साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी :
शिवसेना (Shivsena) प्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा धक्का देत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत काल रात्री मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाले.
हा शपथविधी सोहळा आटोपल्यानंतर सागर बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट झाल्याची माहिती समोर येत आहे. या भेटीबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. मात्र, आज सकाळी ही माहिती समोर आली आहे.
माहितीनुसार, मुंडे हे गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास देवेंद्र फडणीवस यांच्या सागर बंगल्यावर गेले होते. याठिकाणी फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्यात साधारण अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र या दोन्ही नेत्यांच्या भेटीचे कारण अद्यापही समोर आलेलं नाही. रंतु, सध्याची अस्थिर राजकीय परिस्थिती पाहता धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुले राजकीय वर्तुळात उलट -सुलट चर्चा रंगल्या आहेत. धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या गटातील मानले जातात. २०१९ मध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनावर पहाटे शपथ घेत सरकार स्थापनेचा दावा केला होता. त्यामुळे आतादेखील काही नवीन गणित जुळत आहे का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आतापर्यंत कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, त्यांच्या जवळचे असलेले धनंजय मुंडे आता फडणवीसांना भेटल्याने येत्या काळात नव्या राजकीय घडामोडी पाहायला मिळणार का, हे पहावे लागेल.