पॅन कार्ड आणि आधार कार्ड सध्या किती महत्वाचे आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे. जास्तीत जास्त ऑनलाइन कामांसाठी याचा वापर केला जात आहे. बँक किंवा नवीन डॉक्यूमेंट बनवण्यासाठी याचा वापर केला जात आहे. पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. (Linking PAN Card With Aadhaar) यासाठी ३० जून डेडलाइन ठरवली गेली होती. आता ही डेडलाइन संपली आहे.
आता जर तुम्हाला पॅन कार्ड सोबत आधारला लिंक करायचे असेल तर डबल दंड भरावा लागू शकतो. सुरुवातीला यूआईडीएआय (UIDAI) ने पॅन कार्डला आधार कार्ड (Aadhar Card) शी लिंक करण्यासाठी ३१ मार्च ही तारीख ठरवली होती. नंतर ५०० रुपये दंड सोबत ३० जून २०२२ पर्यंत वाढवली होती. परंतु, आता ५०० रुपयाच्या लेट फीस सोबत पॅन आधारला लिंक करण्याची अखेरची तारीख सुद्धा संपली आहे. त्यामुळे आता आजपासून दुप्पट म्हणजेच १ हजार रुपये दंड भरावा लागू शकतो. १ जुलै पासून १ हजार रुपये लेट फी भरल्यास पॅन कार्ड-आधार कार्ड लिंक करता येवू शकते.
How To Link PAN With Aadhaar?
आयकर विभागाची वेबसाइट https://www.incometax.gov.in/iec/portal वर जा.
यानंतर लिंक आधारचा ऑप्शन निवडा.
जर तुम्हाला पॅन कार्ड लिंक दिसत असेल तर तुमचे पॅन आणि आधार कार्ड लिंक आहे. या ठिकाणी तुम्हाला लिंक करावे लागेल. https://www.incometaxindiaefiling.gov.in/home च्या वेबसाइटवर जा. लिंक आधारचा ऑप्शन निवडा. यानंतर आधार डिटेल्सची माहिती भरा. यानंतर ओटीपी ऑप्शनला सिलेक्ट करा. यानंतर रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल. त्याला एन्टर करा. लेट फी भरल्यानंतर तुमचे पॅन आणि आधार कार्ड लिंक होईल.
पॅन कार्ड – आधार कार्ड करण्यासाठी पेनल्टी भरण्याची प्रक्रिया
https://onlineservices.tin.egov-nsdl.com/etaxnew/tdsnontds.jsp वर जा.
या ठिकाणी लिंक रिक्वेस्ट मध्ये चलान नंबर आयटीएनएस २८० वर क्लिक करा.
यानंतर टॅक्स अॅप्लिकेबलचा ऑप्शन निवडा.
दुप्पट दंडाची फी भरा. यासाठी पेनल्टी पेमेंट ऑप्शनची निवड करा.
यासाठी नेट बँकिंग प्रक्रिया किंवा कार्ड मोडद्वारे पेमेंट करा.
पॅन नंबर आणि असेसमेंट इयर टाका.
कॅप्चा कोड भरा.
सबमिट ऑप्शनवर क्लिक करताच पॅन आणि आधार कार्ड लिंक होईल.