शिवसैनिक हरला ; नेत्यांनी राजकारण संपवुन शिवसेनेचे समाजकारण करावे

0
3

साईमत लाईव्ह

मुंबई : प्रतिनिधी

विधानसभेचे अध्यक्षपद जिंकत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) -भाजप सरकारने विधानसभेच्या विशेष अधिवेशनात पहिला डाव जिंकला. तर आज शिंदे-भाजप सरकारने बहुमत जिंकलं. बहुमत चाचणीत भाजप-शिंदे गटाला १६४ मतं मिळाली. तर दुरीकडे महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली. सपा आणि एमआयएमचे आमदार यावेळी तटस्थ राहिले. यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी विजयाची घोषणा केली. याच दरम्यान, शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद (Deepali Syed) यांनी एक ट्विट केलं आहे. ‘काहीजण म्हणतात उद्धवसाहेब जिंकले तर काहीजण शिंदेसाहेब जिंकले बोलतात पण यासर्व घटनेत शिवसैनिक हरला’, असे सय्यद यांनी म्हटले आहे.

दीपाली सय्यद यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केले आहे. ‘काहीजण म्हणतात आदरणीय उद्धवसाहेब जिंकले तर काहीजण बोलतात आदरणीय शिंदेसाहेब जिंकले. यासर्व घटनेत शिवसैनिक हरला, त्याला कळत नाही की ही भूमिका शिवसेनेची किती. शिवसेनेच्या सर्व नेत्यांनी शिवसैनिकाला सांभाळावे आणि हे राजकारण संपवून शिवसेनेचे समाजकारण सुरू करावे. जय महाराष्ट्र,’ असे दीपाली सय्यद यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here