मुंबई : साईमत लाईव्ह प्रतिनिधी राज्यात शिंदे-फडणवीसचे सरकार ( Shinde-Fadnavis Govt) स्थापन झाले आहेत. या सरकारकडून सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतल्या जातील, असा विश्वास प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu)यांनी व्यक्त केला आहे. शिंदे गट(Shinde Govt) आणि भाजपचे सरकार सहा महिन्यातच कोसळणार असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar)यांनी केले. मात्र सरकार कोसळणार असे सांगणे हे विरोधकाचं कामच असतं. त्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला. तसेच शिंदे-फडणवीस यांची जोडी फेविकॉलपेक्षा मजबूत असल्याचेही ते म्हणाले. तसेच कडू यांनी मंत्रिपदाबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावर आपले मत व्यक्त केले. मंत्रीपदापेक्षा मतदार संघातील विकास…
Author: Saimat
नवी दिल्ली : देशभरातील, गावोगावच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी पतसंस्था म्हणजेच विकास सोसायट्या (पीएसीएस) आता अजूनच बळकट होणार आहेत. या विकास सोसायट्यांना लवकरच पेट्रोल-डिझेल विक्री, रेशन दुकानेही चालवण्यासह बँकिंग व्यवहार आणि इतरही अनेक कामे करण्यास परवानगी दिली जाणार आहे. अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील सहकार मंत्रालयाने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या ‘पीएसीएस मॉडेल उपविधी’ मसुद्यात हे नमूद करण्यात आले आहे. राज्य सरकारे आणि इतर भागधारकांकडून 19 जुलैपर्यंत त्यावर हरकती, सूचना मागवल्या आहेत. सध्या विकास सोसायट्या या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या नियंत्रणाखाली गावागावांमध्ये शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्याचे मुख्य काम करतात. पीक कर्जाबरोबरच खते, बियाणे, शेतीची अवजारे यासाठीही सोसायट्या कर्जपुरवठा करतात. त्यांना व्यावयाभिमुख करून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची…
साईमत लाईव्ह सोयगाव : तालुका प्रतिनिधी १५ जून ते ३० सप्टेंबर २०२२ दरम्यान वनमहोत्सवानिमित वन परिक्षेत्र सोयगांव प्रादेशिक अंतर्गत निंबायती ता.सोयगाव येथे सहाय्यक वनसंरक्षक सिल्लोड श्रीमती पी.पी.पवार मॅडम तसेच सोयगाव वनपरिक्षेत्र अधिकारी मिसाळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सोयगाव वनपरिक्षेत्र वनपाल गणेश सपकाळ, वनरक्षक एस.एस. हिरेकर, यांच्या उपस्थीतीत ग्रामपंचायत व मोतीमाता मंदिर परिसरात गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वनरक्षक एस.एस.हिरेकर यांनी उपस्थित ग्रामस्थांना प्रत्येकाने वृक्षारोपण करावे व वृक्षांचे प्रमाण वाढवावे असे आवाहन करीत उपस्थितांना वृक्षांचे संगोपन व वनाचे महत्व समजावून सांगितले यावेळी निंबायती सरपंच विशाल गिरी,उपसरपंच सलमान तडवी, पोलीस पाटील मूलचंद राठोड,भागचंद चव्हाण,नारायण राठोड,मा.सरपंच राजू पाटील,पुनमचंद चव्हाण, करण पवार,…
जळगाव : साईमत लाईव्ह तालुक्यातील नंदगाव येथील नागरिकांचे आरोग्य वाऱ्यावर सुटले असून गावातील गटारी ऐन पावसाळ्यात तुडुंब भरल्या आहेत.यामुळे गावात सर्वदूर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच गावातील पथदिवेही मागील अनेक महिन्यांपासून बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी गावातील आबालवृद्धांना रहदारीसाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे गावकरी त्रस्त झाले असतानाच ग्रामपंचायत मात्र सदरच्या तक्रारींकडे कानाडोळा करून कुठल्याही प्रकारची उपाययोजना करत नसल्यामुळे नागरिक हवालदील झाले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. अशातच नंदगावमधील निम्म्याहून अधिक गटारी या तुडुंब भरून या गटारींतील घाणपाणी गावातील रस्त्यांवरून वाहत आहेत. या दुर्गंधीमुळे गावातील आरोग्याचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. ऐन पावसाळ्यात या घाणपाणीमुळे गावात विविध प्रकारची रोगराई पसरण्याची शक्यता…
जळगाव : साईमत लाईव्ह गत आठवड्यात जिल्हा भर गाजा वाजा झालेल्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील मोठ्या घोटाळ्याची खरी सूत्रधार हे दुसरे तिसरे कोणी नसून वरिष्ठ अधिकारीच आपल्या कनिष्ठांना आदेशित करून अभय देतांना समोर आलेत. पी एम पाटील नामक जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात असलेले कर्मचाऱ्यांनी शासकीय कागदपत्रे खाजगी ठिकाणी नेवून आलेल्या शासकीय कामांची वाटप फक्त आणि फक्त आर्थिक धोरणावर करीत जवळपास प्रत्येक कामाचे १० टक्के इतपत रुपये घेऊन सरळ सरळ बाहेर कामे वाटप केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समोर जेव्हा सुशिक्षित बेरोजगारांनी ठिय्या आंदोलन केले तेव्हा नाममात्र काम देऊ चे आश्वासन देऊन त्या अधिकाऱ्यांनी वेळ मारून नेली. लेखी तक्रारींची दखल न घेत त्या…
यावल : साईमत लाईव्ह प्रतिनिधी बोदवड शहरात रासायनिक खतांचा अनियमित पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना त्रास होत आहे.यासाठी राष्ट्रवादी तर्फे तहसीलदार व कृषी अधीकाऱ्यांकडे रासायनिक खत उपलब्ध व्हावे यासाठी निवेदन देण्यात आले. निवेदनात बोदवड तालुक्यातील शेतकऱ्यांना रासायनिक खतांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असून तालुक्यात कोणत्याच प्रकारचे खते उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.बोदवड तालुक्यातील काणत्याही कृषि केंद्रावर खतं उपलब्ध नसल्याने शेतकरी अडचणीत सापडलेला अजून त्याची खतांअभावी धावपळ होत आहे. तरी आपणास विनंती करत आहे की,सदरील बाब लक्षात घेता आपण आपल्या स्तरावरून शासन दरबारी पाठपुरावा करून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या हितासाठी व शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी आपले स्तरावरून योग्य ते सहकार्य करून…
मुंबई : साईमत लाईव्ह प्रतिनिधी राज्यातील सत्तेतून मागील अडीच वर्षांपासून दूर असलेल्या भाजपने शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या मदतीने पुन्हा एकदा सत्तेत पुनरागमन केलं आहे. आता नवे सरकार स्थापन झाल्यानंतर खातेवाटपाकडे सर्वांचं लक्ष लागलेले आहे. शिंदे गट आणि भाजपमध्ये कुणाला मंत्रिपद मिळणार असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. अशातच आता भाजपमध्ये मोठे खांदेपालट केले जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचा मंत्रिमंडळात समावेश जवळपास निश्चित झाला आहे. त्यामुळे लवकरच नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बहुमत सिद्ध केल्यानंतर लवकरच खातेवाटप केले जाणार आहे. तर दुसरीकडे, नवे सरकार स्थापन झाल्यानंतर आता…
साईमत लाईव्ह जळगाव : प्रतिनिधी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेशी बंडखोरी करत पक्षाचे ४० आमदार गळाला लावले. तसेच भाजपसोबत येत सरकारही स्थापन केले. त्यामुळे शिवसेनेत (Shivsena)मोठी फूट पडली असून हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसाठी (Uddhav Thackeray)मोठा धक्का मनाला जातो. आता शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली. शिवसेनेचे 18 पैकी 12 खासदार, 20 माजी आमदार शिंदे गटात सामील होणार असल्याचा गौप्यस्फोट गुलाबराव पाटलांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. शिवसेनेत बंड केल्यानंतर अनेक आमदार आपल्या घरी काल पहिल्यांदा पोहोचले आहे. गुलाबराव पाटील जळगावात पोहोचल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी त्यांनी…
नवी दिल्ली : साईमत लाईव्ह महागाईची झळ सहन करणाऱ्या सर्वसामान्य जनतेला एक मोठा झटका बसला आहे. बुधवारी सकाळी ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडर (LPG Cylinder Hike)च्या किमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. नव्या दर वाढीनंतर राजधानी दिल्लीत १४.२ किलोचा सिलेंडर एक हजार ५३ रुपयांवर पोहोचला आहे. पाच किलोचा छोटा सिलेंडरच्या किमतीत १८ रुपयांनी वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती वाढवण्यात आल्या असल्या तरी व्यवसायिक कारणासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅसच्या किंमतीत ८.५० रुपयांनी घट करण्यात आली आहे. राजधानी नवी दिल्लीत १९ किलोचा गॅस सिलेंडर २ हजार १२.५०, मुंबईत २ हजार १३२, कोलकातामध्ये १ हजार ९७२.५० तर चेन्नईत २ हजार…