साईमत जळगाव प्रतिनिधी
विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मध्ये दिनांक ४ नोव्हेंबर रोजी सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
स्पर्धा तीन फेरीत घेण्यात आली होती. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत ४७० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी अंतिम फेरीसाठी २४ विद्यार्थ्यांचे राणी लक्ष्मीबाई , तिलक,आझाद, नेताजी असे चार गट करण्यात आले.या गटांसाठी भाषा, साहित्य सामाजिक शास्रे, सामान्य विज्ञान, क्रीडा, चालू घडामोडी यांवर प्रश्न विचारण्यात आले होते.
सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक राणी लक्ष्मीबाई आणि द्वितीय क्रमांक तिलक आणि तृतीय क्रमांक नेताजी या गटांनी मिळवला आणि त्यांना प्रमाणपत्र व पुरस्कार देण्यात आला.स्पर्धेसाठी ,डॉ. निलश्री सहजे यांनी परिक्षण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खुशी वाणी या विद्यार्थिनीने केले. पाहुण्यांचा परिचय चित्रा पाटील यांनी केला. आभार राजवीर बडगुजर या विद्यार्थ्याने व्यक्त केला.
कार्यक्रम प्रमुख अनिल कोथडकर व दिपाली सहजे या होत्या.स्पर्धेसाठी शाळेचे प्राचार्य प्रविण सोनावणे, शाळेचे प्रशासकीय अधिकारी मिलिंद पुराणिक, आणि समन्वयिका स्वाती अहिरराव यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.