के.सी.ई शिक्षणशास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय खेळाडूचा सत्कार

0
1

साईमत जळगाव प्रतिनिधी

केसीई सोसायटी संचालित शिक्षणशास्त्र आणि शारिरीक शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील बीपीएड प्रथम वर्षाचा खेळाडू निलेश दिलीप माळी याने दिनांक २५ ते २७ ऑक्टोंबर दरम्यान गोवा येथे पार पडलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या रग्बी संघात सक्रिय सहभाग नोंदविला. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष रब्बी संघास रजत पदक प्राप्त झाले. संघातील प्रत्येक खेळाडूस महाराष्ट्र शासनाकडून रुपये पाच लाख एवढी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

या यशाबद्दल शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. केतन चौधरी विभागप्रमुख प्रा.डॉ. निलेश जोशी, प्रा. डॉ. शैलेजा भंगाळे, प्रा. प्रवीण कोल्हे, प्रा. पंकज पाटील, प्रा.आकाश बिवाल, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याच्या या यशाबद्दल त्याचे आई-वडील आणि मित्रपरिवार त्यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here