आमदार राजुमामांतर्फे गाळेधारकांना दिवाळीची भेट

0
17

साईमत जळगाव प्रतिनिधी

जळगाव शहरातील महापालिकेच्या गाळे धारकांना भाडे पट्टा नूतनीकरण नवीन दराची अंमलबजावणी सन २०१९ पासून करणार असल्याचा निर्णय शासनाने घेतला होता. परंतु आमदार राजुमामा भोळे यांनी भाडेपट्टा वसुली सुधारित दर हा भाडेपट्टा करारनामा संपल्याच्या कालावधी पासून म्हणजेच सन २०१२ पासून लागू करणेसाठी मागणी केली होती. त्यास अखेर मंगळवार दि. ७ रोजी मान्यता मिळाली आहे. यामुळे गाळेधारकांना दिलासा मिळाला असून आमदार राजुमामा भोळे यांचे कडून गाळेधारकांना दिवाळीची भेट मिळाली आहे.

जळगाव शहरातील महापालिकेच्या व्यापारी संकुलातील २३६८ गाळेधारकांचा भाडेपट्टा नूतनीकरणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. दरम्यान आमदार सुरेश भोळे यांनी शासनाकडे सततच्या पाठपुराव्या मुळे दि.१० ऑक्टोबर, २०२३ रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेऊन मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, ना. अजित पवार, ग्रामविकास मंत्री ना. गिरीश भाऊ महाजन, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, मंत्री ना. अनिल पाटील यांच्या माध्यमातून गाळेधारकांच्या भाडेपट्टा निश्चिती व गाळे नूतनीकरणाचा मार्ग मोकळा झाला होता.

व्यापारी संकुलातील गाळेधारकांचा प्रश्न आता सुटल्याने महानगरपालिकेच्या उत्पन्नात भर पडेल व जळगाव शहराच्या विकासासाठी मदत होईल, शासन निर्णयाचे स्वागत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री ना. अनिल पाटील, नगरविकास विभागाच्या उपसचिव विद्याजी हम्प्या यांच्या विशेष सहकार्यामुळे यश मिळाले असल्याचे आमदार राजुमामा भोळे यांनी सांगितले.

दिवाळीच्या मुहूर्तावर ही जळगाव शहरातील गाळे धारकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असून यामुळे जळगाव शहर महानगरपालिका हद्दीतील गाळे धारकांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला स्थावर मालमत्तेचे भाडे पट्यावरद्वारे हस्तांतरण आणि भाडेपट्याचे नुतनीकरन करण्याचा प्रश्न मोकळा झालेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here