साईमत लाईव्ह
पिंपळगाव कमानी ता जामनेर : वार्ताहर
हरित क्रांतीचे प्रणेते तसेच भूमिहीनांना सुमारे एक लाख एकर जमीन मिळवून देणारे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ पदावर असलेले मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची जयंती अत्यंत उत्साहात नगरपालिका चौक जामनेर येथे साजरी करण्यात आली. यावेळी राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील व आध्यात्मिक क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तिमत्व हे उपस्थित होते. यावेळी विचार मांडताना सर्वांनी वसंतरावजी नाईक साहेब यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा जेणेकरून समाजाची व राज्याची तसेच पर्यायाने देशाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जामनेर तालुका सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, नगरसेवक गटनेते प्रशांत भोंडे, महेंद्र बाविस्कर, अतिश झाल्टे, जिल्हा परिषद सदस्य विलास बापू पाटील, दीपक तायडे, राष्ट्रवादी ओबीसी सेल तालुका अध्यक्ष राजेश नाईक,भाजपा ज्येष्ठ नेते रमेश नाईक श्री.रामकिशन नाईक, भारतीय जनता युवा मोर्चा तालुका अध्यक्ष निलेश चव्हाण,राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, दीपक पवार , बाळू तवर,दिनेश तवर, पवन राठोड,तलाठी राठोड आप्पा, ईश्वर चव्हाण, भरत राठोड हे उपस्थित होते.