभागाने गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून महिलेच्या पोटातून मोठा गोळा काढत सदर महिलेचा जीव वाचविण्यात यश मिळविले. वैद्यकीय पथकाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी अभिनंदन केले आहे. यावल येथे राहणाऱ्या २२ वर्षीय महिला ह्या गरोदर होत्या. त्यावेळी त्यांच्या पोटात बाळासह एक मोठी गाठ वाढत असल्याचे खाजगी दवाखान्यात सांगण्यात आले होते. या महिलेची प्रसूती नॉर्मल झाल्यावरही हि गाठ कमी झाली नव्हती. तेव्हा खाजगी दवाखान्याने शस्त्रक्रिया सांगून खर्च सांगितला. मात्र खर्च परवडणार नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे शल्यचिकित्सा विभागात डॉ. प्रशांत…
साईमत जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षा मार्फत झालेल्या परीसर मुलाखतीमध्ये विद्यापीठाच्या बी.टेक. केमीकल इंजिनिअरींगच्या दोन विद्यार्थ्यांची गेक्स्कॉन इंडिया प्रा.लि. पुणे या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली आहे. निकीता पाटील व कल्पेश राणे या दोन विद्यार्थ्यांची याच कंपनीत इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर ऑनलाईन मुलाखत घेण्यात आली. कंपनीचे उपाध्यक्ष सत्य मंगीपुडी, व्यवस्थापक अनिल अव्हरे व गोविंद पाटील यांनी मुलाखत घेतली. या दोन्ही विद्यार्थ्यांना ३.६० वार्षिक वेतन देण्यात आले. कक्षाचे उपसमन्वयक डॉ. उज्वल पाटील यांनी मुलाखतीचे व्यवस्थापन केले. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, संचालक प्रा. जे.बी. नाईक, समन्वयक प्रा. रमेश…