साईमत लाईव्ह
मुक्ताईनगर : प्रतिनिधी
महाराष्ट्रात गोर गरीब ,शोषित,पिडित,वंचित निराधार, दिव्यांग, विधवा या समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी घरकुलच्या पात्र लाभार्थ्यांना वाढत्या महागाईच्या अनुषंगाने तीन लाख रुपये अनुदान मिळावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ विवेक सोनवणे यांनि निवेदनाद्वारे केलि आहे. शासनाने पिएम आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना यशवंतराव चव्हाण आवास योजना या विविध योजनांच्या माध्यमातून घरकुल धारकांसाठी मागील काही वर्षांपासून रु. १३६००० /- इतका निधी दिला जात आहे परंतु आज रोजीचा महागाईचा उडालेला भडका बघता शासनाकडून मिळणार्या या घरकुलच्या रकमेत सदर लाभार्थ्यांचा घराचा वटा बांधणेही मुश्कील झालेले आहे तर संपूर्ण घर कस बांधायचे असा प्रश्न स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ विवेक सोनवणे यांनी उपस्थित केला आहे आज रोजी सिमेंट ,वाळू, स्टील यांच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत याचा प्रत्येक नागरिकाला अनुभवाला येत आहे.
परंतु ज्या लाभार्थ्यांना आपण शासनाच्या निकषाप्रमाणे घरकुल मंजूर करतो त्यांची आर्थिक परिस्थिती बघता त्यांना आज रोजीच्या वाढलेल्या महागाईच्या अनुषंगाने घराचे स्वप्न पूर्ण करणे शक्यच नाहि तसेच जिल्ह्यात तापी पूर्णा गिरणा या नद्यांमध्ये भरपूर प्रमाणात वाळू साठा आहे त्या अनुषंगाने शासनाच्या माध्यमातून प्रत्येक घरकुल धारकांना मोफत वाळू पुरविण्यात यावी अशी मागणी डॉ. विवेक सोनवणे यांनी केली आहे. आधीच्या सरकारमध्ये वाढत्या महागाईचा अनुषंगाने राज्यात सुरू असलेल्या हजारो कोटींच्या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या आधारावर कित्येक पटीने रक्कम वाढून मिळालि आहे परंतु राज्यातील गोरगरीब दुर्लक्षित घरकुल धारकांना त्यांच्या निधीत वाढ मिळण्यासाठी या आधि कोणत्याही राजकीय पक्षाकडून आजतागायत आवाज उठवला गेला नाहि असा आरोप डॉ विवेक सोनवणे यांनी केला आहे असा आरोप डॉ विवेक सोनवणे यांनि निवेदनात केला आहे.
राज्यातील राजकीय उदासीनतेचा अनुभव नागरिकांना वारंवार याआधी अनुभवला आलेला आहे परंतु शिंदे सरकार हे जनतेचे मायबाप सरकार आहे व गोरगरीब जनतेच्या माफक अपेक्षा आपण पूर्ण करणार हा जनतेला विश्वास असल्याने राज्यातील गोरगरीब शोषित, पिडीत, वंचित, दुर्लक्षित घटकांसाठी स्वत चं उभं करून द्यायचा शासनाचा जो प्रामाणिक मानस आहे त्या अनुषंगाने आज रोजीच्या वाढत्या माहागाईच्या अनुषंगाने प्रत्येक घरकुल धारकांना मोफत वाळु व ३ लाख रुपये अनुदान मिळावे अशी मागणी निवेदनाद्वारे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ विवेक सोनवणे यांनी केलेली आहे