साईमत जळगाव प्रतिनिधी रब्बीचा हंगाम सुरु असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात कृषीपंप वापरण्यात येत आहेत. कृषीपंपाना सुरळीत आणि अखंडित वीज पुरवठा सुरु आहे. त्यासाठी महावितरणकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. सोबतच शेतकरी बांधवांनीही अधिकृतपणे वीज पुरवठा घ्यावा. कृषीपंपाला ॲटोस्विच न वापरता कॅपॅसिटरचा प्राधान्याने वापर करावा. असे आवाहन जळगांव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी केले आहे. बऱ्याच ठिकाणी कृषीपंपांना ॲटोस्विच लावल्याचे निदर्शनास आलेले आहे. ॲटोस्विचमुळे विद्युत पुरवठा सुर झाल्यानंतर एकाच वेळी परिसरातील सर्वच्या सर्व विद्युत मोटारी सुरु होतात. परिणामी एकाचवेळी अचानकपणे त्याचा भार सर्व मोटारींसह रोहित्रावर येतो आणि ते नादुरुस्त होतात. त्यामुळे सुरळीत विद्युत पुरवठ्यासाठी ॲटोस्विचचा वापर टाळणे आवश्यक आहे. शिवाय,…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी जिल्हा महिला व बाल विकास विभाग, यूनिसेफ, एस.बी.सी.-३ यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्ह्यात बालविवाह निर्मूलन कार्यक्रम मागील दोन वर्षापासुन राबविले जात आहे. याचाच एक भाग म्हणून बालविवाह निर्मूलन चॅम्पियन्स यांचे एकदिवशीय प्रशिक्षण छत्रपती शाहू महाराज सभागृह जिल्हा परिषद जळगाव येथे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ.वनिता सोनगत यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आले. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण ५ नुसार जळगाव जिल्ह्यात २८% बालविवाह होतात. तर महाराष्ट्राच्या तुलनेत जळगाव जिल्हा अकराव्या क्रमांकावर आहे. शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, आय. सी. डी. एस., पंचायत विभाग, जिल्हा महिला व बाल विकास विभाग या सर्व…
साईमत जळगाव प्रतिनिधी आज केमिकल शेती मुळे मानवाला विषाक्त भोजन खायला मिळत आहे. मोबाइला टॉवरमुळे शहरात पक्षी दिसेनासे झालेले आहे, पक्षांमध्ये सर्वात अधिक फटका बसला तो कावळ्यांना, म्हणून आज कावळे दिसेनासे झालेले आहे, त्यामुळे पितृ पक्षात कावळ्याला भोजन दिल्याशिवाय लोकांना भोजन ग्रहण करावे लागत असल्याचे प्रतिपादन कृषी विभागाच्या आत्माचे रिटायर्ड डेप्युटी डायरेक्टर अनिल भोकरे यांनी केले. केसीई सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट मध्ये डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट विभागातील – ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजीत “कृषी पर्यावरण आणि शासन धोरण” या विषयावरील सेमिनार प्रसंगी ते बोलत होते. या सेमिनार मध्ये अनिल भोकरे यांनी पर्यावरणातील बदलामुळे शेतीवर, मानवावर आणि प्राण्यांवर होणारे भयानक…
साईमत जळगाव प्रतिनिधी प्रत्येक क्षेत्रात वाढत असलेली स्पर्धा, वाढता दबाव, कुटुंबात परस्पर संवादाचा असलेला अभाव, व्यायामाकडे असलेले दुर्लक्ष आणि फास्ट फुडच्या आहारी जाण्याची वाढती संख्या यामुळे तरूण पिढीचे मानसिक आरोग्य ढासळत असून यातून बाहेर पडण्यासाठी स्वत: मधील क्ष्मता ओळखा, इतरांसोबत स्वत:ची तुलाना करू नका. आणि कोणत्याही दबावाखाली काम करू नका. असे प्रतिपादन कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास अकादमी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात युवा मानसरंग क्लबची स्थापना करण्यात आली असून या क्लबच्या कक्षाचे उद्घाटन करतांना प्रा. माहेश्वरी बोलत होते. परिवर्तन संस्था, सातारा यांच्या सहकार्याने हा कक्ष कार्यान्वित झाला. या…
साईमत जळगाव प्रतिनिधी कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्राच्या मागणीसाठी गेल्या २६ दिवसांपासून उपोषणाला बसलेले जगन्नाथ बावीस्कर आणि त्यांच्या सहकार्यांच्या आंदोलनाची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत सांगता झाली. पालकमंत्र्यांच्या हस्ते श्री.बावीस्कर यांना उसाचा रस पाजत उपोषण सोडविण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयास समोर सुरू असलेल्या उपोषणाच्या सांगते वेळी आमदार चंद्रकांत पाटील, आमदार रमेश पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तसेच मोठ्या संख्येने कोळी समाज बांधव उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, कोळी समाजाच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दोन बैठका आयोजित करण्यात आल्या. कोळी समाजाच्या जातीच्या तसेच इतर विविध प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली. अधिसंख्यपदांचा सर्वात मोठा विषय मुख्यमंत्र्यांनी सोडविला आहे.…
साईमत जळगाव प्रतिनिधी आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान जळगाव तर्फे रंगभूमी दिनाचे औचित्य साधून प्रेत यात्रा घेऊन जाणाऱ्या शव वाहिनीचे लोकार्पण जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने, माजी महापौर सिमाताई भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. या यावेळी भालेराव प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद भालेराव व सर्व कार्यकर्ते यांनी प्रमुख पाहुणे सतीश मदाने यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांचा व माजी महापौर सीमाताई भोळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास यशवंते यांनी व आभार प्रदर्शन प्रबुद्ध भालेराव यांनी केले. यावेळी अरुण सोनवणे, प्रवीण सपकाळे, दीपक जोशी, माजी नगरसेवक राजेंद्र मराठे, माजी नगरसेवक अमोल सांगोरे, हेमंत चंदनकर, विलास मते, विठ्ठल भालेराव, भाऊराव सुरळकर, कुलदीप…
साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील एकलव्य क्रीडा संकुल मैदानावर सुरू असलेल्या अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनास पहिल्या तीनच दिवसात हजारो शेतकर्यांनी भेटी दिल्या. यात प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यासह धुळे, छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा, अकोला, बर्हाणपूर आदी जिल्ह्यातून शेतकरी आले होते. दरम्यान, प्रदर्शनाचा आज समारोप होणार असल्याने शेतकर्यांनी या आधुनिक तंत्रज्ञानाने उपयुक्त ठरणार्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अॅग्रोवर्ल्डच्या कृषी प्रदर्शनात प्रक्रीया उद्योगासाठी मिनी दाल मिल, फवारणीसाठीचे ड्रोन, मजूर समस्येला पर्यायी इलेक्ट्रिक बुल, मिल्कींग मशीन, प्राण्यांपासून पिकांचे सरंक्षण करणारे झटका मशीन यासांरखे वैशिष्ठ्यपूर्ण व अत्याधुनिक कृषी उपकरणांचे स्टॉल उपलब्ध आहेत. शेतकर्यांनी नेहमी आशावादी राहीले पाहीजे. जगात सर्व मिळू शकते, परंतु आशा कुठेच मिळत…
साईमत जळगाव प्रतिनिधी येथील भारत विकास परिषदेच्या देशासाठी बलिदान दिलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांसमवेत दिवाळी या उपक्रमामुळे सैनिकांच्या कुटुंबियांसोबतच मान्यवर देखील भारावून गेले. मायादेवी नगरातील रोटरी भवनात आयोजित कार्यक्रमास तहसीलदार विजय बनसोडे, माजी महापौर सीमा भोळे, माजी नौसेना अधिकारी हरीश यादव, रा.स्व.संघाचे महानगर संघचालक उज्वल चौधरी, क्षेत्रीय सचिव तुषार तोतला, अध्यक्ष महेश जडिये, सचिव उमेश पाटील यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी छाया वारुड, मीराबाई मनोरे, रत्नाबाई धनगर, ज्योती पाटील, प्रतिभा माळी, छायाबाई सोनवणे, सुरेखा देशमुख, रमेश पवार, भावना पाटील, सुनंदा पाटील, कविता जाधव या शहीद सैनिकांच्या कुटुंबियांचा श्रीफळ, साडी, दिवाळी फराळ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात सैनिकांच्या वीर माता व…
साईमत जळगाव प्रतिनिधी विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मध्ये दिनांक ४ नोव्हेंबर रोजी सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धा तीन फेरीत घेण्यात आली होती. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत ४७० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी अंतिम फेरीसाठी २४ विद्यार्थ्यांचे राणी लक्ष्मीबाई , तिलक,आझाद, नेताजी असे चार गट करण्यात आले.या गटांसाठी भाषा, साहित्य सामाजिक शास्रे, सामान्य विज्ञान, क्रीडा, चालू घडामोडी यांवर प्रश्न विचारण्यात आले होते. सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक राणी लक्ष्मीबाई आणि द्वितीय क्रमांक तिलक आणि तृतीय क्रमांक नेताजी या गटांनी मिळवला आणि त्यांना प्रमाणपत्र व पुरस्कार देण्यात आला.स्पर्धेसाठी ,डॉ. निलश्री सहजे यांनी परिक्षण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन…
साईमत जळगाव प्रतिनिधी मराठी नाटकाची परंपरा व वारसा जपण्यासाठी दरवर्षी दि. ५ नोव्हेंबरला मराठी रंगभूमी दिन साजरा केला जातो. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखा व बालरंगभूमी परिषद जळगाव यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शहरातील रंगकर्मींनी बालगंधर्व खुले नाट्यगृहात एकत्रित होत श्री नटराज व रंगभूमी पूजन करत जागतिक मराठी रंगभूमी दिवस साजरा केला. रंगभूमीसाठी कार्यरत असणाऱ्या प्रत्येकासाठी जागतिक रंगभूमी दिन महत्त्वाचा आहे. मराठी रंगभूमीला जवळ जवळ १७० हुनही जास्त वर्षांची परंपरा आहे. १८४३ मध्ये सांगली येथे मराठी रंगभूमीचा पाया रचला गेला. चिंतामणराव पटवर्धन यांच्या आश्रयात विष्णुदास भावे यांनी ०५ नोव्हेंबर १८४३ साली “सीता स्वयंवर” या नाटकाचा प्रयोग केला…