साईमत लाईव्ह
मुंबई : प्रतिनिधी
शिवसेनेचे (Shivsena) नवे प्रतोद भरत गोगावले यांनी सोमवारी झालेल्या फ्लोअर टेस्टनंतर शिवसेनेच्या १४ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली आहे. मात्र शिंदे गटाने आदित्य ठाकरेंना या कारवाईतून वगळले आहे. आमचा व्हीप न पाळणाऱ्या सर्व आमदारांना अपात्र ठरवण्याची नोटीस आम्ही दिली असल्याचं गोगावले म्हणाले आहे. मात्र, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याबद्दल आदर दाखवत त्यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) याना ही नोटीस पाठवली नसल्याची माहिती दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आदित्य ठाकरे यांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेतील.सोमवारी शिंदे सरकारने विधानसभेत बहुमत जिंकले. यानंतर शिंदे गटाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)गटातील आमदारांना व्हीप बजावला. शिंदे सरकार यांना फ्लोर टेस्टमध्ये 164 मते मिळाली. तर विरोधकांना 99 मते मिळाली आहेत. यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
आमदार सुनील प्रभू (Sunil Prabhu) हेच शिवसेनेचे अधिकृत प्रतोद आहेत आणि त्यांचाच व्हीप कायदेशीर आहे , शिवसेनेच्या आमदारांना त्यांचाच व्हीप लागू होईल, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली. मात्र दुसरीकडे शिंदे गटही आपल्या भूमकेवर ठाम आहे. शिवसेनेच्या १४ आमदारांनी शिंदे गटाच्या विरोधात मतदान केले आहे. यामध्ये आदित्य ठाकरे यांचाही समावेश आहे.उद्धव ठाकरे गटाचे व्हीप सुनील प्रभू यांनीही शिंदे गटाला अपात्र ठरवण्याचा प्रस्ताव पाठवला होता. रविवारी त्यांनी शिवसेनेवर सभापतीपदाच्या उमेदवाराच्या विरोधात मतदान केल्याचा आरोप केला होता. दोन्ही गटाकडून तक्रार आल्याचे भापती कार्यालयाने सांगितले. मात्र या तक्रारींची चौकशी होण्यासाठी काही वेळ लागू शकतो,असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.