Author: Saimat
साईमत लाईव्ह मुंबई : प्रतिनिधी विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपनंतर आता महाविकास आघाडीनेही आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपला अर्ज दाखल केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळल्यानंतर होत असलेल्या या निवडणुकीत दोन्ही बाजूच्या उमेदवारांची नावे घोषित झाल्याने चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील नाराज आमदारांना सोबत घेत पक्षनेतृत्वाविरोधात बंडाचा झेंडा फडकावला आणि भाजपच्या मदतीने थेट मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शिंदे यांच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांना आपलं मुख्यमंत्रिपद गमवावं लागलं. पक्षातील नेत्यानेच घात केल्याने उद्धव ठाकरे दुखावले गेले असून त्यांनी या बंडखोर गटाला धक्का देण्यासाठी तयारी…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : राज्यात राजकीय घडामोडीनंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी ठाकरे सरकारला(Thackeray Govt) धक्का देत भाजपसोबत युती करत सरकार स्थापन केले. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Shinde)यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करून त्यांच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे. इतकेच नाही तर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेची(Shivsena) आघाडीवरही शिंदे यांनी टीका केली. गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राचा विकास अपवित्र आघाडीमुळे (महा विकास आघाडी) रखडला होता. यामुळे एकनाथ शिंदे या मराठमोळ्या माणसाने त्यांच्या विचारसणीच्या दृष्टीकोनातून योग्य निर्णय घेतला.मला खात्री आहे की ‘फडणवीस-शिंदे जोडी’ महाराष्ट्रात पुन्हा विकास घडवून आणतील, असे विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. ज्योतिरादित्य शिंदे यांनी मध्य प्रदेशात काँग्रेस…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने शिवसेनेसोबत बंडखोरी करून भाजपासोबत (BJP)सरकार स्थापन केलं. शिवसेनेच्या इतिहासातील आतापर्यंतचे हे सर्वात मोठं बंड बोलले जात आहे. शिंदे गटात शिवसेनेचे तब्बल ३७ आमदार सहभागी आहेत. यातच आता शिवसेनेच्या १९ खासदारांपैकी १२ खासदार देखील वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना खासदारांच्या एका गटाने काल पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेऊन त्यांच्यासमोर आपल्या भावना व्यक्त केल्या आणि एकनाथ शिंदे यांच्याशी जुळवून घेण्याची विनंती केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाजपच्या एका केंद्रीय नेत्याने केलेल्या दाव्यानुसार शिवसेनेतील आमदारांनी केलेल्या बंडाप्रमाणे खासदारही तीच भूमिका घेऊ शकतात. शिवसेनेच्या १९…
साईमत लाईव्ह मुक्ताईनगर : प्रतिनिधी महाराष्ट्रात गोर गरीब ,शोषित,पिडित,वंचित निराधार, दिव्यांग, विधवा या समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी घरकुलच्या पात्र लाभार्थ्यांना वाढत्या महागाईच्या अनुषंगाने तीन लाख रुपये अनुदान मिळावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ विवेक सोनवणे यांनि निवेदनाद्वारे केलि आहे. शासनाने पिएम आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना यशवंतराव चव्हाण आवास योजना या विविध योजनांच्या माध्यमातून घरकुल धारकांसाठी मागील काही वर्षांपासून रु. १३६००० /- इतका निधी दिला जात आहे परंतु आज रोजीचा महागाईचा उडालेला भडका बघता शासनाकडून मिळणार्या या घरकुलच्या रकमेत सदर लाभार्थ्यांचा घराचा वटा बांधणेही मुश्कील झालेले आहे तर संपूर्ण घर कस बांधायचे असा प्रश्न स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष…
साईमत लाईव्ह मुंबई : प्रतिनिधी ठाकरे सरकाराच्या विरोधात बंडखोरी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या गोटातील अनेक आमदार फोडत भाजपसोबत युती करत नवीन सरकार स्थापन केले. मात्र शिंदे यांना शिवसेनेविरोधातील बंडखोरी भोवली असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. शिंदे यांची शिवसेना नेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे शिंदेंवर कारवाईसंदर्भातील पत्रकात म्हणाले की, तुम्ही पक्षविरोधी कारवाया करत आहात आणि स्वेच्छेने शिवसेनेचे सदस्यत्वही सोडले आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून माझ्याकडे असलेल्या अधिकारांचा वापर करून मी तुम्हाला पक्ष संघटनेतील ‘शिवसेना नेते’पदावरून दूर करत आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदेविरोधात तोफ डागली. दरम्यान दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी…
साईमत लाईव्ह पाचोरा : प्रतिनिधी नुकतेच दिनांक २९ जून रोजी एकलव्य संघटना शाखा उद्घाटन सोहळा पाचोरा तालुक्यातील बिल्दी, सजगांव, नाईक नगर, कुऱ्हाड कुंभारखांड, कासमपूरा लोहारा ह्या गावामध्ये आज एकलव्य संघटना संस्थापक अध्यक्ष तथा प्रदेशाध्यक्ष पवनराजे सोनवणे व प्रदेश कार्याध्यक्ष सुधाकरराव वाघ यांच्या प्रमुख उपस्थिती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. तसेच उपस्थित मान्यवरांनी समाज बांधवांना विविध विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाला जळगांव लोकसभा जिल्हाध्यक्ष संजय सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष रविंद सोनवणे, रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष निवृत्ती पवार, जिल्हा कार्याध्यक्ष पिंटू गायकवाड, उपजिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, जिल्हा संघटक पिंटू सोनवणे रावेर लोकसभा जिल्हा युवा कार्याध्यक्ष समाधान जाधव तालुकाध्यक्ष गणेश वाघ युवा तालुकाध्यक्ष गणेश नाईक तालुका उपाध्यक्षा…
साईमत लाईव्ह पिंपळगाव कमानी ता जामनेर : वार्ताहर हरित क्रांतीचे प्रणेते तसेच भूमिहीनांना सुमारे एक लाख एकर जमीन मिळवून देणारे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ पदावर असलेले मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची जयंती अत्यंत उत्साहात नगरपालिका चौक जामनेर येथे साजरी करण्यात आली. यावेळी राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील व आध्यात्मिक क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तिमत्व हे उपस्थित होते. यावेळी विचार मांडताना सर्वांनी वसंतरावजी नाईक साहेब यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा जेणेकरून समाजाची व राज्याची तसेच पर्यायाने देशाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जामनेर तालुका सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, नगरसेवक गटनेते प्रशांत भोंडे, महेंद्र बाविस्कर, अतिश झाल्टे,…
साईमत लाईव्ह यावल : सुरेश पाटील पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी काल दि.30 रोजी यावल पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारला शासकीय कामकाज करताना ते कोणत्याही बाबतीत बेशिस्तपणा खपवून घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यावल शहरात मेन रोडवर आणि यावल भुसावल रोडवर टी पॉइंट पासून फैजपुर रोड आणि चोपडा रोडवर,बुरुज चौकापासून तहसील कार्यालय तसेच सातोद कडे जाणाऱ्या रस्त्यावर,बोरावल गेट परिसरात,सुदर्शन चित्रमंदिर भागात बेशिस्त प्रवासी व दुचाकी चार चाकी वाहनांच्या पार्किंगमुळे विरुद्ध दिशेने सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनधारकांमुळे, वाहतुकीमुळे तसेच भर रस्त्यावर आणि रस्त्याच्या आजूबाजूला झालेल्या अतिक्रमणामुळे यावलकरांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे बऱ्याच वेळेला किरकोळ भांडण तंटे होत असतात एखाद्या वेळेस कायदा व…