यावल : साईमत लाईव्ह प्रतिनिधी बोदवड शहरात रासायनिक खतांचा अनियमित पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना त्रास होत आहे.यासाठी राष्ट्रवादी तर्फे तहसीलदार व कृषी अधीकाऱ्यांकडे रासायनिक खत उपलब्ध व्हावे यासाठी निवेदन देण्यात आले. निवेदनात बोदवड तालुक्यातील शेतकऱ्यांना रासायनिक खतांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असून तालुक्यात कोणत्याच प्रकारचे खते उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.बोदवड तालुक्यातील काणत्याही कृषि केंद्रावर खतं उपलब्ध नसल्याने शेतकरी अडचणीत सापडलेला अजून त्याची खतांअभावी धावपळ होत आहे. तरी आपणास विनंती करत आहे की,सदरील बाब लक्षात घेता आपण आपल्या स्तरावरून शासन दरबारी पाठपुरावा करून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या हितासाठी व शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी आपले स्तरावरून योग्य ते सहकार्य करून…
Author: Saimat
मुंबई : साईमत लाईव्ह प्रतिनिधी राज्यातील सत्तेतून मागील अडीच वर्षांपासून दूर असलेल्या भाजपने शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या मदतीने पुन्हा एकदा सत्तेत पुनरागमन केलं आहे. आता नवे सरकार स्थापन झाल्यानंतर खातेवाटपाकडे सर्वांचं लक्ष लागलेले आहे. शिंदे गट आणि भाजपमध्ये कुणाला मंत्रिपद मिळणार असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. अशातच आता भाजपमध्ये मोठे खांदेपालट केले जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचा मंत्रिमंडळात समावेश जवळपास निश्चित झाला आहे. त्यामुळे लवकरच नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बहुमत सिद्ध केल्यानंतर लवकरच खातेवाटप केले जाणार आहे. तर दुसरीकडे, नवे सरकार स्थापन झाल्यानंतर आता…
साईमत लाईव्ह जळगाव : प्रतिनिधी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेशी बंडखोरी करत पक्षाचे ४० आमदार गळाला लावले. तसेच भाजपसोबत येत सरकारही स्थापन केले. त्यामुळे शिवसेनेत (Shivsena)मोठी फूट पडली असून हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसाठी (Uddhav Thackeray)मोठा धक्का मनाला जातो. आता शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली. शिवसेनेचे 18 पैकी 12 खासदार, 20 माजी आमदार शिंदे गटात सामील होणार असल्याचा गौप्यस्फोट गुलाबराव पाटलांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. शिवसेनेत बंड केल्यानंतर अनेक आमदार आपल्या घरी काल पहिल्यांदा पोहोचले आहे. गुलाबराव पाटील जळगावात पोहोचल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी त्यांनी…
नवी दिल्ली : साईमत लाईव्ह महागाईची झळ सहन करणाऱ्या सर्वसामान्य जनतेला एक मोठा झटका बसला आहे. बुधवारी सकाळी ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडर (LPG Cylinder Hike)च्या किमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. नव्या दर वाढीनंतर राजधानी दिल्लीत १४.२ किलोचा सिलेंडर एक हजार ५३ रुपयांवर पोहोचला आहे. पाच किलोचा छोटा सिलेंडरच्या किमतीत १८ रुपयांनी वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती वाढवण्यात आल्या असल्या तरी व्यवसायिक कारणासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅसच्या किंमतीत ८.५० रुपयांनी घट करण्यात आली आहे. राजधानी नवी दिल्लीत १९ किलोचा गॅस सिलेंडर २ हजार १२.५०, मुंबईत २ हजार १३२, कोलकातामध्ये १ हजार ९७२.५० तर चेन्नईत २ हजार…
मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad pawar)यांची भेट घेतली आहे. अचानक झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलट -सुलट चर्चा रंगल्या आहेत. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत असले तरी कुठल्याही पूर्वनियोजित कार्यक्रमाविना ही भेट झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ४० आमदार फोडत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. यातच राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील आलेले सरकार लवकरच कोसळेल आणि राज्यात मध्यावधी निवडणुका होतील असं भाकित शरद पवार यांनी वर्तविले आहे. यातच काल दिवसभरातील कार्यक्रम आटोपल्यावर रात्रीच्या सुमारास एकनाथ शिंदे शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले.…
साईमत लाईव्ह मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात घडलेल्या अभुतपूर्व अशा राजकीय नाट्यानंतर शेवटी मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्रिपदावर देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) विराजमान झाले आहे. एकनाथ शिंदे सरकार आता पूर्ण बहुमताच्या भरवश्यावर जोमाने कामाला लागले आहे. आता आषाढी एकादशीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विठ्ठल-रखुमाईची महापूजा करणार (Mahapuja of Vitthal Rakhumai )आहे. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदेंना आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच महापूजेचा बहुमान मिळाला आहे.(Eknath Shinde Latest Marathi News) गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या घडामोडींमुळे आषाढी एकादशीला विठ्ठल-रखुमाईची महापूजा कोण करणार? असा प्रश्न उपस्थित झाला होता. पण, अखेरीस हा मान आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार स्थापन…
साईमत लाईव्ह मुंबई : प्रतिनिधी शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांच्या ताकदीवर शिंदे सरकार भक्कम करताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आता शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडे आपली नजर वळवली असून, मुंबईपाठोपाठ पुण्यातील कडवट शिवसैनिक माजी नगरसेवक नाना भानगिरेंना गळाला लावण्याच्या हालचाली शिंदेंनी चालविल्या आहेत. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून भानगिरे हे मुंबईत तळ ठोकून आहेत आणि शिंदे थांबलेल्या ताज प्रेसिडेंटमध्येच त्यांचा मुक्काम असल्याचे सांगण्यात येत आहे. भानगिरे यांच्यासारख्या पुण्यातील मोठ्या नेत्याला फोडून महापालिका निवडणुकांआधी शिंदे हे शिवसेनेला नवे धक्के देण्याच्या तयारीत आहेत. पुणे महापालिकेत प्रशासन आल्यानंतर निधी अडविल्याची तक्रार करीत भानगिरे यांनी चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानंतर शिंदे यांनी महापालिका आयुक्त विक्रम…
साईमत लाईव्ह जळगाव ः विशेष प्रतिनिधी जळगाव जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील लेखा सहाय्यक पी.एम. पाटील नामक कर्मचाऱ्याचे आपल्या मर्जीप्रमाणे वरिष्ठांच्या आदेशानुसार कामे वाटपाचा घोळ नुकताच उघडकीस आला आहे. त्यात अडचणीत आलेल्या कार्यकारी अभियंता व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी पी. एम. पाटील यांची तडकाफडकी बदली केली आहे. यासह मनमर्जीप्रमाणे कामे देण्यासाठी शासकीय कागदपत्रे व फाईली घरी घेऊन जाऊन काम करणे ह्या कर्मचाऱ्याला चांगलेच महागात पडत आहे. कार्यकारी अभियंता बांधकाम व अतिरिक्त मुख कार्यकारी अधिकारी ह्यांनी मात्र या प्रकरणी आपले हात वर केले आहेत. त्यामुळे श्री. पाटील नॉट रिचेबल येत असून भुयारात गेले आहेत. जळगाव जि.प.च्या ह्या कामे…