Author: Saimat

साईमत जळगाव प्रतिनिधी कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्राच्या मागणीसाठी गेल्या २६ दिवसांपासून उपोषणाला बसलेले जगन्नाथ बावीस्कर आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या आंदोलनाची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत सांगता झाली. पालकमंत्र्यांच्या हस्ते श्री.बावीस्कर यांना उसाचा रस पाजत उपोषण सोडविण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयास समोर सुरू असलेल्या उपोषणाच्या सांगते वेळी आमदार चंद्रकांत पाटील, आमदार रमेश पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तसेच मोठ्या संख्येने कोळी समाज बांधव उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, कोळी समाजाच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दोन बैठका आयोजित करण्यात आल्या. कोळी समाजाच्या जातीच्या तसेच इतर विविध प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली. अधिसंख्यपदांचा सर्वात मोठा विषय मुख्यमंत्र्यांनी सोडविला आहे.…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान जळगाव तर्फे रंगभूमी दिनाचे औचित्य साधून प्रेत यात्रा घेऊन जाणाऱ्या शव वाहिनीचे लोकार्पण जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने, माजी महापौर सिमाताई भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. या यावेळी भालेराव प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद भालेराव व सर्व कार्यकर्ते यांनी प्रमुख पाहुणे सतीश मदाने यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांचा व माजी महापौर सीमाताई भोळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास यशवंते यांनी व आभार प्रदर्शन प्रबुद्ध भालेराव यांनी केले. यावेळी अरुण सोनवणे, प्रवीण सपकाळे, दीपक जोशी, माजी नगरसेवक राजेंद्र मराठे, माजी नगरसेवक अमोल सांगोरे, हेमंत चंदनकर, विलास मते, विठ्ठल भालेराव, भाऊराव सुरळकर, कुलदीप…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील एकलव्य क्रीडा संकुल मैदानावर सुरू असलेल्या अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनास पहिल्या तीनच दिवसात हजारो शेतकर्‍यांनी भेटी दिल्या. यात प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यासह धुळे, छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा, अकोला, बर्‍हाणपूर आदी जिल्ह्यातून शेतकरी आले होते. दरम्यान, प्रदर्शनाचा आज समारोप होणार असल्याने शेतकर्‍यांनी या आधुनिक तंत्रज्ञानाने उपयुक्त ठरणार्‍या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अ‍ॅग्रोवर्ल्डच्या कृषी प्रदर्शनात प्रक्रीया उद्योगासाठी मिनी दाल मिल, फवारणीसाठीचे ड्रोन, मजूर समस्येला पर्यायी इलेक्ट्रिक बुल, मिल्कींग मशीन, प्राण्यांपासून पिकांचे सरंक्षण करणारे झटका मशीन यासांरखे वैशिष्ठ्यपूर्ण व अत्याधुनिक कृषी उपकरणांचे स्टॉल उपलब्ध आहेत. शेतकर्‍यांनी नेहमी आशावादी राहीले पाहीजे. जगात सर्व मिळू शकते, परंतु आशा कुठेच मिळत…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी येथील भारत विकास परिषदेच्या देशासाठी बलिदान दिलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांसमवेत दिवाळी या उपक्रमामुळे सैनिकांच्या कुटुंबियांसोबतच मान्यवर देखील भारावून गेले. मायादेवी नगरातील रोटरी भवनात आयोजित कार्यक्रमास तहसीलदार विजय बनसोडे, माजी महापौर सीमा भोळे, माजी नौसेना अधिकारी हरीश यादव, रा.स्व.संघाचे महानगर संघचालक उज्वल चौधरी, क्षेत्रीय सचिव तुषार तोतला, अध्यक्ष महेश जडिये, सचिव उमेश पाटील यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी छाया वारुड, मीराबाई मनोरे, रत्‍नाबाई धनगर, ज्योती पाटील, प्रतिभा माळी, छायाबाई सोनवणे, सुरेखा देशमुख, रमेश पवार, भावना पाटील, सुनंदा पाटील, कविता जाधव या शहीद सैनिकांच्या कुटुंबियांचा श्रीफळ, साडी, दिवाळी फराळ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात सैनिकांच्या वीर माता व…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मध्ये दिनांक ४ नोव्हेंबर रोजी सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धा तीन फेरीत घेण्यात आली होती. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत ४७० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी अंतिम फेरीसाठी २४ विद्यार्थ्यांचे राणी लक्ष्मीबाई , तिलक,आझाद, नेताजी असे चार गट करण्यात आले.या गटांसाठी भाषा, साहित्य सामाजिक शास्रे, सामान्य विज्ञान, क्रीडा, चालू घडामोडी यांवर प्रश्न विचारण्यात आले होते. सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक राणी लक्ष्मीबाई आणि द्वितीय क्रमांक तिलक आणि तृतीय क्रमांक नेताजी या गटांनी मिळवला आणि त्यांना प्रमाणपत्र व पुरस्कार देण्यात आला.स्पर्धेसाठी ,डॉ. निलश्री सहजे यांनी परिक्षण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी मराठी नाटकाची परंपरा व वारसा जपण्यासाठी दरवर्षी दि. ५ नोव्हेंबरला मराठी रंगभूमी दिन साजरा केला जातो. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखा व बालरंगभूमी परिषद जळगाव यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शहरातील रंगकर्मींनी बालगंधर्व खुले नाट्यगृहात एकत्रित होत श्री नटराज व रंगभूमी पूजन करत जागतिक मराठी रंगभूमी दिवस साजरा केला. रंगभूमीसाठी कार्यरत असणाऱ्या प्रत्येकासाठी जागतिक रंगभूमी दिन महत्त्वाचा आहे. मराठी रंगभूमीला जवळ जवळ १७० हुनही जास्त वर्षांची परंपरा आहे. १८४३ मध्ये सांगली येथे मराठी रंगभूमीचा पाया रचला गेला. चिंतामणराव पटवर्धन यांच्या आश्रयात विष्णुदास भावे यांनी ०५ नोव्हेंबर १८४३ साली “सीता स्वयंवर” या नाटकाचा प्रयोग केला…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ घोषित करण्यात आला असून सदर चा संघ नूतन मराठा महाविद्यालय येथील व्हॉलीबॉल मैदानात झालेल्या निवड चाचणी मधून निवडण्यात आला आहे. महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनच्या मान्यतेने व नाशिक जिल्हा पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशन च्या सहकार्याने विभागीय युथ २१ वर्षा आतील व्हॉलीबॉल स्पर्धचे आयोजन ११ नोव्हेंबर रोजी शिवछत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सी.बी.एस. नासिक येथे करण्यात आले आहे. सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जळगाव जिल्हा पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशन यांचे वतीने नूतन मराठा महाविद्यालय येथील व्हॉलीबॉल मैदानात निवड चाचणी घेण्यात आली यात जिल्ह्यातील ३५ मुलांनी सहभाग नोंदविला व त्यातून जिल्ह्याचा संघ निवडण्यात आला. संघाची घोषणा अध्यक्ष फारुक शेख,…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी केळी पीक विम्याची प्रलंबित मदत व या वर्षातील २७ महसूल मंडळातील २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची ग्वाही विमा कंपनीने दिली आहे. त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्याची माहिती राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. राज्य शासनाने पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना आंबिया बहार सन २०२२-२३ साठी राज्य हिस्स्याची १९६ कोटी इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी मंजुरी देवून निधी वितरित केला होता. यामुळे जिल्ह्यातील रखडलेला पिक विमा नुकसान भरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होवून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा शासनाचा…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून २००८ मध्ये जिल्ह्यात भडगाव, एरंडोल व पारोळा तालुक्यातील नद्या व कालवे जोडून भुजल पातळी वाढविण्यासाठीचे काम मंजूर करण्यात आले होते. याकामात जमीन संपादन झालेल्या १४३ शेतकऱ्यांना २०१८ मध्ये पन्नास टक्के मोबदला रक्कम मिळाली होती. त्यानंतर पाच वर्षाच्या प्रतिक्षेनंतर ३ कोटी ७४ लाख ९२ हजारांची उर्वरित मोबदला रक्कम मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवरील आनंद गगनात मावत नव्हता. शेतकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेत आभार मानले आहेत. जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून भडगाव (जुवार्डी, आडळसे, पथराड,गुढे), एरंडोल (गालापूर) व पारोळा (पळासखेडे सिम, नगांव, मंगरूळ, मोरफळ) तालुक्यातील ६ नदीजोड…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी तंत्रज्ञानात दररोज बदल होत असतो आणि हे नवनवीन तंत्रज्ञान कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून एकाच छताखाली उपलब्ध करुन देण्याचे काम अ‍ॅग्रोवर्ल्ड मागील 9 वर्षांपासून करीत आहे. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी केले. दरम्यान, प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी जोरदार प्रतिसाद लाभला. प्रदर्शनस्थळी शेतकर्‍यांनी विक्रमी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. जळगाव शहरातील एकलव्य क्रीडा संकुल (एम. जे. कॉलेज) येथे दि. ३ ते ६ नोव्हेंबर दरम्यान आयोजित अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांच्या हस्ते झाले. प्लॅन्टो कृषीतंत्रचे स्वप्नील चौधरी, ओम गायत्री नर्सरीचे राजेंद्र गवळी, मेट्रोजेन बायोटेकचे प्रियंक शहा,…

Read More