साईमत लाईव्ह जळगाव ः प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील तिघ्रे गावात गांजाची मोठी कारवाई झाल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळताच. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने याठिकाणी छापा टाकला असल्याची खात्रीलायक वृत्त समोर आले आहे. सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील तिघ्रे गावात गांजा येत असल्याची माहिती पोलिसांना गोपनीयतून मिळाली असता. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक किरणकुमार बकाले यांनी लागलीच पथकाला रवाना करून ते स्वतः याठिकाणी तत्काळ धाव घेत पुढील कार्यवाही करीत आहेत. तिघ्रे येथे पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाल्याने गावाला छावणीचे स्वरुप आले आहे. यावृत्त माहिती पडताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक…
Author: Saimat
साईमत लाईव्ह मुंबई : प्रतिनिधी शिवसेनेचे (Shivsena) नवे प्रतोद भरत गोगावले यांनी सोमवारी झालेल्या फ्लोअर टेस्टनंतर शिवसेनेच्या १४ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली आहे. मात्र शिंदे गटाने आदित्य ठाकरेंना या कारवाईतून वगळले आहे. आमचा व्हीप न पाळणाऱ्या सर्व आमदारांना अपात्र ठरवण्याची नोटीस आम्ही दिली असल्याचं गोगावले म्हणाले आहे. मात्र, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याबद्दल आदर दाखवत त्यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) याना ही नोटीस पाठवली नसल्याची माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आदित्य ठाकरे यांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेतील.सोमवारी शिंदे सरकारने विधानसभेत बहुमत जिंकले. यानंतर शिंदे गटाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)गटातील आमदारांना व्हीप बजावला. शिंदे सरकार यांना फ्लोर टेस्टमध्ये 164…
मुख्यमंत्री पद आणि शिवसेना पक्ष संकटात आलं. तेव्हा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भावनिक खेळपट्टीवर फलंदाजी करताना दिसले. उद्धव ठाकरे यांनी जनतेला, विशेषत: शिवसैनिकांना या पदाशी कसलीही ओढ नाही, हे सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. ते म्हणाले की, “मी सुरुवातीला मुख्यमंत्रीपदासाठी सकारात्मक नव्हतो. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सांगण्यावरून त्यांनी हे मान्य केलं. सरकार जाणार आहे पण समोरचे संकट यापेक्षा मोठे आहे हे उद्धव ठाकरेंना माहीत होते. हा सारा प्रकार लक्षात घेऊन ते भावनिक आवाहन करत होते. ज्या खेळपट्टीवर उद्धव आतापर्यंत फलंदाजी करत होते, त्याच खेळपट्टीवर एकनाथ शिंदेही फलंदाजी करताना दिसले. बाळासाहेबांच्या नावानं भावनिक साद विधानसभेत बहुमत मिळवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
साईमत लाईव्ह मुंबई : प्रतिनिधी विधानसभेचे अध्यक्षपद जिंकत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) -भाजप सरकारने विधानसभेच्या विशेष अधिवेशनात पहिला डाव जिंकला. तर आज शिंदे-भाजप सरकारने बहुमत जिंकलं. बहुमत चाचणीत भाजप-शिंदे गटाला १६४ मतं मिळाली. तर दुरीकडे महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली. सपा आणि एमआयएमचे आमदार यावेळी तटस्थ राहिले. यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी विजयाची घोषणा केली. याच दरम्यान, शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद (Deepali Syed) यांनी एक ट्विट केलं आहे. ‘काहीजण म्हणतात उद्धवसाहेब जिंकले तर काहीजण शिंदेसाहेब जिंकले बोलतात पण यासर्व घटनेत शिवसैनिक हरला’, असे सय्यद यांनी म्हटले आहे. दीपाली सय्यद यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केले…
जळगाव : साईमत लाईव्ह प्रतिनिधी जळगाव जिल्हा परिषदेच्या ह्या नव्या वादाचा नवा चेहरा पी एम पाटील नामक कर्मचाऱ्याच्या कागद पत्रे व फाईल आपल्या मन मर्जी प्रमाणे घरी घेऊन जाऊन कामे करण्याच्या अजब गजब प्रकाराने समोर आले आहे. ह्याला बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.धिवरे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी श्री.मोहन ह्यांचे खुले पाठबळ असल्यानेच श्री पाटील ह्यांनी हि हिम्मत दाखवली असल्याचे उघड गुपित असलेली चर्चा जी.प सह जिल्हाभर गाजत आहे. ह्यात खरे तर राजा बोले दल हाले अशी परिस्थिती असतांनाही कर्मचार्यावरच गुन्हे दाखल होण्याची वेळ येऊन ठेपली आहे. या मुळे छत नसलेले कर्मचारी खूप धास्तावले आहेत. जळगाव जी.प त आता नवीन वादाची…
साईमत लाईव्ह मुबंई : प्रतिनिधी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने शिंदे-भाजपा सरकारने पहिली लढाई जिंकल्यानंतर आता विश्वासदर्शक ठरावही जिंकला आहे. राज्यपालांच्या निर्देशानुसार दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. पहिल्या दिवशी भाजपाच्या राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आज विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. यावेळी शिंदे गट आणि भाजपाने १६४ मतं मिळवत विश्वासदर्शक ठराव जिंकला.
साईमत लाईव्ह मुंबई : प्रतिनिधी एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी बंडखोरी करत शिवसेनेचे ३९ आमदार फोडले. त्यामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली आहे.शिवसेनेकडून सध्या आपल्या शाखाप्रमुखांकडून पक्षाशी बांधील राहीन, अशी प्रतिज्ञापत्रं लिहून घेतली जात आहेत. यापार्श्वभूमीवर मनसेने (MNS) पुन्हा शिवसेनेला (Shivsena) डिवचले आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य यांच्यावर व्यंगचित्राच्या माध्यमातून निशाणा साधला. देशपांडे यांनी पोस्ट केलेल्या व्यंगचित्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या हातात शिवसैनिकानी दिलले प्रतिज्ञापत्र आहे दुसरीकडे टीव्ही चालू आहे. ज्यामध्ये एकनाथ शिंदे हे आम्ही म्हणजेच खरी शिवसेना असा दावा करताना दिसत आहेत आदित्य ठाकरे यांच्या हातात जीपीएस ट्रॅकर असून ते उद्धव ठाकरे यांना म्हणत आहे की, बाबा,…
साईमत लाईव्ह मुंबई : प्रतिनिधी राज्यात राजकीय नाट्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) स्थापन झाले. त्यामुळे महविकास आघाडी सरकार कोसळले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची वाय बी चव्हाण सेंटर येथे महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह सर्व दिग्गज नेते आणि पक्षाचे सर्व आमदार उपस्थित होते. या बैठकीत महत्त्वांच्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. यापैकी सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे हे सरकार सहा महिनेच टिकेल. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी आमदारांना केल्या आहेत. राष्ट्रवादीच्या बैठकीला शरद पवार यांच्यासह सर्व दिग्गज नेते आणि पक्षाचे सर्व आमदार उपस्थित होते. राज्यातील…
साईमत लाईव्ह मुंबई : प्रतिनिधी राज्यात भाजप-एकनाथ शिंदे गटाचे नवे सरकार स्थापन होण्याची औपचारिकताच आता शिल्लक राहिली आहे. त्यामुळे साहजिकच आता राज्याचा पुढचा विरोधी पक्षनेता कोण असणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. यापूर्वी महाविकास आघाडीत शिवसेना (Shivsena) हा सर्वाधिक आमदार असलेला पक्ष होता. मात्र, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ३९ आमदार फोडून नेल्याने शिवसेनेकडे अवघे १६ आमदार उरले आहेत. त्यामुळे आता ५३ आमदार असलेला राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा असून विरोधी पक्षनेता हा त्यांचा असेल, हे निश्चित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या अजित पवार (Ajit Pawar) हेच विरोधी पक्षनेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रविवारी संध्याकाळी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या…