Author: Saimat

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्रामध्ये सत्ताबदल होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. अगोदर शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने समन्स पाठविल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांना (Sharad Pawar)आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. मला इन्कम टॅक्सचे प्रेमपत्र आलेय. २००४, २००९, २०१४ आणि २०२० मध्ये लढविलेल्या लोकसभा-राज्यसभा निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रांवरून मला नोटीस पाठविण्यात आली आहे, असे शरद पवार म्हणाले. तर महाराष्ट्र सरकारमध्ये बदल झाल्यानंतर लगेचच आयकर विभाग शरद पवार यांना नोटीस देतो. हा पूर्ण योगायोग आहे की आणखी काही? असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश भरत तपासे यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला.

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 जुलै, 2022 रोजी आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड करण्यात येणार आहे. अध्यक्षपदासाठी अर्ज सादर करण्याची मुदत शनिवार, दिनांक 2 जुलै रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत आहे. तर, विधानसभा अध्यक्षपदाची निवड रविवार, दिनांक 3 जुलै रोजी सभागृहात होईल. विधानसभेच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी या विशेष अधिवेशनास उपस्थित राहावे, असे आवाहन विधानमंडळ सचिवालयाने केले आहे.

Read More

औरंगाबाद :वृत्तसंस्था शिवसेनेचे माजी आमदार किशनचंद तनवाणी आता बंडखोरीच्या उंबरठ्यावर असल्याची माहिती समोर येत आहे. औरंगाबादमध्ये त्यांच्या समर्थकांनी ‘साहेब आता निर्णय घ्या’ असे पोस्टर लावले आहे. त्यामुळे तनवाणी देखील जिल्ह्यातील इतर पाच आमदारांसारखे मुख्यमंत्री शिंदे गटात सामील होणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. किशनचंद तनवाणी यांनी शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. ते शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गुलमंडी येथून नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर शिवसेनेचे महापौर, आमदार अशी त्यांची वाटचाल राहिली. मात्र २०१४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान ते शिवसेनेतून बाहेर पडत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती.मात्र अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेचे जिल्हाअध्यक्ष अंबादास दानवे यांच्या प्रयत्नानंतर ते पुन्हा स्वगृही शिवसेनेत आले.…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी जळगाव जिल्हा परिषद नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिली आहे. ज्याच्या हाती ससा तो पाळधी . अशी एकंदरीत परिस्थिती जी.प त पाहावयास मिळत आहे. प्रशासक नेमणुक झाल्या पासून जी.प सदस्य उपाध्यक्ष व अध्यक्ष ह्यांचा वावर जी.प त नसल्याने अधिकाऱ्यांना मन मर्जी कारभारासाठी फावले असल्याचे आज अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ह्यांच्या दालनात कामे वाटपाट डावलल्याचे सांगत सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनि एल्गार पुकारला मुले प्रत्यय आला . दरम्यान बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री धिवरे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मोहन ह्यांनी मात्र गुड गुडीत उत्तर दिल्याने बेरोजगार अभियंते ह्यांचा मोर्चा तब्बल चार तास जी.प च्या आवारात घोषणाबाजीने सुरु राहिला. एकंदरीत…

Read More

मुंबई : शिंदे मुख्यमंत्री झाले, म्हणून त्यांचे अभिंनदन. मात्र, ते शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत. आमचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री जाहीर करतात, अशी टीका सावंत यांनी केली. शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला. त्यानंतर ठाकरे सरकार कोसळले. या संपूर्ण घडामोडी मागे भाजपचा हात असल्याचा आरोप सावंत यांनी केला.शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री घोषित केले . त्यानंतर राजकीय वर्तुळात उलट -सुलट चर्चा सुरु झाल्या. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले. यावर भारतीय जनता पक्षाची ही खेळी आहे.…

Read More

साईमत लाईव्ह यावल : तालुका प्रतिनिधी   भारतीय स्टेट बँक,आयडीबीआय बँक,पोस्टऑफिस इत्यादी सह इतर काही बँकांमध्ये बँकिंग वेळेत नेटवर्क अभावी किंवा ऑनलाईन सेवेत वरिष्ठ स्तरावरून अनेक वेळा व्यत्यय,अडचणी येत असल्याने बँकेच्या किंवा पोस्टाच्या खातेदारांना पैसे काढणे आणि भरणे या प्रक्रियेत मोठे अडथळे येत आहेत त्यामुळे बँक आणि पोस्ट खातेदारांमध्ये मोठा संताप व्यक्त करण्यात येतो. आज सकाळी तालुक्यातील साकळी गावात आयडीबीआय बँक शाखेत ऑनलाइन सेवेत काही तरी व्यत्यय आल्यामुळे बँक खातेदारांना पैसे काढणे आणि पैसे भरणा करणे साठी बँकेच्या बाहेर ताटकळत उभे राहावे लागले यामुळे साकळी गावात बँक ग्राहकांमध्ये मोठी तीव्र नाराज आहे आणि संताप व्यक्त करण्यात येत आहे.याचप्रमाणे यावल शहरात स्टेट…

Read More

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यात सरकार स्थापन केले. उद्धव ठाकरे यांनी आम्ही लढून शिवसेना पुन्हा उभी करु, असा निर्धार व्यक्त केला असला तरी प्रत्यक्षात हे त्यांच्यासाठी मोठी कसोटीच ठरणार आहे. आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर आता शिवसेनेला आपली ताकद वाढवण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार आहे. ही निवडणूक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेला नवसंजीवनी देईल किंवा या निवडणुकीत पराभव झाल्यास उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाची वाटचाल ऱ्हासाच्या दिशेने सुरु होईल, असे मत राजकीय स्तरावर व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना ताकदीने मैदानात उतरावे लागणार आहे. महानगर पालिकेच्या निवडणुका सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात होऊ शकतात. त्यामुळे या निवडणूक…

Read More

यावल : तालुका प्रतिनिधी  संपूर्ण नाशिक विभागातील जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणच्या कार्यालयातील अनेक जिल्हास्तरीय तालुकास्तरीय प्रमुख अधिकारी, कर्मचारी आपल्या मुख्यालयाच्या ठिकाणी रहात नसून अनेक अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी नाममात्र निवासस्थाने घर भाड्याने घेतले असले तरी प्रत्यक्ष राहण्याचे ठिकाण त्यांचे लांब अंतरावर दुसऱ्या ठिकाणी आहे म्हणजे मुख्यालया ठिकाणी न राहता शासनाकडून दरमहा घरभाडे भत्ते हडप केले जात आहे काहीनीं तर घरभाडे करार/दाखले बोगस बनावट दस्तऐवज दाखल केलेले आहेत.तरी विविध खात्याचे विभागीय आयुक्त आणि आदिवासी विभागाचे अपर आयुक्त,संबंधित जिल्हाधिकारी यांनी चौकशी समित्या नेमून मुख्यालयी राहत नसलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी संपूर्ण नाशिक विभागातून होत आहे. नाशिक विभागात प्रत्येक जिल्ह्यात एकात्मिक आदिवासी विकास…

Read More

जळगाव : प्रतिनिधी महानगरपालिका हद्दीतील पिंप्राळा शिवारातील  सावखेडा रोड जवळील सोनी नगरात अनेकांनी 9 मीटरच्या रस्त्यावर अनधिकृत सिमेंटचे ओटे बांधण्यात आली होती. याबाबत परिसरातील महिला उपमहापौर कुलभूषण पाटील यांची भेट घेऊन आपबीती सांगितले असता  उपमहापौर पाटील यांनी तात्काळ  दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करताच त्वरित दि.30 रोजी गुरुवारी सकाळी 10 वाजता जेसिबीच्या साहाय्याने काढण्यात आले. सविस्तर वृत्त असे की, सोनी नगरात अनेकांनी 9 मीटरच्या रस्त्यावर अनधिकृत सिमेंटचे ओटे बांधण्यात आले होते त्यामुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ असल्याने वाहन चालकांना वाहन चलवितांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. तसेच येण्या-जाण्यासाठी पण जागा शिल्लक नसल्याने अनेकांना याचा त्रास होत होता.त्यामुळे  याबाबत परिसरातील महिलांनी…

Read More

मेष राशी: लोकांच्या चांगल्या कामाचा दुसर्या लोकांवर प्रभाव पडेल. तुम्ही तुमच्या नियमित कामाच्या व्यतिरिक्त काही करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला यश मिळेल. व्यावसायिकांसाठी दिवस निराशाजनक असू शकतो. नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस सुखकर राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. आज तुम्हाला कार्यक्षेत्रात स्वतःहून लाभ मिळेल. आज ९५% नशिबाची साथ आहे. पांढर्‍या वस्तू दान करा. ​वृषभ राशी: लोकांच्या कौटुंबिक जीवनात अस्थिरता येऊ शकते. तुमचे तुमच्या पालकांशी वैचारिक मतभेद असू शकतात. प्रेमसंबंधांसाठी काळ शुभ आहे. पगारदार लोक त्यांच्या वरिष्ठांना कठोर परिश्रमाने संतुष्ट करू शकतात. नोकरी असो किंवा व्यवसाय, आज तुम्हाला चांगले यश मिळेल. कौटुंबिक सुख चांगले राहील. आज ७२% नशिबाची साथ आहे. शिवलिंगावर दूध…

Read More