शिंदे-फडणवीस जोडी राज्यात विकास घडवणार

0
3

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी :

राज्यात राजकीय घडामोडीनंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी ठाकरे सरकारला(Thackeray Govt) धक्का देत भाजपसोबत युती करत सरकार स्थापन केले. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Shinde)यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करून त्यांच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे. इतकेच नाही तर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेची(Shivsena) आघाडीवरही शिंदे यांनी टीका केली.

गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राचा विकास अपवित्र आघाडीमुळे (महा विकास आघाडी) रखडला होता. यामुळे एकनाथ शिंदे या मराठमोळ्या माणसाने त्यांच्या विचारसणीच्या दृष्टीकोनातून योग्य निर्णय घेतला.मला खात्री आहे की ‘फडणवीस-शिंदे जोडी’ महाराष्ट्रात पुन्हा विकास घडवून आणतील, असे विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी मध्य प्रदेशात काँग्रेस सरकार पाडून भाजपला सरकार स्थापन केले होते. ते स्वत: राज्य मंत्रिमंडळाचा भाग बनले नसले तरी त्यांना केंद्रात केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री पद सांभाळण्यासाठी देण्यात आले.

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे मध्य प्रदेशातील राजकीय घडामोडींची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. . एकनाथ शिंदेंप्रमाणेच ज्योतिरादित्य शिंदेंनीही आपल्या पक्षाविरोधात बंडखोरी केली होती. मार्च २०२० मध्ये त्यांनी काँग्रेसविरोधात बंड पुकारले होते. काँग्रेस सरकार पाडल्यानंतर दीड वर्षांनी त्यांना केंद्र सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या 11 समर्थकांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता शिंदे यांचे 9 समर्थक मंत्रीमंडळात उरले आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थकांना कॉर्पोरेशन बोर्डात राजकीय नियुक्त्याही देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here